दुर्मिळ पुस्तके ऑफलाईन बरोबरच ऑनलाईन विकून विकास बुक डेपो देशात टॉपला पोहचलं

आपल्या फोनमध्ये कित्येक ॲप असतात, त्या ॲपच्या माध्यमातून आपण तब्बल करोडो रुपयांचा व्यवसाय उभा करू शकतो का? ते ही पुस्तक विकून ? आता तुम्ही म्हणाल करोडोचा व्यवसाय ठीक आहे, पण पुस्तक विकून भिडू काय बोलता तुम्ही? 

सर्वात महत्वाचं म्हणजे पुस्तक आता जास्त कोण विकत घेतं? सगळे ऑनलाईनच वाचतात. पण  पुण्यातल्या अप्पा बळवंत चौकात असलेल्या विकास बुक हाऊस ने मात्र भारतातल्या समस्त पुस्तक प्रेमींचा प्रीमियम लेव्हल बुक सेलर म्हणून पसंती मिळवली आहे.

पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात पुस्तकांचा चौक म्हणून फेमस असलेल्या अप्पा बळवंत चौकात शांतीलाल राजवाडे यांचे १९८२ पासून विकास बुक हाऊस हे पुस्तकांचे दुकान आहे.  

२०१३ साली सिंहगड कॉलेज मध्ये मॅनेजमेंट शिकणारा शांतीलाल यांचा मुलगा संकेत यांने विकास बुक हाऊसची धुरा स्वताच्या खांद्यावर घेतली. संकेत पडला मॅनेजमेंट विद्यार्थी त्यामुळे बारकाईने निरिक्षण करण्याची त्याला सवय होती. 

तेव्हा त्यांच्या लक्षात आले, आपले ग्राहक दिवसेंदिवस कमी होत आहे, काय कारण असेल? तेव्हा त्यांच्या लक्षात आले. आता अधिक लोक हे ऑनलाइन पुस्तक खरेदी करत आहेत. २०१४ साली मेझोन नुकतचं भारतीय बाजारपेठेत दाखलं झालं होतं. सर्वात आधी मेझोनने ऑनलाइन पुस्तक विक्री सुरू केली होती. बहुदा हा त्यांचाचा परिणाम असावा. 

संकेतला तंत्रज्ञानाचे उत्तम जान होती. 

त्याने मेझोनसह इतर दोन तीन ऑनलाईन वेबसाईटवर सेलर म्हणून विकास बुक हाऊसची नोंद केली. संकेत म्हणतो ‘केवळ दोन दिवसांत आमच्या दुकानांची सेलर म्हणून नोंद झाली, जेव्हा मी त्या वेबसाईटवर आमची सर्व माहिती भरली तेव्हा आपण बदलत असलेल्या युगा सोबत बदलावे म्हणून नोंद केली, त्यातून काही फायदा होईल अशी काही अपेक्षा नव्हती.

नोंदनी  केलीच आहे तर संकेत याने त्या वेबसाईटवर असणाऱ्या ग्राहकांच्या मागणीचा अभ्यास करायला सुरुवात केली. संकेतने एक दिवस सहज असे पुस्तक विक्रीसाठी ठेवले जे दुर्मिळ होते. संकेत यांचा अंदाज बरोबर ठरला, दुर्मिळ पुस्तकांना संपूर्ण भारतातून मागणी होती. ते पुस्तक दोन दिवसातच विकले गेले. 

संकेत यांनी त्यांच्या दुकानातली अशीच दुर्मिळ आणि रिसर्चसाठी उपयुक्त असलेली पुस्तके तसेच ज्या पुस्तकांना अधिक मागणी आहे अशी पुस्तके ऑनलाइन विक्रीसाठी टाकायला सुरुवात केली. 

संकेतला आता ऑनलाइन पुस्तक मार्केटचा बरोबर अंदाज आला.रिसर्चची पुस्तके ऑफलाइन दुकानात जी वर्षात ७ ते ८ विकली जायची ती ऑनलाइन आठवड्याला २० ते २५ विकू लागली. संकेत अनेक ऑनलाइन वेबसाईटवर पुस्तके विकत होता पण मेझोन वगळता इतर वेबसाईटचा संकेत यांचा अनुभव काही खास नव्हता. त्यामुळे इतर वेबसाईटवरची पुस्तक विक्री थांबविली आणि फक्त मेझोनवर लक्ष केंद्रित केले. संकेतचे ऑफलाइन दुकान त्यांचे आई-वडील यांनी सांभाळले.

आजच्या घडीला संकेतच्या विकास बुक हाऊसची १० हजाराहून अधिक पुस्तके लिस्टेड आहेत.

 संकेतचे हे  “वर्चुअल बुक शॉप” चालविण्यासाठी तब्बल २८ कर्मचारी काम करतात. संकेतला दररोज दीड हजराहून अधिक ऑर्डर मिळतात. फक्त मेझोनवरील  “वर्चुअल बुक शॉप”च्या  माध्यमातून १४ कोटीचा व्यवसाय होतो. ऑनलाइन आणि ऑफलाइन मिळून तब्बल 26 कोटी इतके वार्षिक उत्पन्न मिळते.

संकेत म्हणतो एक वेळ अशी होती की, मी ॲमेझोनवर माझ्या दुकानातील पुस्तके विक्री करेल असे वाटले देखील नव्हते. पण हे सर्व केवळ तंत्रज्ञानामुळे शक्य झाले आहे. काळाबरोबर बदल केला की तुम्ही दोन पाऊले पुढे निघून जातात. 

माझ्या वडिलांनी सुरुवातीला एका पुस्तकाच्या दुकानात कर्मचारी म्हणून काम सुरू केले होते. त्या नंतर त्यांनी विकास बुक डेपो सुरू केले आणि आज विकास बुकहाऊस    संपूर्ण देशांत  पुस्तक प्रेमीची पहिली पसंत ठरला आहे. विकास बुक हाऊस  दुर्मिळ पुस्तकांसाठी पुण्यात प्रसिद्ध होते पण आता मात्र संपूर्ण देशांतून दुर्मिळ पुस्तके ऑनलाइन मागविली जातात. 

सात-आठ हजार रुपये किंमतीची पुस्तके देखील संशोधक आणि विद्यार्थी मागवतात. 

शेवटी एकच तुम्हाला एक यशस्वी उद्योजक होण्यासाठी मुख्य बाजारपेठे एक दुकान घेऊ, मोठे भांडवल गुंतवणूक करून व्यवसाय उभे करणे गरजेचे नाही. मेहनत,जोश आणि सातत्य असेल तर देशांच्या कोणत्याही कोपऱ्यातून तुम्ही व्यवसाय करू शकतात.

पण एक मात्र आहे जे पुणेकरांच्या पसंतीस उतरते ते देशांत देखील तितकंच चालतं, कारण पुणेकर चोखंदळ आहेत.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.