उद्योगपतींच्या खर्चाने परदेश दौरा केल्यामुळे मुख्यमंत्र्यांना माफी मागावी लागली होती

सध्याच्या राजकारणात उठसुठ एक वाक्य बोललं जातं.. ‘हल्ली राजकारणात सुसंस्कृतपणा राहिला नाहीये.’ तसं पाहायला गेलं, तर काहीसं खरंच अशी उदाहरणं दिसून येतात. बेताल वक्तव्य असो की, खाजगी टीका-टिप्पणी असो हे राजकारणी एकमेकांवर तुटून पडतात. पश्चातापाची भावना सोडाच पण साधी औपचारिकता म्हणून माफी मागितली जाते ना त्याबद्दलची तयारी दाखवली जाते.

पण या नेत्यांनी पूर्वीच्या दिग्गज नेत्यांकडून हा शहाणपणा शिकला पाहिजे… याबद्दल उदाहरण म्हणजे एक किस्सा सांगावासा वाटतो…

कधीकाळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असलेले वसंतराव नाईक यांनी एका साध्याशा गोष्टीसाठी जाहीरपणे माफी मागितली होती… त्याचा हा किस्सा…

ते कारण काय असावं तर, उद्योगपतीच्या खर्चाने परदेश दौऱ्यावर गेल्यामुळे मुख्यमंत्र्यांना माफी मागावी लागलेली.
हा विषय वाटायला तसा सोपा आणि साधा वाटत असेल कदाचित तेव्हाच्या प्रोटोकॉल मध्ये हे बसत नसावं…

असो तर थेट किस्सा जाणून घ्या.

वसंतराव नाईक यांनी नेहरू यांना आपल्या निवासस्थानी जेवायला बोलवलं होतं. तेव्हाच त्यांनी नेहरुंच्या कानावर युगोस्लाव्हियाच्या दौऱ्याची गोष्ट टाकली.

नाईक नेहरू यांना म्हणाले, ‘मी येत्या महिन्यात युगोस्लाव्हियाला जावं म्हणतोय! गोव्याच्या चौगुल्यांच्या बोटी आमच्या कोकण किनाऱ्यावर प्रवासी वाहतुकीसाठी सुरू व्हायच्या आहेत. त्यांचा स्वीकार करण्यासाठी.’ त्यावर नेहरू त्वरित उत्तरले, ‘अवश्य जा! टिटोसाहेब आपले मित्र आहेत. त्यांना मीही पत्र लिहीन, तुम्ही येणार आहात म्हणून…
त्यावर नाईक म्हणाले, ‘बरोबर मिसेस नाईकांनाही न्यावं म्हणतोय.’ नेहरू हसतमुखाने बोलले, ‘जरूर न्या! युरोपियन लोकांना एकट्याने भेटीला गेलेलं आवडत नाही. तुम्ही मिसेस नाईकांना न्याच. आणि मॅडम, तुम्ही नाही म्हणू नका.’

वत्सलाबाईंनी मूकपणेच कृतज्ञभाव व्यक्त केले.

पंडितजी दिल्लीला जाण्यासाठी राजभवनावरून जेव्हा सांताक्रुझ विमानतळावर गेले, तेव्हा वसंतराव आणि वत्सलाबाई त्यांना निरोप देण्यासाठी गेले होते. तोच शेवटचा निरोप ठरला. पंडितजी शिणलेले भासत होते. विमानतळावरही नेहमीची गर्दी नव्हती. नेहरू विमानाच्या पायऱ्या उतरून चार पावलं मागे आले आणि त्यांनी छोट्या निरंजनाच्या गालावर चापट मारली. त्याला कुरवाळल्यासारखे केले आणि ते संथपणे पायऱ्या चढून विमानात शिरले.

त्यानंतर जेमतेम नऊ दिवसांनी त्यांचे दिल्लीला देहावसान झाले. नेहरूंच्या निधनाची वार्ता ऐकताच वसंतराव क्षणभर खचून गेले. पण, दुसऱ्याच क्षणी त्यांनी स्वत:ला सावरले. पंडितजींच्या अंत्ययात्रेला ते वत्सलाबाईंसह उपस्थित राहिले.

पंतप्रधान आणि मुख्यमंत्री या नात्याने त्या दोघांचा संबंध गेल्या फक्त सहा महिन्यांचा, पण त्या अल्पकाळात वसंतराव नाईकांनी पंडितजींचा आधीचा विश्वास अधिकच दृढ केला होता. वसंतरावांचे लोकाभिमुख राज्यकारभाराचे धोरण पंतप्रधानांना मनोमन आवडल्याचे अनेक उदहरणांवरून सांगता येईल. त्यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्याच आठवड्यात सीमावासीयांचा एक प्रचंड मोर्चा महाराष्ट्राच्या विधानसभेवर आला होता. ज्येष्ठ नेते बा.र. सुंठणकर मोर्चाच्या अग्रभागी होते. या मोर्चाचे जणू स्वागत करावे अशा रीतीने मुख्यमंत्री नाईक आपल्या विधानसभेतील कार्यालयातून उठून सामोरे गेले! हा एक नवा पायंडा होता. आणि तो पंडितजींना फारसा आवडला नव्हता! पण, जेंव्हा शास्त्रीजींची पंतप्रधानपदी निवड होताच नाईक समाधानी मनाने मुंबईला परत फिरले. जसे महाराष्ट्राचे प्रश्न पंडितजी असताना आपण त्यांच्यासमोर मांडत होतो, तसेच यापुढे लाल बहादूरशास्त्री यांच्या समोरही मांडता येतील, याचा त्यांना विश्वास वाटत होता….

जून १९६४ अखेरीस वसंतराव वत्सलाबाईंसह युगोस्लाव्हीयाला गेले. युरोपचा हा त्यांचा पहिलाच औद्योगिकीकरणाबरोबरच तेथील सहकारी शेती हा त्यांचा निरीक्षणाचा विषय होता. मार्शल टिटोची व त्यांची मात्र भेट होऊ शकली नाही.

परदेशाहून ते परतले तोवर विधानसभेचे पावसाळी अधिवेशन येऊन ठेपले होते. त्या अधिवेशनाच्या प्रारंभीच विरोधी पक्षाने नाईक मंत्रिमंडळावर अविश्वासाचा ठराव मांडला. मुख्यमंत्री नाईक यांची हा ठराव म्हणजे एक कसोटी होती. त्या ठरावावर २७ व २८ जुलै १९६४ या दोन दिवशी गरमागरम चर्चा झाली व त्याला मुख्यमंत्र्यांनी शांतपणे, सविस्तर उत्तर दिले. त्यांच्याविरुध्दचा अविश्वासाचा ठराव ३२ विरुद्ध १८२ मतांनी फेटाळला गेला… परंतु, आपला युगोस्लाव्हीयाचा दौरा एका खाजगी उद्योगपतीने आयोजित केला होता. वातावरण तापत चालले होतेच कि, आपण कबुली दिली ही चूकच झाली, असेही त्यांनी मध्ये आपली विधानसभा सदस्यांसमोर सांगून टाकले.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.