विजय मल्ल्या याची कॉपी करायला गेला आणि गंडला..

विजू शेठ मल्ल्या, भारतातून फरार सध्या राहणार लंडन

तर हा विज्या म्हणजे एकेकाळचा अब्जाधीश. मद्यसम्राट, विमान कंपनीचा मालक. अवतीभवती सेक्सी मॉडेल्सचा गराडा. त्याला किंग ऑफ गुड टाइम्स म्हणून ओळखलं जायचं. विजू शेठच्या चैनीचे किस्से ऐकून थेट कुबेराला कॉम्लेक्स यावा. पण गड्याने चैनी साठी स्टेट बँकेच लोन उचललं आणि तिथेच गंडला.

असो त्याच्या पळण्याच्या राजकारणाच्या वगैरे स्टोरी सांगून तुम्हाला बोअर करत नाही.

आज आपण वाचणार आहे विज्याच्या आयडॉल बद्दल रिचर्ड ब्रॅन्सन बद्दल.    

रिकी रिचर्ड ब्रॅन्सन. इंग्लंडमधल्या सर्वसामान्य घरात जन्मलेला एक सामान्य मुलगा. अतिशय लाजाळू. अभ्यासात ढिम्म भोपळा. वर्गात त्याला सगळे चिडवायचे. खरं तर त्याला डिसलेक्सिया होता. आपल्या तारे जमीन पर सारखी गोष्ट ओ.

वडील बॅरिस्टर होते, आई एअरहोस्टेस. खाऊन पिऊन सुखी परिवार. पण पोराला डिसलेक्सियामूळ लिहायला वाचायला येण्याचा प्रॉब्लेम. सोळाव्या वर्षी रिचीने शाळाच सोडून दिली.

त्याचं आयुष्य घडण्यात सर्वात मोठं श्रेय कोणाचं असेल तर त्याच्या आईच.   

रिचीचा लाजरेपणा घालवण्यासाठी त्याची आई त्याला लहानपणी वेगवेगळे टास्क द्यायची. कधी कोणाचीही मदत न घेता नातेवाईकांच्या घरी सायकलवरून जाऊन दाखव, कधी कोणाच्या घरातील ओंडके कापून दाखव.

हळूहळू या चॅलेंजेसची त्याला आवडच निर्माण होत गेली. एका सुट्टीच्या सुरुवातीला त्यानं आपल्या आत्याला मी स्विमिंग शिकून दाखवतो अशी पैज लावली. पण पूर्ण सुट्टीभर तो शिकू शकला नाही. आत्याने त्याला खूप चिडवलं. एक दिवस घरच्यांबरोबर गाडीतून फिरायला गेल्यावर त्याने आत्याचं चॅलेंज पूर्ण करायसाठी थेट नदीत उडी मारली आणि तो थेट पोहायला लागला.

प्रवाहाच्या विरुद्ध पोहायची आवड त्याला तिथूनच लागली. ऍडव्हेंचरच दुसरं नाव रिचर्ड ब्रॅन्सन बनलं.

वयाच्या सोळाव्या वर्षी त्याने एक स्टुडण्ट नावाचं मासिक सुरु केलं. यात विद्यार्थ्यांचे प्रश्न, त्यांचे प्रॉब्लेम्स याबद्दल लिहिलेलं असायचं. ते मासिक अगदी थोड्याच काळात फेमस झालं. आसपासच्या शाळेतील मुलं ते विकत घेऊन वाचू लागली. या मासिकात तो बऱ्याचदा मार्केटमध्ये चांगली रेकॉर्ड कोणती आली आहे याच वर्णन करायचा.

स्टुडन्ट रिडर्स रिचीच्या खास रेकमंडेशनची वाट बघत असायचे. पुढे त्याने मासिकवाटत असताना म्युजिक रेकॉर्ड्सची सुद्धा डिलिव्हरी करायला सुरवात केली. बघता बघता रिचीने रेकॉर्ड्सची तुफान विक्री केली. थेट लंडनमध्ये ऑक्सफर्ड स्ट्रीटवर त्याचं शॉप सुरु झालं. दरम्यान या रेकॉर्ड्सच्या टॅक्सवरून त्याच्यावर एक कोर्ट केस देखील झाली, आईवडिलांना स्वतःच राहतं घर गहाण ठेवायला लागलं.

पण गडी डगमगला नाही. या सगळ्यातून बाहेर पडला.

रेकॉर्ड विकून पैसे मिळतच होते. दुकान चांगलं चालत होतं. दुसरा एखादा असता तर त्याने आहे त्यात खुश झाला असता पण रिचीची स्वप्नं मोठी होती. त्याने थेट स्वतःचीच रेकॉर्ड कंपनी सुरु केली. नाव दिलं व्हर्जिन रेकॉर्ड्स.

इथून सुरु झाला त्याच्या बिझनेस टायकून बनण्याचा सिलसिला.

त्याने रेकॉर्ड कंपनी बनवली, रेकॉर्डिंग स्टुडिओ उभारला. गाण्यांसाठी नेहमीच्या पॉप्युलर बँड्सच्या ऐवजी सेक्सी पिस्टल सारख्या वादग्रस्त बँडला संधी दिली. त्याचा जुगार यशस्वी झाला. व्हर्जिन रेकॉर्ड्स फक्त इंग्लंडच नाही तर संपूर्ण युरोपात फेमस झालं. वयाच्या तिशीत पोहचू पर्यंत तो करोडपती बनला होता.

मिडास राजा प्रमाणे हात लावेल त्याला सोनं करायची ताकद या रिची रिचकडे होती.

एकदा अमेरिकेच्या पोर्टो रिकोला तो गेला होता. तिथे काही कारणामुळे त्याची फ्लाईट कॅन्सल झाली. म्हणून त्याने एक चार्टर विमान बुक केलं. बनियावाला दिमाग होता. एकटा जाण्यापेक्षा आपल्या बरोबर विमान कॅन्सल झाल्यामुळे जे जे लोक अडकले होते त्यांना सुद्धा फ्लाईटमधून येण्याची ऑफर दिली. अर्थातच तिकीट काढून.

या प्रवासात त्याला नवीन बिझनेसच्या आयडियाचं आकाश खुलं झालं. एअरलाईन्सच्या बिझनेस मध्ये तुफान पैसे आहे हे त्यानं ओळखलं. १९८४ साली त्याने व्हर्जिन अटलांटिक नावाच्या एअरलाईन्स कंपनीची सुरवात केली. आपल्या व्हर्जिन रेकॉर्ड्सच्या शॉपमध्येच विमानाची तिकीट विक्री सुरु केली.

सुरवातीला एका भाड्याने घेतलेल्या विमानाच्या जोरावर अमेरिका खंडात एअरलाईन सेवा देणारी व्हर्जिन काही दिवसातच इंग्लंडमध्ये ब्रिटिश एअरवेजला टक्कर देऊ लागली होती. कमी पैशात दमदार सेवा,वक्तशीरपणा वगैरे वगैरेची काळजी घेतली. पुढे एअर लाईन्स चा बिझनेस वाढवण्यासाठी आपली रेकॉर्डिंग कंपनी देखील भरमसाठ किंमतीत विकून टाकली.

रिचीची एअरलाईन्स जगातल्या आघाडीच्या एअर लाईन्स मध्ये दिसू लागली.

या एअरलाईन्सचा ब्रँड अँबेसेडर तो स्वतःच होता. हॉटवाल्या एअरहोस्टेस बरोबरचे त्याचे फोटो सगळीकडे झळकायचे. त्याने आपली श्रीमंती हीच यूएसपी बनवली. त्याची लाइफस्टाइल, बिनधास्तपणा, त्याने विकत घेतलेलं आयलंड, त्याची महागडी याट, त्याचा महाल हे सगळे चवीने चर्चले जाणारे विषय होते.

या बरोबर रिचीची आणखी एक ओळख म्हणजे त्याचे स्टंट्स आणि वर्ल्ड रेकॉर्ड. आईने लावलेली चॅलेंजेस ची सवय रिचर्ड ब्रॅन्सनला अजूनही आहे. कधी हॉटेलच्या छपरावरून उडी मारणे, तर कधी जगाला एअर बलूनमध्ये बसून फेरी मारून येणे असं बरंच काय काय त्याने केल.

एकेकाळचा लाजाळू डिस्लेक्सिया असलेला हा मुलगा जगातला सर्वात मोठा ऍडव्हेंचरर म्हणून ओळखला जाऊ लागला.

मधल्या काळात तो टेलिकॉम क्षेत्रात सुद्धा उतरला. त्याचा व्हर्जिन मोबाईल भारतात सुद्धा हातपाय मारून गेला. फक्त मोबाईल नाही तर हॉटेलिंग इंडस्ट्री, फिल्म इंडस्ट्री, व्हर्जिन कॉमिक्स, व्हर्जिन फ्युएल, व्हर्जिन मीडिया एवढंच काय तर व्हर्जिनगॅलॅक्टिक नावाची स्पेस कंपनी सुद्धा सुरु केली.

आज रिचर्ड ब्रॅन्सन हा जगातील सर्वात श्रीमंत माणसांपैकी एक आहे. भारतात सुद्धा तो फेमस आहे. आपल्या सल्लू, अजय देवगणच्या लंडन ड्रीम्स सिनेमात देखील त्याने एक झलक मारली होती. नुकताच आपले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबरोबर मुंबई-पुणे हायपर लूप रेल्वेची चर्चा त्याने केलीय.    

हे सगळं चाललं होत तेव्हा एक माणूस हळूच त्याच निरीक्षण करत होता. तो म्हणजे आपला विजू उर्फ विजय मल्ल्या.

विजूच्या बाबांची दारूची कंपनी होती. त्यांच्या मृत्यूनंतर वयाच्या २८व्या वर्षी त्याचा मालक झाला. सुरवातीला कंपनी व्यवस्थित चालवली. त्यांची किंगफिशर बियर जगात नाव कमवणारी बियर बनली. बाबा पेक्षाही कितितर पट पैसे विजयने कमवले. सगळं एकदम व्यवस्थित चाललं होतं पण तेव्हढ्यात त्याला रिची ब्रॅन्सन बनायचं खूळ त्याच्या डोक्यात शिरलं.

0 jpg

रिची प्रमाणेच त्याने किंगफिशर एअरलाईन्स सुरु केली. हेअर स्टाईल दाढी अगदी सेम रिची सारखी ठेवून तसेच लाल ड्रेस घालणाऱ्या सेक्सी एअर हॉस्टेस बरोबर तो फोटो काढू लागला. सेम टायच्या सारखंच घर विकत घेतलं, तशीच याट विकत घेतली. एवढंच काय तर फॉर्म्युला वन टीमपण विकत घेतली.

1 jpg

 पण हे सगळं करत असताना तो एक गोष्ट विसरला की रिची कितीही दाखवत असला तरी तो चैनीखोर नाही.

आणि विशेष म्हणजे रिचर्ड ब्रॅन्सनच्या पॅंटचा नाडा टाईट आहे. पहिल्या बायकोबरोबर त्याचा डिव्होर्स झाला पण त्यानंतर गेली चाळीस वर्ष रिची जोयाना या आपल्या दुसऱ्या बायकोबरोबर एकनिष्ठ आहे. सेक्सी एयरहोस्टेस, हॉट मॉडेल्स बरोबर पार्टी, फुल दारूचा पाऊस वगैरे दिसत असलं तरी ब्रॅन्सन खऱ्या आयुष्यात अजूनही लाजाळू आणि गप्प आपण भलं आपलं काम भलं या टाईपचा आहे. त्याची चैनी, त्याच्या भोवतीच्या पोरी हे फक्त एक मार्केटिंग गिमिक आहे. मोठ्या प्रमाणात समाजसेवेवर तो पैसे खर्च करतो.

या कोरोना पँडेमिक मध्ये सुद्धा रिचर्ड ब्रॅन्सन जगातील सर्वात मोठ्या दान करणाऱ्या व्यक्तींपैकी एक आहे. 

आपल्या विज्याने नेमकं याच्या उलटं केलं. लोकांचे पगार थटवून पार्ट्यांमध्ये पैसे उडवले. चैनीच्या नादात एअरलाईन्स बुडवली. दोन तीन लग्नं, सत्राशेसाठ अफेअर्स यामुळे त्याच नाव चुकीच्या कारणासाठी गाजत राहिलं.

f1 bahrain gp 2009 vijay mallya force india f1 team owner and kingfisher ceo and sir richa
26.04.2009 Manama, Bahrain,
Vijay Mallya (IND), Force India F1 Team, Owner and Kingfisher CEO and Sir Richard Branson (GBR) CEO of the Virgin Group – Formula 1 World Championship, Rd 4, Bahrain Grand Prix, Sunday Pre-Race Grid – www.xpb.cc, EMail: info@xpb.cc – copy of publication required for printed pictures. Every used picture is fee-liable. © Copyright: xpb.cc

ढेरपोट्या विजूला ब्रॅन्सन सारखे स्टंट कधी जमले नाहीत, विश्वविक्रम तर लांब राहिलं. पण वॉरंट निघाल्यावर रेकॉर्ड टायमिंग भारत सोडून फास्टात लंडन गाठण्याचा विक्रम मात्र त्याच्याच नावावर राहील. आज दुनिया रिचीला सर रिचर्ड ब्रॅन्सन म्हणून ओळखते तर विजय मल्ल्याला फरार आरोपी.       

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.