घरात कामाला आलेल्या वेंधळ्या सुतारामुळे करोडोच्या बिझनेसची आयडिया सुचली.

व्यवसाय हा तुमच्याकडे असणाऱ्या भन्नाट आयडिया आणि मेहनतीवर चालतो. तुमच्याकडे जेवढी भन्नाट आयडिया तेवढा तुमचा व्यवसाय हा सक्सेसफुल. तर आज अश्याच भन्नाट आणि सक्सेसफुल तीन मित्रांनी सुरू केलेल्या व्यवसायाबद्दल तुम्हाला आम्ही सांगणार आहोत.

इंजिनिअरींग केलेल्या दिल्लीतील अभिराज, वरूण आणि राघव या तिघांनी एकत्र येत अर्बन क्लॅप नावाची कंपनी सुरू केली. ही कंपनी घरात कामासाठी लागणाऱ्या प्लंबर, इलेक्ट्रीशियन, पेस्ट कंट्रोल, क्लीनिंग प्रोफेशनल्स, शिक्षक याबरोबर योगा ट्रेनर, वेडींग फोटोग्राफर यांची सेवा पुरवण्याचं काम करते.

सध्या ही कंपनी 5 लाख ग्राहकांना सेवा पुरवत असून त्याच्यासोबत 25 हजार लोक जोडली गेलेली आहेत. तर कंपनीचा वर्षाचा टर्नओव्हर करोडोमध्ये पोहचलेला आहे.आज जरी अर्बन क्लॅप कंपनी शिखरावर पोहचली असली तरी मात्र या पाठीमागं या तिन मित्रांचा मोठा संघर्ष आहे. याची सुरूवात मागच्या पाच वर्षापुर्वी झालेली.

सालं होतं, 2014.

अभिराज याला आपल्या घरी सुताराकडून काहीतरी काम करून घ्यायचं होतं. त्यासाठी त्यानं सुताराला बोलवलं. मात्र तो आलाच नाही. त्यानंतर दुसऱ्याला बोलवलं तर  तो पण काही वस्तू न आणताच आला. त्यामुळे अभिराज याला राग आला. ही लोकं आपल्या कामाबाबत कीती निष्काळजीपणा दाखवतात.

घरातल्या कितीतरी कामासाठी माणसांची गरज लागते. कोणाला प्लंबर, इलेक्ट्रीशियन हवा असतो तर काहींना पेस्ट कंट्रोल, वेडिंग फोटोग्राफर, फिटनेस, कोचिंग क्लास, ब्यूटीशियन किंवा क्लीनिंग प्रोफेशनल, हवे असतात. मात्र हे सहजासहजी भेटत नाहीत. त्यामुळे त्याच्या मनात विचार आला,

आपण हाऊसकिपिंगचा सर्व्हिस पुरवायची का?

त्यासाठी त्याने अभ्यास केला. माहिती गोळा गेली. आपले मित्र वरूण आणि राघवला सोबत घेतलं. वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या अनेकांना भेटले. त्याच्याकडून सल्ले घेतले. हाऊसकिपींगची सुरूवात करण्यासाठी 50-60 लोकांना सोबत घेतलं.

पैसे जमा केले आणि अर्बन क्लॅपची सुरूवात झाली.

मात्र, ही कंपनी सुरू करण्याच्या अगोदर तिघां मित्रांना नवीन व्यवसायामध्ये येणाऱ्या अडचणी माहिती होत्या. कारण तिघांनीही आयआयटी कानपुरमधून इंजिनिअरिंग केली होती. त्यानंतर तिघही चांगल्या मल्टिनँशनल कंपनीत कामाला होते. तेव्हापासून व्यवसाय करण्याचं खुऴ त्याच्या डोक्यात होतं. नोकरी सोडून अभिराज आणि वरूण यांनी सिनेमाबाँक्स नावानं व्यवसाय सुरू केलेला. तर राघव ने सु्द्धा बग्गी डाॅट इन नावानं सुरू केलेला.

मात्र तिघानांही त्यांच्या पहिल्या व्यवसायात अपयश आलं होतं. म्हणजेच काय तर अपयशाचा अनुभव त्यांना होता.

अपयश आलं असतांनाही ते खचले नव्हते. कारण या व्यवसायातून त्यांच्या पाठीशी मोठा अनुभव आला होता. त्यामुळे काहीतरी नवीन करण्याचं डोक्यात सुरू होतं. त्य़ातूनच अर्बन क्लॅप कंपनीची सुरू झाली. 

तिघही अगोदरच्या व्यवसायातून तावून सुलाखून निघाले होते. त्यामुळे नवीन कंपनीबाबतचे ते जाणीवपुर्वक निर्णय घेत होते. अगोदरच्या झालेल्या चुका पुन्हा होऊ नये यांचा प्रयत्न करत होते. त्यामुळे योग्य नियोजन आणि मेहनतीच्या जोरावर ही कंपनी करोडपती झाली. त्यांना विविध ठिकाणाहून फंडिग मिळाली.

ही कंपनी सध्या 80 प्रकारची सेवा पुरवत आहे. प्लंबर, इलेक्ट्रीशियन, पेस्ट कंट्रोल, क्लीनिंग प्रोफेशनल्स, शिक्षक याबरोबर योगा ट्रेनर, वेडींग फोटोग्राफर, अश्या सगळ्या प्रकारच्या सेवा कंपनी मार्फत पुरवल्या जात आहेत. मेट्रोसिटी मध्ये बऱ्याच जणांना अशा छोट्या मोठ्या कामासाठी विश्वासू व योग्य दरात काम करणारे कारागीर हवी असतात.

या घड्याळ्याच्या मागे धावणाऱ्या नवमध्यमवर्गीय तरुण पिढीसाठी अर्बन क्लॅप म्हणजे आपली माणस बनली आहेत.

गुडगावमधून सुरू झालेला अर्बन क्लॅपचा प्रवास आज दिल्ली, चेन्नई, बंगलूरू, मुंबई, पुणे, हैदराबाद या शहरांपर्यंत पोहचलेला आहे. संपूर्ण देशभरात हजारो हाताना त्यांनी काम दिलं आहे.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.