भगतसिंह कोश्यारींचे पट्ट शिष्य झाले आहेत उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री…!

उत्तराखंडला आता आपला पुढचा मुख्यमंत्री मिळाला आहे. पुष्करसिंग धामी उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री असतील. तिरथसिंग रावत यांनी राजीनामा दिल्यानंतर बऱ्याच नावांची अटकळ बांधली जात होती, पण अखेर पक्षाने युवा नेते पुष्करसिंग धामी यांच्याकडे जबाबदारी सोपविली आहे.

भाजपने धामींचं नाव पुढं करून पुन्हा एकदा धक्कादायक निर्णय घेतला आहे, कारण धामींचं नाव मुख्यमंत्री पदाच्या टॉप ३ मध्ये पण नव्हते. पण आता ते राज्याचे ११ वे  सर्वात तरुण मुख्यमंत्री असतील.

पुष्करसिंग धामी कोण आहेत आणि त्यांना ही जबाबदारी का मिळाली ?

पुष्करसिंग धामी यांच्या नावाचा प्रस्ताव मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणाऱ्या तीरथसिंग रावत यांनी भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत ठेवला होता. तो मंजूर झाला. पुष्करसिंग धामी उद्या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. माध्यमांच्या वृत्तानुसार, शपथविधी सोहळा राजभवनात उद्या सायंकाळी सहा वाजता होईल.

तीरथसिंग रावत यांच्या राजीनाम्यानंतर भाजपने पक्ष विधिमंडळाची बैठक बोलावली होती. केंद्राच्या वतीने कृषीमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांना बैठकीसाठी निरीक्षक बनविण्यात आले. त्यांच्या उपस्थितीतच  धामींच्या नावाची घोषणा झाली.

पुष्करसिंग धामी हे उधमसिंह नगर जिल्ह्यातील खतिमा सीटचे आमदार आहेत. यापूर्वीही या जागेवरुन ते आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्यांचा जन्म १६ सप्टेंबर १९७५ रोजी पिथौरागडच्या टुंडी गावात झाला. त्यांनी मानव संसाधन व्यवस्थापन आणि औद्योगिक संबंधात मास्टर्स केले आहे.

१९९० ते १९९९ पर्यंत त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत वेगवेगळ्या पदांवर काम केले आहे. २०१२ मध्ये ते पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले. या दरम्यान, वेगवेगळ्या जबाबदाऱ्यांबरोबरच लखनौ येथे राज्यमंत्री म्हणून आयोजित अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

त्यांच्या नेतृत्वातच स्थानिक युवकांना राज्यातील उद्योगांमध्ये ७०% आरक्षण देण्यात उत्तराखंड सरकार यशस्वी झाले.

ते भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्षही राहिले आहेत. भाजपाच्या युवा कार्यकर्त्यांशी त्यांचा चांगला संपर्क आहे असे मानले जाते. राज्याच्या भौगोलिक परिस्थितीविषयी अगदी जवळून माहिती असणे, प्रादेशिक समस्या समजून घेणे आणि उत्तराखंड राज्याच्या स्थापनेनंतर २००२ पर्यंत मुख्यमंत्र्यांसमवेत अनुभवी सल्लागार म्हणून काम करणे हे त्यांचं वैशिष्ट्य आहे.

याचं काळात म्हणजे २००१ ते २००२ दरम्यान भगतसिंग कोश्यारी हे उत्तराखंडचे मुख्यमंत्री होते, तेव्हा पुष्करसिंग धामी आणि कोश्यारी यांचा जवळचा संबंध आला. ते कोश्यारींचे ओएसडी होते. तेव्हाचं धामी यांनी त्यांना आपलं गुरु मानलं, तर कोश्यारी यांनी त्यांना शिष्य.. पट्ट शिष्य मानलं..  

पुढे २००२ मध्ये कोश्यारी यांनी आपली संपूर्ण ताकद वापरून धामी यांना युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष पद मिळवून दिले होते, ते देखील एकदा नाही तर दोन वेळा..

२००८ पर्यंत धामी या पदावर होते.  या कालावधीत त्यांनी संपूर्ण राज्यात ठराविक ठिकाणी जावून तरुण बेरोजगारांना संघटित करून मोर्चा आणि परिषद आयोजित केली. त्यांच्या नेतृत्वातच स्थानिक युवकांना राज्यातील उद्योगांमध्ये ७०% आरक्षण देण्यात उत्तराखंड सरकार यशस्वी झाले.

सध्या धामी यांना मुख्यमंत्री बनवण्यामागे तरुण मतदारांना भुरळ घालणे हे एक धोरण असल्याचे राजकीय तज्ञांकडून बोलले जात आहे. पुष्करसिंग धामी भ्रष्टाचारासारख्या मुद्द्यांवर आवाज उठवत राहिले. आणि त्यामुळेच पुष्करसिंग धामींची तरुण वर्गावर  घट्ट पकड असल्याचे मानले जाते. राजपूत समाजातील असल्याने धामी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे देखील निकटवर्तीय मानले जातात.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.