यांनी “बनवाबनवी” सारखा तुफान सिनेमा लिहला.

हा माझा बायको !!! 

बनवाबनवी तुफान अफलातून आणि कायच्या काय वगैरे टाईपमधला सिनेमा. गेल्या ३० वर्षांपासून म्हाताऱ्याकोताऱ्यांपासून ते चिल्यापिल्यांना पोट धरून हसायला लावणारा सिनेमा. या सिनेमाच वैशिष्ट म्हणजे सिनेमातली कोणतीही तीन मिनिट तुम्ही पाहिली तरी पोट धरून हसता. कधी तुम्हाला लिंबू कलरची साडी दिसते तर कधी बिड्यांची डोहाळे लागलेला परश्या दिसतो. 

अफलातून टायमिंगने अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन आणि सुशांत रे या चौकडीने पिक्चर ओढून काढला. त्यांच्या या अफलातून कॉमेडीच्या मागे होते वसंत सबनीसांनी लिहलेले डॉयलॉग. हे डॉयलॉग पुढे मराठीतले माईलस्टोन होतील अस त्यांना देखील वाटलं नसेल. 

रघुनाथ दामोदर सबनीस ऊर्फ वसंत सबनीस यांचा जन्म झाला तो ६ डिसेंबर १९२३ ला.

पुण्याच्या फर्ग्यूसन महाविद्यालयात शिक्षण झाल्यानंतर साहित्य सहकार या संस्थेत ते दाखल झाले. पुण्याच्या त्यांच्या वास्तव्यात त्यांचे मित्र होते. पुल देशपांडे, राम गबाले, शरद तळवलकर. 

एकापेक्षा एक असणारे असे मित्र मिळाल्यानंतर त्यांची लेखणी बहरली ! साध्या साध्या वाक्यांमधून हशा पिकवण्याची नजर त्यांना मिळाली. सुरवातीला पंढरपुर व नंतर पुणे असा प्रवास झालेल्या सबनीसांनाकडे ग्रामिण आणि शहरी  असा दोन्ही बाज होता. त्यातूनच एकांकिका, नाटक आणि सिनेमा असा प्रवास सबनिसांचा घडत गेला. 

घरोघरी हिच बोंब, कार्टी श्रीदेवी यांसाररखी नाटक त्यांनी लिहली. विच्छा माझी पुरी करा सारखे नाटक तर रंगभूमीवर गाजले. राजा, प्रधानजी सारखी पात्र शहरी पांढरपेक्षा समाजाने स्वीकारली. दादरसारख्या भागात विच्छा माझी पुरी कराचे हाऊसफुल्ल बोर्ड लागू लागले. विच्छा च्या प्रयोगांसाठी दादा कोंडकेंबर ते स्वत: उभा राहिले. गेला माधव कुणीकडे सारखे नाटक तर सलग १० वर्ष हाऊसफुल्ल राहिले. 

Screen Shot 2018 08 06 at 6.01.18 PM
twitter

सबनीसांच वैशिष्ट म्हणजे त्यांनी जी कलाकृती तयार केली ती त्या त्या काळात ट्रेण्ड सेट करणारी ठरली.

विच्छा माझी चे प्रयोग असोत की दादा कोंडकेबरोबर सोंगाड्या, एकटा जीव सदाशिव सारखे गाजलेले सिनेमे असोत. त्यांनी एक विनोदाची एक वेगळीच लाईन पकडली. 

नंतरच्या काळात दादा कोंडकेंबरोबर त्यांच बिनसलं. याच कारण सांगितलं जात ते दादांच्या डबल मिनिंगच्या विनोदाबाबत असणारी त्यांची नाराजी. त्यातूनच गैरसमज वाढत गेले ते पुढे तसेच राहिले. नंतरच्या काळात सबनीसांची भट्टी जमली ती सचिन पिळगावकर सोबत. सचिन पिळगावकर सोबत त्यांनी नवरी मिळे नव-याला’, ‘गंमत जंमत’, ‘एकापेक्षा एक’, ‘अशी ही बनवाबनवी’, ‘बाळाचे बाप ब्रह्मचारी’, असे एकाहून एक धम्माल विनोदी आणि सुपरहिट चित्रपट पडदयावर आणले. 

मराठीत लहान मुलांची मासिके बंद पडत असताना त्यांनी राज्य सरकारच्या पाठ्यपुस्तक मंडळातर्फे किशोर मासिक चालू केलं. वेगळ्या शैलीमुळे त्यांनी ते यशस्वी देखील करुन दाखवलं. असे हे वसंत सबनीस जेव्हा नाट्य संमेलनाचे अध्यक्ष झाले तेव्हा त्यांनी मराठी नाटकांनी लोककलावंताची दखल न घेतल्याची खंत देखील बोलून दाखवली. 

४५ वर्ष आपल्या साध्या सहज आणि सोप्या विनोदाने मराठी चित्रपट सृष्टीचा माईलस्टोन रचणाऱ्या वसंत सबनीसांनी या जगाचा १५ ऑक्टोंबर २००२ ला निरोप घेतला. 

हे ही वाच भिडू. 

2 Comments
  1. Sachin lokare says

    Far chan movie ahe

Leave A Reply

Your email address will not be published.