यूपीमध्ये २०१४ ला मोदींनी अन आता प्रियांका यांनी झाडू मारला, पण मतदारांचे काय म्हणणे आहे.

आगामी काळात येणाऱ्या काही राज्यांच्या विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभुमीवर सर्वच राजकीय पक्ष प्रचारांच्या कामाला लागले आहेत.  आप-आपल्या विकासकामांचा लेखाजोखा देणे, भाषणं देणे इत्यादी  उपक्रम इत्यादी चालू झालेत. मग त्यात अलीकडेच मोदींचे झालेले भाषण असो वा प्रियांका गांधींचा युपी मधील प्रचाराचा भाग म्हणून दलित वस्तीत झाडू मारण्याचा प्रकार असोत…हे सर्व कृती एक तर प्रचारकार्याचा भाग असतो नाही तर मग प्रांजळपणे समाजकार्याचा भाग असतो.

असो कोण राजकारणी किती प्रांजळ समाजसेवा करतो हा विषय आता इतिहासजमा झालेला आहे. उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरी हिंसाचारानंतर प्रियंका गांधी यांनी युपीत आपल्या प्रचाराचा नारळ फोडला, कदाचित आधीच फोडला असंही म्हणू शकतो.  अगोदर त्यांचा बस मध्ये उभा राहून करत असलेल्या प्रवासाचा फोटो असो, नजरकैदेत ठेवलेल्या खोलीमध्ये झाडू लावणे असो असे अनेक फोटो फक्त प्रियांका यांचेच नाहीतर इतर हि नेत्यांचे आपल्याला येत्या काळात पाहायला मिळू शकतात त्याबद्दल फार अप्रूप वाटायला नको. 

असो आत्ताच्याच एका घटनेवर नजर टाकूया….उत्तर प्रदेशमधील एका दलित वस्तीत प्रियांका गांधी यांनी झाडू मारला. आणि त्यांचा हा व्हिडिओ युपीत चर्चेचा विषय बनला आहे. पण तेथील मतदार काँग्रेसबद्दल काय विचार करतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.  कारण हीच दलित वस्ती एक महत्वाचे ठिकाण झाले आहे कारण इथेच २०१४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशव्यापी स्वच्छ भारत अभियान सुरू करण्यासाठी झाडू हातात घेतला होता. हे अभियान सुरू करण्यासाठी मोदींनी दिल्लीतील वाल्मिकी नगर निवडले होते, जिथे महात्मा गांधी एकदा राहिले होते.

काही माध्यमे तात्काळ या लव कुश नगरमधील वाल्मिकी वस्तीमध्ये तेथील लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घ्यायला गेले. तेथील लोकांचे म्हणणे आहे की, काँग्रेस नेत्याच्या भेटीमुळे त्यांना विशेष वाटले आणि २०१७ मध्ये ज्या भाजपला त्यांनी मतदान केले, त्यांनी दिलेली आश्वासने पाळली नाहीत.

आता, सात वर्षांनंतर, पंतप्रधानांच्या पावलावर पाऊल टाकत, उत्तर प्रदेश काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी वाल्मिकी वस्तीला भेट दिली, वाल्मिकी मंदिराचा परिसर स्वच्छ केला तसेच अनेक कुटुंबांना त्यांनी भेट दिली. येथे राहणाऱ्या अनेक लोकांनी माध्यमांना सांगितले कि, या वस्तीत प्रियांका गांधींना पाहून वस्तीतले लोकं आश्चर्यचकित झाले तसेच आमची भेट घेऊन त्यांनी लोकांची मने जिंकली आहेत असंही त्यांनी सांगितली.

तर काही काही महिलांनी अशी प्रतिक्रिया दिलीये कि,आमच्या आयुष्यात प्रथमच एवढ्या मोठ्या नेत्याला मी समोर पाहिलं. ते हि हातात झाडू घेऊन आमच्या सोबत त्या मंदिराचा परिसर साफ करत होत्या. इतकं करूनही त्या थांबल्या नाहीत तर त्या आमच्या घरी देखील  आमचे घर पाहण्यासाठी आणि सर्वांना भेटण्यासाठी आल्या होत्या.

इंदिरा नगरमधील वाल्मीकी वस्तीमधील अनेक रहिवाशांना भाजपप्रती निष्ठा व्यक्त करण्यास प्रेरित केले होते. लव कुश नगर या दलितबहुल वस्तीत सुमारे ४,००० वाल्मिकी कुटुंबे राहतात. त्यामुळे हा मतदारसंघातील एक महत्वाचा भाग म्हणून ओळखला जातो. 

पण प्रियांकाच्या भेटीमुळे वाल्मिकी समाजातील काही लोकांनी पुन्हा एकदा राजकीय निष्ठा बदलली आहे. हीच लोकं २०१४ मध्ये मोदीं याचं गुणगान करत करत होती पण आता त्यांच्यावर प्रियांका गांधींच्या भेटीमुळे विशेष प्रभाव पडला आहे असं एकंदरीत दिसून येत असलं तरीही राज्यभरातल्या या वाल्मिकी समजाच्या वोटर्स वर काय प्रभाव पडेल किंव्हा नाही पडेल हे सद्या तरी सांगता येत नाही.

काँग्रेसने २०१७ च्या निवडणुकीत ४०३ सदस्यांच्या विधानसभेत फक्त सात जागा मिळवल्या होत्या. आणि येथील प्रदेशात असंही कॉंग्रेसचे संघटन फारसं मजबूत नाहीये. गेल्या काही काळापासून येथील  अनेक माजी आमदार इतर पक्षांमध्ये सामील झाले आहेत.

काँग्रेसची पारंपारिक व्होट बँक असलेल्या दलित समुदायाने गेल्या तीन दशकांपासून इतर पक्षांप्रती निष्ठा बदलली आहे. दोन दशकांपर्यंत उत्तर प्रदेशात वाल्मिकी परंपरेने काँग्रेस समर्थक होते. पण त्यानंतर या समुदायाने दर पाच वर्षांनी दुसऱ्या कोणत्या तरी पक्षाला मतदान केल्याचा अंदाज व्यक्त केला जातो.

थोडक्यात असंय कि, २००७ मध्ये बसपा, २०१२ मध्ये सपा तर २०१७ ला जेंव्हा पंतप्रधान मोदींच्या स्वच्छ भारत मोहीम पार पडली तेंव्हा या समुदायाने भाजपला पाठिंबा दिला. योगायोगाने, तीनही प्रसंगी, ज्या पक्षाकडे तो वळला त्याला सरकार स्थापनेची संधी मिळाली होती. मग आता तिथे कॉंग्रेस सत्तेत येऊ शकतं म्हणायला हरकत नाही कारण आता प्रियांका यांच्या दौऱ्यानंतर या समुदायाचं म्हणन आहे कि, ते पुन्हा एकदा काँग्रेसला मतदान करणार आहेत.

स्थानिक रहिवाशांचे म्हणणे आहे की, आम्ही भाजपला मतदान केलं होतं पण त्यांनी आम्हाला दिलेली  आश्वासने पूर्ण झालीच नाहीत.

कारण याच रहिवाश्याचं म्हणन आहे कि, ‘मोदींनीही झाडू उचलला होता, तेंव्हाही आम्ही आकर्षित झालोत पण प्रियांका यांचा विषय वेगळा आहे. त्यांचा आधार हृदयस्पर्शी वाटतो. त्यांच्याबद्दल विश्वास  वाटतो, आम्ही अगोदर भाजपला मतदान केले पण आता आम्ही त्यांना मतदान करू. त्याने आमच्या समस्या ऐकल्या. त्यांनी आम्हाला आश्वासन दिले आहे की जर काँग्रेस सत्तेत आली तर ती या समस्या सोडवेल. आमच्या कुटुंबातील सदस्य अजूनही बेरोजगार आहेत, काही सफाई कर्मचारी म्हणून करारात काम करत आहेत पण ते कायमचे नाहीत. या सरकारने अनेक आश्वासने दिली पण त्यातील एकही पूर्ण केले नाहीत.

आता प्रियांकाने ज्या वस्तीला भेट दिली, तिथे प्रत्येकजणांनी दिलेल्या प्रतीक्रीयां पाहायला गेल्या तर प्रत्येक जन येत्या निवडणुकीपर्यंत कॉंग्रेसबद्दल तितकाच उत्सुक राहिल कि नाही हे सांगणं मुश्कील आहे.

काहींनी २०२२ च्या विधानसभा निवडणुका आणि २०२४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये वेगवेगळ्या पक्षांना मतदान करणार असल्याचे सांगितलं आहे. या वस्तीमधील निम्मे लोकं काँग्रेसला आणि उर्वरित सपाला मतदान करतील. ते म्हणाले, आम्हाला वाटते की २०२२ मध्ये राज्यांच्या निवडणुकांसाठी सपा अधिक चांगली आहे. तर २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत आम्ही काँग्रेसला पाठिंबा देऊ. कारण  सपाकडे स्थानिक नेतृत्व हे मजबूत आहे, त्यामुळे या समाजातील लोकं राज्य निवडणुकांमध्ये सपाकडे झुकू शकतात असा दावा केला जातोय.

हे हि वाच भिडू :

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.