दरवर्षी महाराष्ट्र विधानभवनातील पुस्तकं हजार मैलांची सफर करतात !!

१९६० पूर्वी राजकीय नेत्यांमधील एका अनौपचारिक कराराने नागपूर ही महाराष्ट्राची उपराजधानी बनली. त्यात एक अधिवेशन विदर्भात झाले पाहिजे असे नमूद करण्यात आले. ज्यात विदर्भाच्या विकासाच्या मुद्यांवर चर्चा व्हावी  ही तरतूद आहे. त्यानुसारच हिवाळी अधिवेशन नागपुरात घेण्याची प्रथा सुरु झाली. आत्ता अधिवेशन घ्यायचं म्हणजे साधं सोपं काम नाही .

महाराष्ट्राचं विधानभवन आहे मुंबईत. ती चांगली अनेक मजल्यांची दिमाखदार इमारत आहे. इथेच आस्थापनेची सर्व कार्यालय आहेत. तर विधानसभा अणि विधानपरिषद अशी दोन सभागृह हि आहेत. इथे एक मोठं ग्रंथालय ही आहे. चांगलं दोन मजल्यावर त्याचं काम चालतं. एक प्रशस्त अशी स्टडी रूम आहे.

आत्ता तुम्ही म्हणाल ग्रंथालय कशाला ?

अधिवेशन चालू असतांना नेत्यांना सभागृहात अनेक विषय मांडावे लागतात. अनेक गोष्टींवर भाष्य करावं लागतं . विरोधी पक्षाला सत्ता रूढ पक्षाला घेरायचं असतं तर हे सर्व अधिवेशनाच्या गोंधळात कुठे करणार? त्यावेळेस हे ग्रंथालय आणि स्टडीरूम या नेत्यांच्या मदतीस येते. या ग्रंथालयात महाराष्ट्र राज्यात प्रकशित होणाऱ्या सर्व महत्वाच्या वृत्तपात्रांची विषयानुसार कात्रणं कडून ठेवली जातात. सभागृहात आजवर झालेल्या सर्व चर्चा ,सर्व ठराव ,सर्व कायदे यांचा पण रेकॉर्ड व्यवस्थितपणे याच ग्रंथालयात ठेवला जातो. त्याच बरोबरीने इथे काही लाख  संदर्भ ग्रंथ अणि पुस्तके आहेत.

या ग्रंथालयातले सर्व कर्मचारी अत्यंत व्यवस्थित पणे हे सर्व सांभाळत असतात .

अधिवेशन काळात अनेक आमदार ,विरोधी पक्ष नेते ,मंत्र्यांचे सहाय्यक वैगेरे या ग्रंथालयात बर्याचदा आभ्यास करून मुद्दे काढतान  दिसतात. तर भिडू लोक खरा किस्सा असा आहे की ,

जेव्हा नागपूर अधिवेशन असते तेव्हा जवळपास ६०ते ७० टक्के ग्रंथालय नागपूर ला न्यायला लागतंय .

नागपूर हि जरी उपराजधानी असली सर्व निर्णय,शासन नियम सर्वच सरकारी कामे मुंबईत  होतात. त्यामुळे नागपूरला त्याचा रेकॉर्ड ठेवला जात नाही तिथे तसा कोणताही कर्मचारी वर्ग नाही. त्यामुळे तिथे अधिवेशन घेत असताना. संदर्भासाठी लागणारी सर्व पुस्तकं सर्व रेकॉर्ड्स,महत्वाचे संदर्भ ग्रंथ,अनेक फायली,पापेरातील रेकॉर्ड्स , सभागृहातील विविध आयुधांची पुस्तकं ,नियमावल्या त्यांच्या अनेक प्रति, सर्व मंत्रालयांचे वर्गवारीत असलेले शास निर्णय अजून बरीच सारी छोटीे मोठी स्टेशनरी हे सर्व मिळून चार ते पाच ट्रक भरतात .

ही सर्व सामग्री इथील कर्मचारी वर्ग व्यवस्थित पॅक करतो प्रत्येक पॅकिंगवर बारीक शब्दात त्यात कोणती पुस्तक आहेत हे कळावं म्हणून सांकेतिक भाषेत त्यावर लिहालं जातंआणि मग हे सर्व ट्रकस मध्ये लोड केला जातं. त्यानंतर मग ही पुस्तकं  पाचशे मैलांच्या लांब प्रवासाला निघतात. जो सुरु होतो महाराष्ट्राच्या  राजधानीपासून आणि संपतो उपराजधानीत जाऊन .

तर भिडूंनो नागपूर अधिवेशनाच्या दहा ते बारा दिवस आधी विधान भावनातला जवळपास ७०टक्के स्टाफ नागपूरला जातो. मुंबईहून आलेलं हे सर्व समान उतरवून घेतले जाते. परत सर्व सेटअप लायब्ररी सायन्सच्या नियमानुसार शिस्तबद्ध पद्धतीने क्रमवारीत लावला जातो. हे सर्व करायला परत साथ ते आठ दिवस लागतात. ह्या सर्व उपद्व्यापा नंतर नागपूर चं ग्रंथालय पूर्णपणे सज्ज होता अधिवेशना साठी. अधिवेशन झाल्यावर परत ही पुस्तकं मुंबईत त्यांच्या मूळ घरी येऊन स्थिरावतात.

तर भिडूनों, दरवर्षी ही पुस्तकं हजार मैलांची सफर करतात आहे का नाय गंमत?

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.