मध्यप्रेदशच्या मंत्र्यांबरोबर सेल्फी घेण्यासाठी १०० रुपये मोजावे लागतील.

हल्ली सेल्फी काढणं असं काय विशेष राहिलं नाही. पोर-पोरी, आज्या पणज्या सगळेच सेल्फ्या काढतात. त्यात आणि त्या करण जोहरनं शिकवलेलं पाऊट पण असतंय. असे धडाधड मारतात हे लोक सेल्फी बोलू नका. नद्या नाले, ओढे, गटारी अगदी कुठं पण चालू होतायत.

फिल्म स्टार असो का मग मंत्री संत्री, सगळ्यांबरोबरच सेल्फी निघत असतो. बरं हा सेल्फी काढताना हे बडे लोक पैसे काय मागत नाहीत.

पण मध्यप्रदेशच्या मंत्री उषा ठाकूर यांच्या सोबत जर तुम्हाला सेल्फी काढायचा असेल तर मात्र १०० मोजावे लागतील. म्हणजे नो मोअर फ्री सेल्फी 

मध्यप्रदेशच्या उषा ठाकूर सांस्कृतिक कॅबिनेट मंत्री आहेत. मध्यप्रदेशच्या राजधानीपासून म्हणजे भोपाळ पासून जवळजवळ २५० किलोमीटरच्या अंतरावर खंडावा नावाच शहर आहे. याठिकाणी एक प्रेस कॉन्फरन्स झाली. त्यात उषा ठाकूर यांनी सेल्फी घेण्यापासून ते लोकांच्या बुके देण्यापर्यंत सर्वच विषयांवर आपलं मतं मांडलं.

त्या म्हंटल्या की,

“सेल्फी की वजह से बहुत समय बर्बाद होता है. कई बार इस कारण कार्यक्रमों में देरी से पहुंच पाते हैं. इसलिए संगठनात्मक दृष्टि से, अब जो भी सेल्फी लेना चाहता है, उसे बीजेपी की लोकल मंडल यूनिट में 100 रुपये जमा कराने चाहिए.”

आता ठाकूर बाई काय एकट्याच नाहीत, ज्या असे पैसे घेतायत. याआधी २०१५ मध्ये बीजेपी चे नेता कुंवर विजय शाह म्हणाले होते की, सेल्फी पाहिजे असेल तर निदान निदान १० रुपये तर मिळालेच पाहिजेत.

उषा ठाकुर यांनी सेल्फीच्या फी व्यतिरिक्त बुकेच्या बाबत सांगितलं की,

“फूलों में देवी लक्ष्मी का निवास है, इसलिए भगवान विष्णु के अलावा कोई भी ऐसा नहीं है जो साफ और बेदाग हो, इसलिए मैं फूल स्वीकार नहीं कर सकती. इसके अलावा प्रधानमंत्री मोदी ने भी कहा था कि बुके की जगह बुक देनी चाहिए.”

बरं हे झालं आता सेल्फी आणि फुलांचं. पण याआधी ही त्यांनी बेताल वक्तव्य केली आहेत. कोरोनाच्या लशीसंदर्भात बोलताना त्या म्हंटल्या की,

ज्या लोकांना दोन्ही लसींचे डोस मिळालेत, त्यांना माझी एक विनंती आहे की लोकांनी पाचशे पाचशे रुपये पीएम फंडात टाकावेत. कोरोनामुळे सरकारी व्यवस्थांवर ताण आला आहे. यासाठी जर तुम्ही आर्थिक दृष्ट्या सक्षम असाल तर कृपया मदत करा. 

त्यांच्या या वक्तव्यावरुन देशभरात त्यांच्यावर टीकेची झोड उठली होती.

याआधी सुद्धा त्यांनी एक अजब कृती केली होती. मध्यप्रदेशच्या विधानसभेत आर्थिक बजेट मांडायचं सुरु होत. यावेळी या ठाकूर बाई विनामास्क विधानभवनात पोहचल्या. त्यांच्या या कृतीवर एका पत्रकाराने त्यांना टोकलं, यावर त्या म्हणतात कशा,

मी तर रोज हनुमान चालीसा वाचते. रोज शंख वाजवते, काढा पिते, गाईच्या शेणापासून बनवलेल्या गोवऱ्यांचं हवन करते. यामुळं माझी रोगप्रतिकारक शक्ती वाढली आहे. यामुळेच माझा कोरोना पासून बचाव होतोय. सोबतीला माझ्या गळ्यात उपरणं असत, कोणी जवळ आलं कि मगच मी ते तोंडावर धरते.  

आता काय बोलावं या बाईंना… म्हणजे आता सेल्फीला पैसे द्या, कोरोनासाठी सरकारला पैसे दान करा, बाई एक काय ते ठरवा.. लोकांनी कुठं कुठं पाकीट रिकामं करायचं.

हे हि वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.