त्या दिवशी जिमला भाई गेला नसता तर आज हा दिवस उगवला नसता

सध्या सोशल मीडिया आणि माध्यमांमध्ये गप्पा रंगल्यात त्या अभिनेत्री कॅटरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल यांच्या लग्नाच्या. काल ९ डिसेंबरला दोघांचही एकदम रॉयल स्टाईलमध्ये लग्न झालं. राजस्थानमधील सवाई माधोपूर येथील सिक्स सेन्स फोर्ट बरवारा इथल्या  शाही महालात हे जोडपं विवाह बंधनात अडकलं.

त्यांच लग्न अगदी सुमडीत पार पडलं. म्हणजे शाही महालाच्या गेटपर्यंतच्या सगळ्या खबऱ्या मिळत होत्या पण गेटच्या आत काय घडतंय, याचा कुणालाच पत्त्या नव्हता. लग्नात कोणा बाहेरच्याला परवानगी नव्हती. एवढच नाही तर लग्नात सहभागी झालेल्यांना सुद्धा फोटो लीक करण्याची परमिशन नव्हती.

पण कॅटरिना आणि विकीचं हे लग्न सगळ्यांसाठीच आश्चर्याची गोष्ट होती. म्हणजे त्यांनी ना कधी एकत्र काम केलं ना त्यांच्या अफेअरची चर्चा पसरली. त्यामुळे हे सिक्रेट मॅरेज सगळ्यांसाठीच भुवया उंचावणारा विषय होता.

पण भिडू या लग्नामुळे सलमान खान फॅनमध्ये जरा नाराजीचं आहे बरं का. कारण त्यांची एकेकाळची कॅटरिना भाभी कोणी दुसरचं घेऊन गेलं. महत्वाचं म्हणजे त्यांच्या भाभीच्या लग्नात भाईजानला सुद्धा आमंत्रण होत. पण भाईजान लग्नाला काही आले नाही.  ही म्हणजे जखमेवर मीट चोळण्यासारखी गोष्ट ना. कारण एक काळ असा होता जेव्हा सलमान खान आणि कॅटरिना कैफच्या अफेयरची चर्चा जबरदस्त होती.

बरेच वर्ष त्यांचं अफेअर होत, पण या दोघांनी कधीच याची कबुली दिली नाही. पण ती सगळ्यांच्या आवडीची जोडी होती आणि आजही आहे. त्यामुळचं कॅटरिना विकीसोबत लग्न करत असली तरी सलमान आणि  कॅटरिना त्यांच्याशी संबंधित किस्सेही सध्या व्हायरल होत आहेत. असाच एक इंटरेस्टिंग किस्सा तो म्हणजे भाईजान सलमान खान आणि कॅटरिना कैफच्या पहिल्या भेटीचा.

भाईजानने स्वतः कॅटरिनासोबतच्या आपल्या पहिल्या भेटीचा किस्सा द कपिल शर्मा शोमध्ये  सांगितला. सलमानच्या म्हणण्यानुसार त्याच्या बहिणीने त्याच्याजवळ कॅटरिनाचा विषय काढला होता. आणि बहिणीच्या मदतीनेच ते दोघ एकमेकांना भेटले. त्याची ही  भेट झाली एरोबिक्सच्या क्लासमध्ये.

झिरो फिगर असणारी कॅटरिना  वर्क आउट करायला डबल बर्गर घेऊन आली. आता वर्क आउट करायला आलेलं कुणीही असलं फास्ट फूड खाणं आणि त्यानंतरही एवढं स्लिम, म्हणजे कुणीही बुचकळ्यात पडलं. असचं भाईजान सोबत झालं.

हातात डबल बर्गर घेऊन आलेली कॅटरिना पाहून भाईजान सलमान खानही थक्क झाला. आणि तिथूनच त्यांच्या मैत्रीला सुरुवात झाल्याचं म्हंटल जात. या कपिल शर्माच्या शोमध्ये सलमानने कॅटरिना कैफची लयं खिल्ली उडवली.

त्यांनतर कॅटरिनाने बॉलिवूडमध्ये  एन्ट्री मारली. भाईजानने अनेकांना बॉलिवूडमध्ये आणलं आणि स्टार बनवलं. यात कॅटरिनाचा सुद्धा नंबर लागतो. सलमान खाननेच कॅटरिनाला बॉलिवूडमध्ये येण्यासाठी मदत केली होती. भाईजानला कॅटरिनाचा गॉडफादर सुद्धा म्हणतात.

दोघांनी एकत्र अनेक चित्रपट सुद्धा केलेत. तसंच कामाशिवाय सुद्धा दोघं बऱ्याचदा एकत्र मीडियाच्या कॅमेऱ्यात कैद झालीत. त्यामुळे ते दोघेही एकमेकांना डेट करतायेत हे सगळ्यांनाच माहित होत, फक्त दोघांनी खुलेआम कधी ते स्वीकारलं नाही.

त्यानंतर कॅटरिना कैफ आणि रणबीर कपूर यांच्या अफेरची चर्चा उडाली. दोघांनी आपलं नातं स्वीकारलं सुद्धा होत. पण परत त्यांचं ब्रेकअप झालं. त्यानंतर कॅटरिना आपण सिंगल असल्याचंच सांगत होती. पण अचानक विकी कौशलसोबतच्या लग्नामुळे सगळ्याचं गोष्टी क्लियर झाल्यात.

आता भाईजान आणि  कॅटरिना यांच्यातलं नातं आधी कसं होतं हे महत्त्वाचं नाही, पण आजही त्यांच्यात एक स्पेशल बॉन्डिंग आहे. भलेही दोघे आज रिअल लाईफमध्ये एकत्र नसले तरी रील लाईफमध्ये आजही ही प्रेक्षकांची आवडती जोडी आहे. त्याचे आतापर्यंत आलेले सर्व चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेत.

म्हणजे एकमेकांची केअर करतानाचे फोटो असोत किंवा एकचं कॉफी मग दोघांनी शेअर करतानाचे. त्यांच्यातली बॉन्डिंग नेहमीच दिसून आली, त्यामुळे ते दोघे पुन्हा एकत्र आलेत का अशी चर्चा सुरु होती.

अशा परिस्थितीत कॅटरिनाच्या लग्नात भाईजानच्या सगळ्या फॅमिलीला आमंत्रण होत. त्यामुळे या लग्नात सलमानचे कुटुंबीय नक्कीच सहभागी होतील, अशी अपेक्षा होती. पण तसं झालं नाही. भाईजान सुद्धा एका शोसाठी देशाबाहेर गेला आहे. आता हे व्हॅलिड कारण होतं, का भाईजानने मुद्दाम कल्टी मारली हे भाईजानलाच माहित. पण कॅटरिनाच्या लग्नामुळे भाईजानचा हार्टब्रेक झाला एवढं मात्र नक्की.

हे ही वाचं भिडू :

English Summary: Salman and Katrina had an affair for many years, but they never confessed. But she was and still is the favorite pair of all. Even though Katrina is getting married to Vicky, Salman and Katrina are also going viral. One such interesting case is the first meeting between brother Salman Khan and Katrina Kaif..

 

Web title: VICKAT wedding: Katrina Kaif and Salman khan first meeting

 

Leave A Reply

Your email address will not be published.