आणि भारताच्या पंतप्रधानांनी हुंड्यात अख्खा पाकिस्तान मागितला… !

भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या बोलण्याच्या स्टाईलचे कित्येक दिवाणे होते. असं म्हणतात की, त्यांच्या सभेतली बरीच मंडळी स्पेशली त्यांचं भाषण ऐकयला यायची.

आपल्या भाषणातून ते विरोधी पक्षाला अशा काही अंदाजात बोलायचे की, समोरचा थोडा वेळ बुचकाळ्यात पडायचा. 

महत्त्वाचं म्हणजे विरोधी पक्षातले सुद्धा बरेच जण त्यांच्या भाषणाचं फॅन होते

पण ते फक्त एक उत्तम वक्तेचं नव्हते तर, त्यांचा सेन्स ऑफ ह्यूमर सुद्धा कोणापेक्षा कमी नव्हता. ते कोणत्याही गोष्टीला इतक्या सडेतोड उत्तर द्यायचे की, विचारणारा सुद्धा बुचकाळ्यात पडायचा.

अशा त्यांचा बोलण्याचे, भाषणाचे अनेक किस्से फेमस आहेत. असाच एक किस्सा पाकिस्तानात घडला. जेव्हा एका महिला पत्रकाराने भर सभेत अटलजींसमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला होता. 

हूंड्यात मागितला पाकिस्तान

तर हा किस्सा आहे 16 मार्च 1999 सालचा, जेव्हा अटलजींनी पंतप्रधान असताना पाकिस्तानशी चांगले संबंध निर्माण करण्यासाठी पुढाकार घेतला होता. ज्याचे काही चांगले परिणाम सुद्धा दिसायला लागले होते. भारत आणि पाकिस्तान दरम्यान युद्ध बंदी, व्यापार  असे अनेक करार करण्यात आले होते. 

हा आता पाकिस्तानी पलटी मारली तो भाग वेगळा. 

असो तर या कराराचाचं एक भाग म्हणून अमृतसर आणि लाहोर अशी दोन्ही देशांमध्ये एक बससेवा सुरू करण्यात आली. ज्या बसमध्ये बसून अटल बिहारी वाजपेयी स्वतः या बसमध्ये बसून लाहोरला गेले होते. जिथं त्याचं जोरदार स्वागत करण्यात आलं.  

यानिमित्ताने राज्यपाल सभागृहात एक पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी सुद्धा वाजपेयींनी जबरदस्त भाषण दिलं. मात्र, भाषण दिल्यानंतर प्रश्न- उत्तराचं सत्र सुरू झालं.

तिथं बसलेल्या प्रत्येकाच्या प्रश्नाला सविस्तर उत्तर देताना मात्र वाजपेयी पाकिस्तानातील एका महिला पत्रकाराच्या प्रश्नावर मौन बाळगून बसले. 

त्या महिला पत्रकाराने वाजपेयीनी अचानक विचारले की,

तुम्ही आत्तापर्यंत लग्न का केले नाही? मला तूमच्याशी लग्न करायचे आहे.

यावर अटलजी जरा गप्प बसले, बरं ही महिला पत्रकार काय एवढ्यावरच थांबली नाही. ती म्हंटली की, यासाठी माझी एक अट सुद्धा आहे की, तूम्ही मला बदल्यात काश्मीर द्यालं.

महिला पत्रकाराच्या या बोलण्यावर अटल वाजपेयी जरा मिश्कीलपणे हसले. त्यांच्या निर्दोष आणि निष्कलंक प्रतिसादासाठी ओळखले ओळखल्या जाणाऱ्या वाजपेयींनी आपली खूर्ची जागीचं पुढे सरकवली आणि म्हणाले-

मी सुद्धा तूमच्याशी लग्नासाठी तयार आहे, पण माझीही एक अट आहे, मला हुंड्या मध्ये पूर्ण पाकिस्तान हवा आहे.

अटलजींच्या या सडेतोड प्रतिसादामुळे तिथंल्या सगळ्या सभागृह एकचं हशा पिकला.

आजही जेव्हा कधी अटल बिहारी वाजपेयी यांच्या राजकीय आणि वैयक्तिक आयुष्याबद्दल चर्चा केली जाते. तेव्हा- तेव्हा लोक हा किस्सा आवर्जून सांगतात आणि त्या प्रसंगाची कल्पना करून हसतात.  

हे ही वाचं भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.