अमेरिकेच्या गुप्तहेर विमानांनी भारतातून उड्डाण केलं होतं…

अमेरिका यू २ स्पाय प्लेन अस गुगलवर सर्च केल्यानंतर अमेरिकेचं भलतच कांड तुमच्या नजरेसमोर येईल. याबद्दल अनेकांनी अनेकदा बोलून झालं आहे.

थोडक्यात सांगायचं झालं तर दुसऱ्या महायुद्धानंतर तत्कालीन सोव्हियत युनियन म्हणजे रशियाची हेरगिरी करण्यासाठी अमेरिका U2 प्लेन वापरत होतं.

सुरवातीची गोष्ट सांगायची झाली तर १९६० च्या दरम्यान जेव्हा अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष आइजन हॉवर यांनी शीतयुद्धाचा तणाव कमी करण्यासाठी तत्कालीन सोव्हिएत युनियनला भेट देण्याचा निर्णय घेतला.

या भेटीच्या एक दिवस अगोदर म्हणजे १ मे १९६० रोजी सोव्हिएत युनियनच्या हद्दीत अमेरिकेचे हेरगिरी करणारं विमान U2 पकडलं गेलं. या विमानाच्या पायलटने कबुल केलं की आपण सोव्हिएत युनियनच्या सैनिकी तळांची माहिती घेत होतो. त्यानंतरच्या काळात शीतयुद्ध अधिकच पेटलं.

१९५५-५६ च्या काळात अमेरिका आणि सोव्हिएत युनियनमध्ये आण्विक शस्त्रांवरुन तणाव निर्माण झाला होता. तेव्हापासूनच या विमानांद्वारे सोव्हिएत युनियनची हेरगिरी करण्याचा अजेंडा अमेरिकेकडून राबवण्यात आला.

आत्ता सोव्हिएत युनियनमध्ये ही विमाने पाठवण्यासाठी तेव्हा अमेरिकेचा रशियात एकमात्र तळ होता तो थायलॅंडमध्ये.

आत्ता तुम्हाला इतिहास ठाऊक असेल तर सहज प्रश्न पडेल की नेहरू तर अलिप्त राष्ट्रसंघटनेचा पुढाकार करत होते. शीतयुद्धात ना अमेरिकेकडून ना सोव्हिएत युनियनकडून अशी भारताची भूमिका होती. त्यामुळे अमेरिकेच्या U2 विमानांना भारतीय क्षेत्रातील विमानतळ वापरण्यास परवानगी नव्हती की भारतीय हवाई क्षेत्रातून उड्डाण करायला परवानगी नव्हती. तरीही भारतीय हद्दीतून या विमानांनी उड्डाण केलं होतं अस इतिहासचं सांगतो.

तर हे कसं शक्य आहे, पण भिडू राजकारणात सगळं शक्य असतय. इथही तसच काहीसं झालं.

१९६२ साली चीन ने भारतावर आक्रमण केलं आणि सगळं राजकारण बदलून निघालं. १९६२ च्या युद्धानंतर मोठ्या प्रमाणात भारताचं परराष्ट्रीय धोरणं बदलून गेलं. कालपर्यन्त हिंदी चीनी भाई भाई चा नारा देणाऱ्या राजकारण्यांना शत्रूराष्ट्र संकल्पना समजून गेली. चीनच्या आक्रमणाविरोधात लढताना भारतीय सैन्याच्या मर्यादा देखील स्पष्ट झाल्या होत्या. त्यामुळे आत्ता भारताला कोणत्यातरी मोठ्या देशाची मदत असणं गरजेचं वाटू लागलं.

पंडीत नेहरूंनी मदतीचा हा हात अमेरिकेसमोर पसरला.

त्यानंतर अमेरिकेच्या U2 विमानांनी चीन ची हेरगिरी करण्यास सुरवात केली. चीन च्या सैन्यतळाची माहिती या विमानांमुळे अमेरिकेला मिळू लागली व पुढे ही माहिती अमेरिका भारताला पुरवू लागला.

हे सोपस्कार पुर्ण होताच अमेरिकेने भारतापुढे एक प्रस्ताव ठेवला.

अमेरिकेच्या U2 विमानांना भारतातून उड्डाण करण्याचा परवाना द्यावा असा हा प्रस्ताव होता. त्यासाठी भारतीय हद्दीतील विमानतळाचा ताबा द्यावा अशी मागणी करण्यात आली. १९६३ साली अमेरिकेचे राष्ट्रपती जॉन एफ कॅनेडी आणि भारताचे राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्राथमिक बोलणी होवून होकार मिळाला.

त्यासाठी भारत सरकारने अमेरिकेला ओडिसा राज्यातल्या चारबतिया विमानतळावरून U2 विमानांच उड्डाण करण्याचा परवाना दिला.

पण इथे एक घोळ होता. भारताने अमेरिकेला जे विमानतळ दिले होते तिथून U2 सारखी विमाने उड्डाण करु शकणार नव्हती. त्यासाठी नव्याने धावपट्टी तयार करावी लागणार होती.

भारत सरकारने धावपट्टी तयार करुन देतो अशी हमी दिली आणि या संपूर्ण प्रक्रियेला एक वर्षाचा वेळ लावला.

अखेर मे १९६४ मध्ये इथून पहिल्यांदा रशियाची हेरगिरी करण्यासाठी एका विमानाने उड्डाण केलं.

मात्र या नंतरच्या काही दिवसातच पंडीत जवाहरलाल नेहरूंच निधन झालं आणि प्रोजेक्ट थांबला. काही महिन्यानंतर म्हणजे सप्टेंबर १९६४ साली पुन्हा एका विमानाने उड्डाण केलं. मात्र त्यानंतर हा प्रोजेक्ट बासनात गुंडाळण्यात आला.

आत्ता ही घटना विशेष का आहे तर ही अमेरिकेच्या हेरगिरी करणाऱ्या विमानांनी भारतातून उड्डाण करण्याची ही इतिहासातील एकमेव घटना आहे.

हे ही वाच भिडू.

1 Comment
  1. केतन देशपांडे says

    भिडू, परवा Amazon आणि MGM मध्ये जो करार झाला तो Amazon साठी कसा आणि किती फायदेशीर आहे यावर माहिती दिली असती तर बरं झालं असतं..

Leave A Reply

Your email address will not be published.