जवळ फक्त जेवणाचा डबा घेऊन बिहार सोडून मुंबई गाठलं अन ‘वेदांता’चं साम्राज्य उभारलं

एखादं स्वप्न साकार करतांना तुमची दृढइच्छाशक्ती महत्वाची ठरते…त्या मार्गक्रमणावर तुमच्यात जिद्द आणि उत्साह असेलच तरच कोणतीही संकटे तुमच्या मार्गात आडकाठी आणू शकत नाहीत. वेदांतचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांचीही अशीच काहीशी कहाणी आहे. 

बिहारमधला एक साधारण मुलगा आपल्या स्वप्नांसाठी मुंबईत आला. त्यांना अनेक संकटांचा सामना करून आपलं ध्येय गाठलं. त्यांचं नाव म्हणजे अनिल अग्रवाल ! जागतिक खनिज बाजारातील दिग्गज आणि वेदांता समूहाचे अध्यक्ष अनिल अग्रवाल. स्वत: अनिल अग्रवाल यांनी सोशल मीडियावर आपली स्टोरी शेअर केली आहे. 

६७ वर्षीय अनिल अग्रवाल यांनी काही दिवसापूर्वी ट्विट करून, ज्या दिवशी ते बिहार सोडून मुंबई गाठली त्या दिवसाची आठवण सांगितली.. त्यांनी लिहिले होते, “लाखो लोकं नशीब आजमावण्यासाठी मुंबईत येतात. आणि मीही त्यातलाच एक होतो. डोळ्यात काहीतरी करण्याचे स्वप्न घेऊन मुंबईत आल्याचे त्यांनी सांगितले. अनिल अग्रवाल मुंबईत आले तेंव्हा त्यांच्याकडे काहीच नव्हते. 

एकच टिफिन बॉक्स घेऊन ते मुंबईला निघाले होते. पण मुंबईत पोहोचल्यावर ते चक्रावून गेले. त्यांनी जे काही चित्रपटांमध्ये पाहिले होते तेच त्यांनी प्रत्यक्ष पाहिले. डबलडेकर बस, काळीपिवळी टँक्सी या सगळ्या गोष्टी त्यांनी याआधी कधी पहिल्याच नव्हत्या. 

त्यांच्या या ट्विटनंतर प्रत्येकांना प्रश्न पडलाय मुंबईत आले तेंव्हा त्यांच्याकडे काहीही नव्हते तर त्यांनी एवढं मोठं साम्राज्य कसं उभं केलं ?

अनिल अग्रवाल हे मूळचे बिहारचे असून त्यांनी भंगार व्यवसायातून छोटासा व्यवसाय सुरू केला आणि त्यातून ते  खाणी आणि धातूचे सर्वात मोठे व्यापारी बनले. त्यांच्या या कंपनीत ६५,००० हून अधिक कामगार काम करतात. फोर्ब्सच्या मते, आत्ताच्या घडीला अनिल अग्रवाल यांची अंदाजे एकूण संपत्ती ३.६ बिलियन डॉलर आहे.…आजच्या काळात त्यांची कंपनी वेदांत ग्लोबल झाली आहे, ही कंपनी भारताशिवाय आफ्रिका, आयर्लंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये व्यवसाय करत आहे.  

अनिल अग्रवाल यांचा जन्म पटना येथे झाला. 

वयाच्या १५ व्या वर्षी शाळा सोडून १९७२ मध्ये वडिलांच्या अॅल्युमिनियम कंडक्टर बनविण्याच्या व्यवसायात मदत सुरुवात केली.  त्यांचा हा कार्यकाळ पुढील चार वर्षे अगदी खडतरपणे चालू राहिला आणि त्यानंतर अनेक लहान-लहान शहरातील इच्छुकांप्रमाणेच अनिलसुद्धा करिअरच्या संधींच्या शोधात वयाच्या १९ व्या वर्षी मुंबई गाठली. 

मुंबईत गेल्यानंतर अग्रवाल हे राहण्यासाठी जागा शोधत असताना ते दक्षिण मुंबईतील ओबेरॉय हॉटेलजवळ पोहचले होते.. हॉटेलच्या राजेशाही वातावरणाने त्यांना इतके प्रभावित केले की त्यांनी तेथे  एक दिवस राहून बघायचं म्हणून त्या हॉटेलात गेले. पण आपण अशिक्षित आहोत त्यात आपल्याला इंग्रजी येत नाही हॉटेलात गेल्यावर चेक इन करायला ते घाबरत होते. शेवटी त्यांनी हॉटेलमध्ये चेक-इन करण्यास मदत करणाऱ्या कुण्यातरी व्यक्तीला पकडले.

अखेर त्यांनी चेक इन करून हॉटेलात गेले, त्यानंतर त्यांच्यातला उद्योजक जागा झाला.

त्यांना एक छान कल्पना सुचली, त्यांच्या लक्षात आले की हे ठिकाण परिपूर्ण आहे आणि त्यांच्या व्यवसायासाठी लोकांना सांगण्यासाठी आणि भेटण्यासाठी हे हॉटेल उत्तम होते. मग ते २०० रुपये देऊन त्यांनी त्याच हॉटेलात राहण्याचा निर्णय घेतला. 

हे असं तीन महिने चाललं. याचा अर्थ काय ते फार पैसेवाले नव्हते, अर्थातच, त्यांनी त्यांच्या किमान खर्चावर अंकुश ठेवण्यासाठी त्यांची कपडे धुण्याची आणि जेवणाची व्यवस्था बाहेर केली होती..आणि इथूनच त्यांनी वेदांता ची सुरुवात केली. 

सुरुवातीला, वेदांतने इतर राज्यांतील केबल कंपन्यांकडून भंगार गोळा करणे आणि मुंबईतील कंपन्यांना विकणे हि स्ट्रॅटेजी मेंटेन ठेवली होती. त्यासोबतच अनिल अग्रवाल यांनी ‘शमशेर स्टर्लिंग कॉर्पोरेशन’ देखील विकत घेतले, ज्याद्वारे इतर उत्पादनांसह तांबे तयार केले.

पुढील १० वर्षांसाठी, त्यांनी फक्त या दोन व्यवसायांचा भक्कम पाया तयार केला! आता हे करत असताना त्यांच्या लक्षात आले की या व्यवसायातील या उत्पादनांची एकूण नफा अत्यंत अस्थिर आहे आणि ती पूर्णपणे त्याच्या कच्च्या मालाच्या तांबे आणि अॅल्युमिनियमच्या किंमतींच्या चढउतारांवर अवलंबून आहे. त्याला तोंड देण्यासाठी अत्यंत हुशारीने धातू खरेदी करण्याऐवजी उत्पादन खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा निर्णय घेतला.

आणि त्यासोबतच १९८६ मध्ये ते केबल्सच्या निर्मितीमध्ये उतरले, कारखाना उभारला. त्यानंतर रिफायनरी उभी केली. त्यांचे हे सगळे व्यवसाय झपाट्याने वाढत होते, त्यामुळे आपला व्यवसाय आणखी मजबूत करण्याच्या प्रयत्नात, अनिल अग्रवाल यांनी खास अॅल्युमिनियम शीट्स आणि फॉइल तयार करण्यासाठी एक प्लांट बनवला आणि त्यासोबतच त्यांन १९९३ मध्ये औरंगाबादमध्ये ऑप्टिकल फायबर तयार करण्यासाठी स्टरलाइट कम्युनिकेशन्स अंतर्गत दुसरा प्लांटही स्थापन केला.

गेल्या काही वर्षांत अनिल अग्रवाल केवळ एक व्यावसायिक टायकून म्हणून अनेक पटींनी मोठे झाले नाहीत तर खाण मालमत्तेचे खाजगीकरण करण्यासारख्या भारत सरकारच्या कामकाजातील काही अत्यंत महत्त्वाच्या कामांना त्यांनी मदत केली. त्यामुळे त्यांची राजकीय लॉबी देखील मोठ्या प्रमाणात मजबूत आहे असं सांगण्यात येतं आणि इथून पुढे कंपनीचा आक्रमक विस्तार सुरू झाला!!!

आज ते धातू, तेल आणि वायूच्या व्यवसायात असून आजच्या घडीला देशातील आघाडीच्या व्यावसायिकांपैकी एक आहेत. 

काहीच वर्षांपूर्वी वेदांत रिसोर्सेसचे मालक अनिल अग्रवाल त्यांच्या मालमत्तेपैकी ७५ टक्के दान करणार असल्याचे जाहीर केले होते…ते नेहेमीच म्हणत असतात कि, पैसा हे सर्वस्व नाही, मला कमावलेली सगळी संपत्ती समाजाला परत करायची आहे. 

जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती बिल गेट्स यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी आपली संपत्ती दान करण्याचा निर्णय घेतला. सर्व ग्रुप कंपन्यांमधून निवृत्त झाल्यानंतर अग्रवाल भारतात धर्मादाय कार्य करणार आहेत. गेट्स यांनी त्यांच्या ८२ अब्ज डॉलरपैकी २८ अब्ज डॉलर चॅरिटीसाठी दान केले आहेत. अब्जाधीश वॉरेन बफे यांनी गेट्स फाऊंडेशनला $४१ अब्ज दान केले आहेत. 

गेट्स यांनी भारतातील सामाजिक कार्यासाठी $१ अब्ज देणगी दिली आहे आणि पोलिओ निर्मूलनातही महत्त्वाची भूमिका बजावली आहे. तर इन्फोसिसचे संस्थापक क्रिस गोपाल कृष्णन यांनीही बंगळुरूच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सला २२५ कोटी रुपयांची देणगी दिली आहे, तर नंदन नीलेकणी यांनी नॅशनल कौन्सिल ऑफ अप्लाइड इकॉनॉमिक रिसर्चला ४८० कोटी रुपयांची देणगी दिली आहे. याच यादीत अनिल अग्रवाल देखील सामील झालेले. 

अनिल अग्रवाल सध्या निवृत्त होण्याचा किंवा इतर कोणतीही जबाबदारी घेण्याचा विचारात नाही. त्यांनी मागेच सूचित केले आहे की या मोठ्या समूहाचे नेतृत्व सध्या त्यांच्याकडे असेल, त्यांचे कुटुंब भविष्यात भागधारक राहतील, परंतु यासारख्या मोठ्या कंपनीची मालकी या कुटुंबापुरती मर्यादित नसावी.  असे सांगून आपल्या कुटुंबातील कोणीतरी आपला उत्तराधिकारी म्हणून कंपनीचे सर्वोच्च पद स्वीकारण्याची शक्यता त्यांनी नाकारली. 

त्याच्या मुलांबद्दल, ते म्हणाले की अग्निवेश आणि प्रियाला “स्वतःचे वेगवेगळे छंद आहेत आणि ते त्यात चांगले काम करत आहेत. पण कंपनी एकाच संस्थेद्वारे चालविली जाईल आणि अनिल अग्रवाल त्यांना मार्गदर्शन आणि सल्ला देण्यासाठी उपलब्ध असतील असं देखील त्यांनी स्पष्ट केलेलं आहे.  

हे हि वाच भिडू :

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.