आयुष्यात अनेक थोबाडीत खाल्या पण ही कानफटात शाहरुख कधीच विसरणार नाही…

बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेते हे शाही परिवारातून येतात, मोठमोठ्या राजघराण्यातून येतात. बॉलिवूडचा उद्योग क्षेत्रात अशी बरीच लोकं आहेत ज्यांचा संबंध हा राजघराण्याशी येतो. पण बऱ्याच जणांना या गोष्टींबद्दल माहिती नसतं. आजचा किस्सा अशाच एका शाही व्यक्तीचा आहे ज्याने बॉलिवूडच्या किंग खानच्या कानफटात लगावली होती.

अभिनेते विजय कृष्णा

हे नाव भलेही आपल्याला माहिती नसेल पण त्यांचा चेहरा आपल्याला माहिती आहे. गुजारिश, ब्लॅक, देवदास अशा अनेक सिनेमांमध्ये विजय कृष्णा यांना आपण पाहिलेलं असेल. विजय कृष्णा हे बॉलिवूडमध्ये नामवंत अभिनेते तर आहेच शिवाय ते गोदरेजचे चीफ एग्झिक्युटिव्ह ऑफिसरसुद्धा म्हणून काम पाहायचे.

विजय कृष्णा यांचा राजघराण्याशीसुद्धा संबंध आहे तेही होळकर घराण्याशी. विजय कृष्णा यांची मुलगी नायरिकाचं लग्न होळकर घराण्यात झालं आहे, नायरिकाचं लग्न होळकर घराण्यातल्या युवराज यशवंत तृतीय राव यांच्याशी झालं आहे. त्यामुळे विजय कृष्णा हे होळकर घराण्याचे महत्वाचे व्यक्ती म्हणून ओळखले जातात. 

अभिनेते विजय कृष्णा यांनी शाहरुख खानला कानफटात मारण्याचा किस्सा काय आहे तर देवदास सिनेमाचं शूटिंग सुरु होतं. या सिनेमात शाहरुख खानच्या वडिलांचा रोल करत होते विजय कृष्णा. या सिनेमाच्या एका सीनमध्ये विजय कृष्णा हे शाहरुख खानला कानाखाली मारतात असा तो सिन होता.

विजय कृष्णा यांनी आपल्या हातातल्या अंगठ्या काढल्या आणि शाहरुखला थोबाडीत दिली पण काही केल्या हा सिन ओके होत नव्हता त्यामुळे सेटवर सगळंच वातावरण तंग झालं होतं.

विजय कृष्णा यांना शाहरुख खानला मारण्यासाठी हात उचलवत नव्हता आणि सेटवर त्यांना अनुकूल वातावरण नव्हतं त्यामुळे  शारुहख खान स्वतः म्हणाला कि मला खरोखर कानाखाली मारा जेणेकरून सीन उत्तम वठला पाहिजे. विजय कृष्णा सुरवातीला कन्फ्युज होऊन मारायचे पण सीन चांगला होत नव्हता. 

शेवटी शाहरुख खानसुद्धा वैतागला आणि त्याने जरा त्राग्याच्या रूपात विजय कृष्णा यांना सांगितलं कि मला खरोखर मारा तुम्ही. ३-४ रिटेक झाले झाले आणि शेवटी बोटातली अंगठी मागे फिरवून विजय कृष्णा यांनी सणकन शाहरुखच्या कानफटात मारली कि सगळेच स्तब्ध झाले आणि शाहरुखसुद्धा दोन मिनटं गडबडून गेला होता.

विजय कृष्णा यांचा तो फटका शाहरुखला कायमचाच आठवणीत राहून गेला.

विजय कृष्णा आणि शाहरुखचा हा सिन दिसायला जितका प्रभावी वाटतो त्यामागे हि हिस्ट्री आहे. पुढे देवदास हा सिनेमा चांगला चालला, शाहरुख खानच्या कारकिर्दीतला एक जबरदस्त सिनेमा म्हणून देवदास ओळखला जातो. गाणी, अभिनय, कथा सगळं जुळून आलं आणि देवदत्त हिट झाला.

विजय कृष्णा यांनी पुढे बऱ्याच सिनेमांमध्ये उत्तम काम केलं. चेन कुली कि मेन कुली सिनेमात त्यांनी साकारलेली कोचची भूमिका बऱ्याच लोकांच्या चांगलीच लक्षात राहिली. 

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.