उर्मिला मातोंडकर सरसंघचालकांच्या भाची की लव जिहादचा बळी ठरलेल्या फरजाना शेख, काय खर?

मागच्या वर्षी उर्मिला मातोंडकर राजकारणात आली. पहिला ती कॉंग्रेसमध्ये आली. लोकसभेची निवडणूक जिद्दीने लढवली, हरली. पुढे काँग्रेस नेत्यांच्या कुरघोडीच्या राजकारणामुळे पक्षाला रामराम ठोकला.

आता गेले काही दिवस तिचं नाव राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीत आहे अशी चर्चा आहे. तेही शिवसेनेच्या कोट्यातून. उद्या ती शिवसेनेत प्रवेश करेल ही अशी शक्यता बोलून दाखवली जात आहे. कंगनाला खणखणीत उत्तर देऊ शकणारी म्हणून सेना मराठमोळ्या उर्मिलाकडे पाहात आहेत.

पण उर्मिला राजकारणात पुनरागमन करणार म्हटल्यावर सोशल मीडिया पुन्हा चेकाळला आहे. तिचा बायोडाटा तिचा इतिहास सगळ्यांच्या समोर मांडला जातोय.   

तशी ती कोणत्याही पक्षामध्ये गेली असती तर तिचा बायोडेटा चारचौघांच्या समोर आलाच असता. आजकालचे प्रमुख छंद या प्रकारात पक्षांतर केलं किंवा राजकारणात नव्याने कोण दाखल झाले तर हेळव्यांपासून ते सातबाऱ्यावर कुणाच नाव आहे इतपर्यन्तचा संपुर्ण इतिहास काढला जातो, उर्मिला काल काँग्रेसमध्ये होती, उद्या सेनेत जाईल परवा भाजपमध्ये ही जाऊ शकते. हे सगळं चाललं असलं तरी तिच्या इतिहासाची चर्चा होतच राहणार.   

असो जास्त लांबड न लावता मुद्याचं सांगतो, 

मागे जेव्हा उर्मिला मातोडकर कॉंग्रेसमध्ये आली तेव्हा उर्मिला मातोडकर यांचे कॉंग्रेस अध्यक्ष राहूल गांधी यांच्यासोबतचे फोटो जनहितार्थ जारी करण्यात आले. पक्षात आल्या आल्या काहीतरी राजकीय विषयांवर बोलायला हवं म्हणून तीने मोदी सरकारवर टिका केली.

काँग्रेसमध्ये दाखल झाली त्यानंतरच तीचा बायोडेटा फिरू लागला होता पण सरकारवर टिका करताच हा बायोटेडा जोरजोरात फिरू लागला. यात भाजपवाल्यांबरोबर सेनावाले देखील आघाडीवर होते. आता देखील हे मेसेज फिरतात, यावेळी मात्र शिवसैनिक तिची बाजू घेताना दिसतात.

व्हॉट्सएप वरुन फिरवण्यात येणाऱ्या या मॅसेजमध्ये काय सांगण्यात येत आहे हे अगोदर आपणास सांगतो. 

Screenshot 2019 03 28 at 5.09.55 PM
फेसबुक कमेंट

लग्नानंतर नव-याचं नाव लावा की मिडीयावाले”#ऊर्मिला #मोहसीन #अख्तर #मीर” असं सान्गा ना, म्हणजे #लोकाना समजेल ही #कॉंग्रेस मध्ये का गेली ते ..!!

हॅशटॅग या प्रकाराचा उत्तम वापर करत हा मॅसेज फिरवला जात होता. यामध्ये सांगण्यात येत आहे की, उर्मिला मातोडकर हि लग्नानंतर उर्मिला मोहसीन अख्तर मीर झाली आहे. लोकांनी तीला उर्मिला मोहसीन अख्तर मी अस म्हणावं. 

मागच्या वर्षीच नाही तर आजही असाच मेसेज फिरवला जातो

Untitled 1

फक्त यात आता म्हटलंय की काँग्रेसचं वाटोळं केलं आणि आता शिवसेनेला भुई सपाट करून जाणार.

त्याचप्रमाणे दूसरा एक मॅसेज आहे त्यामध्ये सांगण्यात येत आहे की, 

 

Screenshot 2019 03 28 at 5.09.42 PM
फेसबुक कमेंट*वाह! अरे रंगीली बाई हो गया राजकारण शुरु**ऊर्मिला मातोंडकर चे सध्याचे नाव *ऊर्मिला मोहसिन अख्तर मीर* असे आहे. आपल्या पेक्षा 10 वर्षे वय कमी असलेल्या बरोबर गुपचुप लग्न केले 2016 मध्ये..आता आपल्याला शिकवते आहे धर्म आणि देशप्रेम.

त्याचसोबत हा तिसरा मॅसेज या मध्ये सांगण्यात येत आहे की,  

RSS प्रमुख मोहन भागवत की भतिजी उर्मिला मातोंडकर कश्मीरी मुस्लीम फरजाना शेख से निकाह करकें फरजाना खान बन गईं हैं. 

आत्ता थोडक्यात सांगायच तर लोकांचे मुद्दे कोणते आहे ? 

१) उर्मिला मातोडकर हि सरसंघचालक मोहन भागवत यांची भाची आहे. 

२) उर्मिला मातोडकरने काश्मीर मुस्लीम तरूणासोबत लग्न केलं आहे. आणि ती लव जिहादचा बळी आहे. 

मुद्दा क्रमांक एक उर्मिला मातोडकर हि सरसंघसंचालक मोहन भागवत यांची भाची आहे का? तर याच उत्तर नाही अस मिळतं. फेसबुकवरील माहितीबद्दल खात्रीलायक माहिती सांगणाऱ्या,  

अधिक माहितीसाठी पुढील लिंकवर क्लिक करुन पाहू शकता.

https://smhoaxslayer.blogspot.com/2016/07/just-opposite-to-its-name-reality-its.html इथे देखील हा फोटो आणि माहिती खोटी असल्याचं सागण्यात आलं आहे. 

Screenshot 2019 03 28 at 5.59.54 PM

दूसरा मुद्दा उर्मिला मातोंडकर लव जिहादचा बळी ठरली आहे का? तीच खरं नाव वेगळ आहे का. 

उर्मिला मातोंडकरचं लग्न काश्मीरचे असणाऱ्या मोहसीन अख्तर मीर सोबत झालं हे सत्य आहे. पण ते लपून झालं, उर्मिला मातोडकर लव जिहादचा बळी होती यापैकी काहीच सत्य नाही. 

पुराव्यासाठी इंडियन एक्सप्रेसची बातमी आपण पाहू शकता. 

Screenshot 2019 03 28 at 6.01.36 PM
https://indianexpress.com/photos/entertainment-gallery/urmila-matondkar-ties-knot-with-mohsin-akhtar-mir-see-pics/

इंडियन एक्सप्रेसची बातमी तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. https://indianexpress.com/photos/entertainment-gallery/urmila-matondkar-ties-knot-with-mohsin-akhtar-mir-see-pics/

यामध्ये लिहण्यात आलं आहे की, उर्मिला मातोंडकरच्या निवासस्थानावर  हिंदू प्रथेप्रमाणे दोघांचे लग्न झालं आहे. त्यानंतर तिचे नाव बदलण्यात आले किंवा तीने ते स्वत: बदलल्याबाबत कोणताच पुरावा नाही. शिवाय हे लग्न हिंदू प्रथेप्रमाणे झालं होतं न कि मुस्लीम प्रथेप्रमाणे. 

आत्ता विशेष सुचना: ती हिंदू की मुस्लीम यावर तुम्ही आपण राजकारण खेळणार असलोच तर आपणासाठी फुकटचा हा व्हिडीओ. पहा आणि जास्त लोड घेवू नका. 

Leave A Reply

Your email address will not be published.