मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेलं, शेतकरी आत्महत्या झाली तर गावच्या पोलीस पाटलाला जबाबदार धरणार
यशवंतराव चव्हाण यांनी दिल्लीकरांना असा निर्वाळा दिला होता की, “महाराष्ट्र हा वसंतराव नाईक यांच्या हाती सुरक्षित असेल”
वसंतराव नाईक शेतकऱ्यांच्या परिस्थितीची खरी जाण होती. आज शेतकरी आत्महत्या करीत आहेत पण त्याची दुसरी बाजू देखील पाहिली पाहिजे.
१९७१ – ७२ च्या दरम्यान राज्यात पायाभूत सुविधा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध नव्हत्या. त्या वेळी रस्ते, वीज, पाटबंधारे इत्यादी सुविधा देखील नव्हत्या. त्या काळात सामाजिक स्थिती होती त्या मानाने त्यामध्ये आता पुष्कळ सुधारणा झालेली आहे. गेल्या ३०-४० वर्षांपूर्वी जी सामाजिक स्थिती होती त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या नाहीत परंतू आता सामाजिक स्थितीत बरीच सुधारणा झाली असली तरीही शेतकऱ्यांचे बळी जात आहेत.
नाईक असंही म्हणत असायचे कि, दारिद्रय घालवायचे असेल तर शेतीच त्याची गुरुकिल्ली आहे. आणि जर का “शेतकऱ्याला पाणी मिळाले की तो चमत्कार करून दाखवितो”. आणि म्हणून त्यांनी वसंत बंधारा व कोल्हापूरी बंधाऱ्याची निर्मिती केली.
शेतकऱ्यांना नाईक साहेबांनी आणखी एक सल्ला दिला, “जमीन पाटाच्या पाण्याने भिजवा, ते जमत नसेल तर डोक्यावरून पाणी आणा आणि तेही जमत नसेल तर घामाने जमीन भिजवा पण जमीन ओली करा”. म्हणजेच नाईक साहेबांचा जोर हा शेती बागायती करण्यावर देखील असल्याचा त्यांच्या विचारातून दिसून येतो. आणखी एक सुंदर विचार त्यांनी सांगितलेला आहे. “शेतीत राबण्यासारखे दुसरे सुख नाही आणि पेरलेले शेत पिकाने बहरले की पहायला त्यापेक्षा जगात दुसरे अनुपम सौंदर्य नाही”. यावरून नाईक साहेबांचे शेती व शेतकऱ्यांवरचे प्रेम दिसून येते.
१९७२ साली जेंव्हा दुष्काळ पडला होता तेंव्हा रस्ते, एसटी, वीज, पाणी इत्यादी सुविधा नव्हत्या. एका-एका जिल्ह्यात रोजगार हमी योजनेच्या कामावर ५५ लाख मजूर काम करीत होते तरीसुद्धा त्यावेळी शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या नव्हत्या.
पण यामागचं कारण असंय कि, त्यावेळी वसंतराव नाईक हे मुख्यमंत्री होते.
आणि त्यांनी जाहीरपणे असे स्टेटमेंट केले होते की, दुष्काळामुळे कोणत्याही शेतकऱ्याने किंवा मजुराने आत्महत्या केली तर त्या गावातील पोलीस पाटलाला त्यासाठी जबाबदार धरण्यात येईल.
आज दुष्काळाच्या बाबतीत जबाबदारी निश्चित करीत असताना जिल्हाधिकाऱ्यांना किंवा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात येते परंतु पोलीस पाटलाला मात्र जबाबदार धरण्यात येत नाही. पूर्वी पोलीस पाटलाला जबाबदार धरले जात होते आणि त्यावेळी त्यांच्या घरात धान्य जरी नसले तरी संपूर्ण गावातील लोकांकडे त्याचे पुर्ण लक्ष असायचे. परंतु ही संस्कृती आता शासनाने नष्ट करून टाकली आहे एखादा निर्णय घेत असताना त्याचे काय तोटे असतात हे नंतरच्या काळात कळून येते.
पोलीस पाटलांची प्राचीन काळापासुन गावचा कारभार सांभाळण्यासाठी गाव प्रमुखाची महत्त्वाची भुमिका असायची. त्या भुमिकेतील व्यक्ती कायदा व सुव्यवस्था राखण्याबरोबरच सामाजिक समस्या सोडवण्यातही सहभागी असायची. त्यामुळेच नाईक यांनी असं वक्तव्य केलं होतं हे स्पष्ट होते.
हे हि वाच भिडू :
- कोणतीही ऑफर न स्विकारता वसंतराव नाईक मानाने मुख्यमंत्रीपदावरून पायउतार झाले.
- लालबहादूर शास्त्रींच्या पंतप्रधानपदासाठी वसंतराव नाईकांनी महत्वाची भूमिका बजावली होती..
- वसंतराव नाईक विरुद्ध जाबुवंतराव धोटे.