वीराना फेम जॅस्मीनचं काय झालं ?

 

जॅस्मीन आठवतेय का ? फोटो बघिल्यानंतर लगेच लक्षात आलं असेल अरे हिच ती.. तीच ती ही…

वीराना फिल्मचं भूत. जे बाथटबमध्ये अंघोळ करायला लागलं की प्रेक्षक देखील विसरून जायचे की हे भूत आहे. सामान्य स्ट्रगलर्ससारखं ती देखील नशिब आजमावण्यासाठी मुंबईला आली होती. पण एक्टिंगपेक्षा तिचं दिसणं हे तिच्यासाठी जास्त लकी ठरलं आणि अनलकी पण…

जॅस्मीन विराना फिल्मच्या अगोदर १९७८ मध्ये आलेल्या सरकारी महेमान या सिनेमातून तिन बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली होती. त्यानंतर तिने डायवोर्स नावाचा सिनेमा केला. पण तिला खरं यश मिळालं ते तिच्या विराना फिल्म मधून. रामसे ब्रदर्सनां जॅस्मीन दिसली. त्यांनी तिला साईन केलं. हा सिनेमा भरपूर चाललां. लोकं बाथटबमध्ये असणाऱ्या या भूताचे फॅन झाले. इथपर्यन्त स्टोरी चांगली होती. खरं कांड याच्यापुढे झालं.

Screen Shot 2018 05 12 at 5.32.51 PM

 

जॅस्मीन सोबत नेमकं काय झालं ?

अस म्हणलं जातं की, जॅस्मीनला पाहून तिला अंडरवर्ल्डमधून धमक्या येण्यास सुरवात झाली. डॉन लोक तिला भेटण्यासाठी फोन करु लागले. त्यांना जॅस्मीनला का भेटायचं होत हे वेगळ सांगायची गरज नाही. पुढे जॅस्मीन कुठ गेली ते फिल्म इंडस्ट्रीला माहित नाही की गुगलला पण माहित नाही पण दावे मात्र अनेक आहेत.

जॅस्मीच्या गायब होण्यामागं हेच कारण दिलं जातं. तिला डॉन लोकांचे फोन यायला लागल्यानंतर ती अमेरिकेत गेली. तिथच सेटल झाली. कोण म्हणतं ती सध्या जार्डनमध्ये असते आपल्या नवऱ्याबरोबर सुखाचा संसार करतेय तर कोण सांगत तिला कधीच मेली !

खरतर यापैकी कोणालाच जॅस्मीनच पुर्ण नाव देखील माहित नाही पण थेअरी खूप आहेत. जॅस्मीन बॉलीवडूच्या एका काळ्या बाजूची शिकार झाली म्हणलं तर चुकीचं ठरू नये.

Leave A Reply

Your email address will not be published.