सोशल मीडियाचा परफेक्ट वापर करून या मायलेकींनी मिळून १७० प्रोडक्टस विकलेत…

सोशल मीडिया हा मूलभूत गरजांपैकीच एक झाला आहे. चॅटिंग करणे आणि फोटो अपलोड करणे इतकाच वापर सोशल मीडियाचा नसतो तर यातूनच अनेक लोकांनी आपली स्वतःची ओळख बनवली आहे. लॉकडाऊनमध्ये सोशल मीडिया वापराचं प्रमाण ज्या झपाट्याने वाढलं त्यातूनच अनेक लोकांनी व्यवसाय सुरु करून एक नवा पायंडा पाडला. तर असाच एक व्यवसाय सुरु केला राजस्थानमधल्या मायलेकींनी.

राजस्थानमधल्या जयपुरमध्ये राहणाऱ्या ऋतू भंसाली यांनी आपल्या दोन मुलींना सोबत घेऊन आणि सोशल मीडियाचा वापर करून आपला नवीन व्यासाचे सुरु केला. ऋतू भंसाली यांनी होम मेड प्रोडक्ट बनवत एका नवीन व्यवसायाला सुरुवात केली. फक्त राजस्थानचा नाही तर संपूर्ण मध्यप्रदेशात हे होम मेड प्रोडक्ट विकले जातात. व्यवसाय सुरु केल्याच्या केवळ वर्षभरातच जवळपास २५०० लोकांसोबत मार्केटिंग करून त्यांनी हा व्यवसाय वाढवला. यातून महिन्याला दोन लाखाची कमाई सध्या त्या करत आहे. 

ऋतू भंसाली या कॉमर्समध्ये मास्टर केलेल्या एक शिक्षिका होत्या, पुढे लग्न झाल्याने शिक्षण वैगरे सगळं मागे पडत गेलं. त्यांची मोठी मुलगी दिवा हिने पब्लिक रिलेशन अँड ऍडव्हर्टायझिंग मध्ये पाच वर्ष काम केलं होतं. दिया हि ग्रॅज्युएशन करत होती. लॉकडाऊनच्या काळात तिला बिझनेस आयडिया आली. वर्क फ्रॉम होम असल्याने ऋतू भंसाली या आपल्या मुलींना होम मेड प्रोडक्ट वापरायला सांगत असे. हे बनवलेले प्रोडक्ट पूर्णपणे नैसर्गिक, सुरक्षित आणि ऑरगॅनिक होते.

यावरून या तिघी मायलेकींनी मार्केटिंग करायला सुरवात केली. होम मेड प्रोडक्ट असल्याने यात केमिकलचा वापर केला जात नव्हता. या दोन मुलींनी दिया आणि दिवाने हा व्यवसाय वाढवण्यासंबंधी आपल्या आईशी चर्चा केली तेव्हा त्यांनी याला मनाई केली. 

पण या दोन मुलींनी आईला न सांगता सोशल मीडियावर everything mom made नावाचं एक इंस्टाग्राम पेज बनवलं. आपल्या मित्र मंडळींना सोबत घेऊन त्यांनी हे पेज प्रमोट करायला सुरवात केली.

फॉलोअर्सची संख्या वाढत गेली आणि त्यांना ऑर्डर्ससुद्धा मिळू लागल्या. शेवटी आईला यात इन्व्हॉल्व करून त्यांनी मोठ्या प्रमाणात ऑर्डर स्वीकारायला सुरवात केली.

सुरवात फक्त २० हजार रुपयातून झाली, मार्केटमधून रॉ मटेरियल खरेदी केलं. काचेच्या बॉटल्स आणि लेबल खरेदी करण्यात २० हजार रुपयांचा खर्च झाला. पहिल्या आठवड्यातच सगळा माल विकला गेला आणि ऑर्डर्स वाढू लागल्या. ऑर्डर स्वीकारणे आणि त्याची डिलिव्हरी करणे यातच त्यांचा सगळा वेळ जाऊ लागला. दिवा यांनी याबद्दल सांगितलं होतं कि लोकल फार्ममधून सगळा कच्चा माल त्या घेऊन येतात आणि पुढे त्याच प्रोडक्ट रूपांतर ऋतू भन्साली म्हणजे त्यांच्या आई करतात.

दोन बहिणी मिळून पॅकेजिंग आणि मार्केटिंग करतात. ऋतू भंसाली यांनी याबद्दलची कुठलीही ट्रेनिंग घेतलेली नाही. आज घडीला everything mom made १७० प्रोडक्ट बनवते. दिवसेंदिवस कस्टमर लोकांची संख्या वाढत चालली आहे. या प्रोडक्टस मध्ये आय सिरम, जिंजर टोनर, अल्मोन्ड सॅफरॉन फेस मास्क, टर्मरिक आय मास्क आणि अशी बरीच प्रोडक्टस आहेत. 

आज घडीला ऑनलाईनची गरज लक्षात घेऊन या तिघींनी मिळून त्यांचा व्यवसाय यशस्वीरीत्या वाढवला आहे. १७ हजार फॉलोअर्स आज त्यांच्या पेजला आहेत. सोशल मीडियाचा वापर फक्त चॅटिंग करण्यासाठी नसतो तर व्यावसायसुद्धा सुरु करण्यासाठी असतो याच उदाहरण या तिघी मायलेकींनी घालून दिलं आहे.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.