म्हैसूरला आधुनिक बनवण्याचे श्रेय एका मराठी माणसाला जाते

म्हैसूर शहर आज एक प्रगत शहर म्हणून ओळखलं जातं, दसऱ्याच्या वेळी निघणाऱ्या हत्तीच्या मिरवणुका आणि विद्युत रोषणाई हि या शहराची शान आहे, पण म्हैसूरला खऱ्या अर्थाने घडवलं ते एका मराठी माणसाने त्यांच्याबद्दल आज जरा सविस्तरपणे जाणून घेऊया.

मागील काही वर्षांच्या काळात वसाहतवादी आणि रियासत राज्यकर्त्यांमध्ये मध्यस्थ म्हणून काम करणाऱ्या नामवंत दिवानांपैकी एक म्हणजे

श्री विश्वनाथ पाटणकर माधव राव

प्रशासकीय सेवेत असलेलं कसब आणि रियासतीतील समस्या समजून घेण्याची क्षमता व्ही पी माधवराव यांच्यात बऱ्याच आधीपासून होती. लोकांच्या गरजा ओळखून आणि समस्यांवर मात करण्याची त्यांची कला होती.

१९०६ ते १९०९ या काळात म्हैसूर साम्राज्याचे दिवाण आणि १९१० ते १९१३ मध्ये बडोदा अशा दोन्ही ठिकाणी त्यांनी एक कुशल प्रशासक आणि दिवाण म्हणून काम केले. 

तंजावर मराठी देशस्थ ब्राम्हण कुटुंबात व्ही पी माधव रावांचा जन्म झाला. बराच काळ आधी विश्वनाथ पाटणकर माधव राव [१० फेब्रुवारी १८५०-१९३४] सातारा जिल्ह्यातून तनजोर [ आता तंजावर, तामिळनाडू म्हटले जाते ] येथे स्थायिक झाले होते. मराठा तंजोर राज्यावर तंजोर राज्यकर्त्यांनी विजय मिळवल्यानंतर दक्षिण भारताकडे बॉंबे प्रेसिडेन्सी म्हणजे आताचा महाराष्ट्र होता.

१० फेब्रुवारी १९५० मध्ये तंजोर जवळील मद्रास प्रेसिडेंसीच्या कुंभकोणम मंदिरात माधव रावांचा जन्म झाला. त्यांचं शिक्षण विल्यम आर्चर पोर्टरच्या कुंभकोणम कॉलेजमध्ये झाले. १८६९ मध्ये त्यांनी बी.ए. पूर्ण केलं आणि त्याच वर्षी त्यांनी रॉयल स्कुलचे मुख्याध्यापक म्हणून त्यांनी म्हैसूर राज्याच्या सेवेत प्रवेश केला. त्यानंतर ते म्हैसूरचे वकील झाले आणि न्याय आणि महसूल विभागात काम करू लागले.

त्यांच्या कामाच्या गतीमुळे आणि हुशारीमुळे त्यांचं प्रमोशन झालं. इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस, प्लेग कमिशनर, आणि दिवाण म्हणून काम करण्या अगोदर त्यांनी १९०२ पासून ते १९०४ पर्यंत महसूल आयुक्त म्हणून काम केले. त्यावेळी प्लेगचा मोठा धोका निर्माण झाला होता. दिवाण माधवराव यांनी सार्वजनिक आरोग्य आणि स्वच्छता याला महत्व देण्यासाठी लोकांमध्ये जागरूकता निर्माण केली.

जुलै १९०५ मध्ये त्यांनी उंदीर निर्मूलन योजना लागू केली ज्यामुळे २३ हजार उंदीर मारले गेले होते. हि योजना सफल झाल्याने पुढे बेंगळुरूपर्यंत हि योजना वाढवण्यात आली. १९०७-१९०८ मध्ये बेंगळुरू आणि म्हैसूर या शहरांमधून उंदरांचा मोठ्या प्रमाणात नाश झाला. 

माधव राव यांनी ३० जून १९०६ ते ३१ मार्च १९०९ पर्यंत म्हैसूर साम्राज्याचे दिवाण म्हणून काम केले. १९०६ मध्ये त्यांनी पुरेशी सोयीसुविधा असलेल्या राज्याची प्रगती आणि जीवनमान सुधारण्यासाठी अनेक योजना सुरु केल्या. त्यांच्या कार्यकाळात म्हैसूर विधानसभेच्या सदस्यांना कायदे करण्यास सामर्थ्य देणारा कायदा त्यांनी सुरु केला. नवीन विधिमंडळ स्थापन केलं.

महसूल आयुक्त म्हणून काम करताना त्यांनी सरकारी तिजोरीचा भारही सांभाळला. म्हैसूर विभागात लोकांचे आरोग्य आणि कल्याण होण्याचं कारण म्हणजे माधव रावांनी सार्वजनिक आरोग्याच्या विविध समस्यांबाबतीत संबंधित लोक त्या ठिकाणी कार्यरत केले आणि आरोग्यविभाग तयार केले.

प्राथमिक शिक्षणाला जास्तीत जास्त महत्व मिळावं म्हणून माधवरावांनी बालवाडी आणि शाळा राज्यात सुरु केल्या.

प्राथमिक शिक्षण विशेषतः खेड्यांमध्ये विनामूल्य केले गेले आणि शिक्षकांना जास्तीचा पगार आणि बढती देण्यात आली.

म्हैसूरमध्ये शेतीचा महत्वाचा वाटा होता. शेती व उत्पादन सुधरवण्यासाठी माधवरावांनी बरेच प्रकल्प हाती घेतले होते.

शेतीचाच एक भाग म्हणून मरिकानाइट वर्क्स आणि कावेरी पॉवर वर्क्स हे दोन यशस्वी प्रकल्प माधव राव यांनी पूर्ण केले. दुष्काळी कामांवर त्यांनी जास्त लक्ष दिलं आणि चांगल्या पाण्याच्या साठवणुकीसाठी त्यांनी मजबूत टाक्या उभारल्या.

म्हैसूर शहरामध्ये आणि बेंगळुरूमध्ये पहिल्यांदा माधव राव यांनी लाईट आणली. शहरी आणि सैनिकी स्टेशनमध्ये आणि म्हैसूर शहरासाठी त्यांनी विद्युत रोषणाई सुरु केली. १८९९ मध्ये माधव राव यांना इंडियन एम्पायर ऑफ ऑर्डर किताब मिळाला होता. म्हैसूर राजघराण्याचा मानाचा कैसर-ए-हिंद पदक सुद्धा त्यांना देण्यात आलं होतं. 

रोजीरोटी मिळवण्यासाठी म्हैसूरला आलेले माधव राव म्हैसूरला घडवून गेले आणि राज्याला एक आधुनिक रूप देऊन गेले.

हे हि वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.