एकेकाळी गोव्यात काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवणारा हा ‘विजय’ आतातरी काँग्रेसला जिंकून देईल का?

 गोष्ट आहे ५ वर्षांपूर्वीची. २०१७ च्या विधानसभा निवूडणुकीमध्ये  काँग्रेस गोव्यात सगळ्यात मोठा पक्ष ठरला होता .  २१ ची बहुमताची मॅजिक फिगर गाठण्यासाठी  १७ जागा जिंकणाऱ्या काँगेसला अवघ्या ४ जागांची गरज होती . बीफ बंदीसारख्या मुद्द्यांवरून भाजपवर उघडपणे टीका करनारे विजय सरदेसाई यांची गोवा फॉरवर्ड पार्टी आणि अपक्ष यांना सोबत घेऊन काँगेस सहज हा आकडा  गाठेल अस वाटत होत. मुळच्या कॉंग्रेसीच असलेल्या सरदेसाई यांच्या गोवा फॉरवर्ड पार्टीने पहिल्याच निवूडणुकीत ३ जागा जिंकत आता  किंगमेकरची जागा घेतली होती.  

मात्र  मनोहर पर्रीकर आणि नितीन गडकरी या जोडगळीने १३ जागा जिंकूनही रातोरात भाजपाचा सरकार बनवल. मनोहर पर्रिकर यांना मुख्यमंत्री बनवण्याच्या अटीवर गोवा फॉरवर्ड पार्टी आणि महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टी हे अगदी वेगळ्या विचारधारेचे पक्ष एकत्र आले. सरकारमध्ये  विजय सरदेसाई यांना उपमुख्यमंत्रीपद  देण्यात आल.  

काँग्रेसच्या अगदी हातातोंडाशी आलेला घास त्यावेळी  राज्यप्रभारी असलेल्या दिग्विजयसिंग यांच्या निष्क्रियतेमुळं हिरावला  गेला होता.

अवघ्या ३ आमदारांच्या जीवावर  सरदेसाई अगदी निवांत मंत्रिपद भोगत होते  . आपल्यामुळंच हे सरकार आहे हे त्यांनी चांगलंच  हेरला होता. भाजपाबरोबर सत्तेत राहुनही बीफ बॅन सारख्या निर्णयांना त्यांनी कडाडून विरोध केला . मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतर मात्र सरदेसाईंचे ग्रह फिरले.

काँगेसचे १० आमदार फोडत आता भाजपने आता स्वतःच्या जीवावर बहुमत जमवलं होतं . त्याचबरोबर त्यांनी  सरदेसाईंचा मंत्रिपदही काढून घेतल. याचा बदला घेण्यासाठी सरदेसाई २०२२ च्या निवूडणुकीची वाटच पाहत होते . त्यासाठी त्यांनी तृणमुल काँग्रेसशी बोलणंही चालू केला होता. मात्र तृणमूलनही त्याना धक्का देत गोवा फॉरवर्ड पार्टीच्या कार्यकारी अध्यक्षालाच आपल्याकडे  ओढलं .

राज्यसभेवर घेण्याचं आश्वासनही तृणमुलने पाळलं नसल्याचा आरोपही  सरदेसाईं यांनी केला. एवढे धक्के पचवून मग ‘जिसका कोई नहि उसका काँग्रेस’ या उक्तीप्रमाणे आता ते काँग्रेसकडे वळलेत.

यासाठीच विजय सरदेसाईनी काल राहुल गांधी यांची भेट घेतली. ज्यांनी गोव्याला पहिल्यांदा मुक्ती मिळवून दिली (पंडित नेहरू ) त्यांच्या पणतूबरोबर गोव्याच्या दुसऱ्या मुक्तीसाठी काम करणे अभिमानाची गोष्ट् आहे. अश्या आशयाचे ट्विट त्यांनी केले.  गोवन माणूस , गोवन संस्कृती याचे राजकारण म्हणजेच आपल्या ट्रम्पतात्यांच्या शब्दात सांगायच झाल्यास ‘गोवा फर्स्ट’ च  राजकारण सरदेसाई करतात.

एकेकाळी गोव्याच्या राजकारणातील उगवता तारा म्हणुन गणले जाणारे सरदेसाई यांच्या राजकारणाला मागच्या पाच वर्षात चांगलेच ग्रहण लागले आहे. 

गोव्यात झालेल्या राजकीय उलथापालथीत सरदेसाईंनी सगळ्यात जास्त गमावलं आहे . येणारे इलेक्शण त्यानं आपले प्रस्थ पुन्हा प्रस्थापित करण्याचा एक लास्ट चान्स असणार आहे .

काँग्रेसला पण ममतादीदी आणि केजरीवाल यांच्यामुळे  होणारी  भाजपविरोधी मतांमधील  फूट भरून काढण्यासाठी एका प्रादेशिक साथीदाराची गरज होती. ती आता विजय सरदेसाई यांच्या रूपाने पूर्ण होणार आहे. 

मात्र त्याचबरोबर विजय सरदेसाई यांचं प्रादेशिक अस्मितेचा राजकारण आणि काँग्रेसची राष्ट्रीय पक्ष म्ह्णून असणारी छबी यांचा ताळमेळ कसा लागतो हे बघणेही महत्वाचे ठरणार आहे . काँग्रेस आणि गोवा फॉरवर्ड पार्टी यांची मागील ५ वर्ष्यात झालेल्या वाताहतीला बऱ्यापैकी भाजपचं जबाबदार . त्यामुळे बदला घेण्याच्या भावनेने पछाडलेले हे दोन ‘घायाळ शेर’ आपल लक्ष्य साधण्यात यश्स्वी ठरतात का? हे पाहणे येणाऱ्या निवुडणुकीत औत्सुक्याचे ठरणार आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.