केसांचे गळणे थांबविण्यासाठी उपयुक्त ठरते आपल्या रोजच्या आयुष्यातील ही भाजी.
वय काहीही असो केस गळणे हा नेहमीच चिंतेचा विषय असतो. आपले केस गळायला लागले कि आपण खूप काहीतरी मोठ घडल्यासारख टेन्शन घेतो. याच टेन्शन मध्ये आपण असतो आणि त्या नादात कितीतरी डॉक्टरकडे जाऊन पैसे घालवतो.
टीव्हीवर एका जरी तेलाची जहिरात आली कि आपण ते प्रॉड्क्ट शोधण्यासाठी गावातली सगळी दुकान पालथी घालतो. पण म्हणतात ना पिकत तिथ विकत नाही तसाच काहीसा हा प्रकार आहे. आपण रोजची भाजी म्हणून आजूबाजूला पाहतो त्याच एका भाजीमुळे आपले केस गळणे कायमचे थांबू शकते. अशाच एका भाजीची माहिती तुम्हला सांगणार आहे, ज्यामुळे तुम्हला उगाच केस गळतात म्हणून ढीगभर पैसे खर्च करावे लागणार नाहीत.
त्या भाजीचे नाव आहे कांदा.
कांद्याचा रस केस गळती रोखतो. कारण कांद्यामध्ये सल्फर मात्रा अधिक असते. कांद्याचा रस काढून तो केसांना लावल्यास सल्फरमुळे रक्त संचार चांगला होतो. त्यामुळे कांद्याचा रस हा स्कल्प इंफेक्शन नष्ट करतो.
उपयोग कसा करायचा ते ही वाचा
कांद्याला मिक्सरमध्ये थोडेसे पाणी घेऊन बारीक करा. त्यानंतर कांद्याचा रस काढून घ्या. हा रस्त केसांना लावा. तीन मिनिट हा रस तसाच राहू द्या. त्यानंतर चांगल्या शॅम्पूने केस धुवून टाका. कांद्याचा रस आठवड्यातून तीनवेळा लावणे आवश्यक आहे.
एक कांदा कापून रम भरलेल्या ग्लासात टाकावा. कांदा एक रात्र तसचा ठेवावा. दुसऱ्या दिवशी रम काढून घ्यावी. त्यानंतर कांद्याचे तुकडे वेगळे होतील. या रमने केसांचा मसाज करावा. आठवड्यातून दोनवेळा हा प्रयोग करावा. केस गळायचे कायमचे थांबतील.
कांद्याच्या रसाबरोबर मध लावलेला तर अधिक चांगल. कांद्याच्या रसात थोडासा मध मिसळायचा. हे मिश्रण केसांच्या मुळाशी लावायचे. त्यामुळे केस गळण्याची समस्या दूर होईल.
आकाशवेल (अमरवेल) पाण्यात उकळवा. या पाण्याने केस धुतल्याने केस गळण्याचे थांबतात. एक चमच्या मद आणि एक चमच्या दालचिन पावडरमध्ये थोडे ऑलिव तेल घेऊन त्याची पेस्ट करावी. आंघोळ करण्यापूर्वी केस धुण्याआधी ही पेस्ट केसांना लावायची. १५ मिनिटानंतर गरम पाण्याने केस धुवावे. असं केल्यानंतर काही दिवसांनी केस गळण्याची समस्या दूर होईल.
तुमचे जास्त केस गळत असतील तर तुम्ही चहा आणि कॉफी घेण्याचे टाळा. केस गळण्याचे थांबवायचे असल्यास जास्तीत जास्त पाणी प्या.
मोहरीचे तेल मेहंदीच्या पानावर टाकून पाने गरम करा. ती थंड करून दररोज केसांना लावा. त्यामुळे केस गळण्याचे थांबतील.
मेथीचे बी पाण्यात रात्री भिजत टाका. सकाळी उंबळलेले बी वाटा आणि त्याचा लेप एक तास तरी केसांना लावून त्यानंतर केस धुवा. हे केल्यानंतर काही दिवसांनी केस गळतीचे प्रमाण कमी झाल्याचे पाहायला मिळेल.
हे ही वाच भिडू.
- देवदर्शनासाठी बांधलेल्या जागेचं बायकांनी तुळशीबाग केलं
- आजच्याच दिवशी रघुनाथ माशेलकरांनी हळदीचं युद्ध जिंकल होतं !
- या महिलेमुळे तुमच्या ऊसाचा उतारा वाढला.