जिथे विकास दुबेला ठोकलं तिथेच आणखी आरोपींची गाडी पलटली आहे.

विकास दुबे आठवतोय का ? इतक्या मोठ्या वादाचा विषय होता. याच विकास दुबेला मध्य प्रदेश मधल्या एका मंदिराबाहेर पकडला गेला अन त्याचं कानपुरमध्ये एन्काऊंटर झालं….त्याला २ गोळ्या लागल्या, एक छातीत तर दुसरी कमरेला अन मारला गेला. कानपूरच्या चौबेपुर येथील बिकरू गावात डीएसपी सहित आठ पोलिसांच्या हत्येत विकास दुबे मुख्य आरोपी होता.

कानपूरमध्ये विकास दुबेची गाडी काय पलटणे आणि त्यानंतर त्याचा एन्काऊंटर काय होणे यावर विरोधकांकडून अजूनही प्रश्न केली जातात. विकास दुबे मारला गेला विषय संपला पण विषय संपला असंही म्हणता येत नाही कारण जिथं ज्याठिकाणी विकास दुबेची गाडी उलटली होती इथेच सहा कुख्यात गुंडांची गाडीसुद्धा पलटी झाली अन पोलिसांनी त्यांना पकडलं. आता हा योगायोगच म्हणायला लागेल. कारण आत्ता घडलेली घटना तशी म्हणायला साधी-सरळ आहे, पण….

 जिथं विकास दुबे ला ठोकलं तिथेच आज हे गुंड देखील पोलिसांच्या हाती लागले.

असो तर विषय असाय कि, ६ कुख्यात गुंड एक मर्डर करून पळत होते अन पोलीस त्यांचा पाठलाग करत होते तेवढ्यात त्यांची गाडी पलटी खाल्ली अन ते पोलिसांना गावले. पण यावेळी पोलिसांना आरोपींवर गोळीबार करण्याची गरज नव्हती. सर्व आरोपींना त्यानंतर अटक करण्यात आली.

हि घटना १७-१८ ऑक्टोबरच्या मध्यरात्री घडली. पोलिसांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी १६ ऑक्टोबरच्या रात्री कानपूरमध्ये किरकोळ वादातून आशिष नावाच्या तरुणाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. फांजलगंज येथील रहिवासी प्रांशु, आशु आणि त्यांचे सहकारी यांच्यावर हा आरोप लावण्यात आला. प्रांशु आणि आशिष यांना शिवीगाळ केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. शिवीगाळमुळे  प्रशू खूप चिडला. याच रागाच्या भरात प्रांशु त्याच्या साथीदारांसह पोहोचला. आशिषला घरातून बाहेर ये हे सांगायला फोन केला. आणि मग तो बाहेर आल्यानंतर त्याला गोळ्या घातल्या.

हत्या झाल्यानंतर सर्व टोळी एका इनोव्हा कारने दिल्लीच्या दिशेने पळून गेले. पोलिसांनी पाठलाग केला. कानपूरमधील बारा टोल प्लाझासमोर पोलीस आणि आरोपींमध्ये समोरासमोर होते. समोर पोलिसांना पाहून आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला पण त्याचवेळी त्यांची कार उलटली.

पोलिसांच्या सांगण्यानुसार सांगितले की वाहनात एकूण ६ आरोपी होते. वाहन उलटल्यानंतर पोलिसांनी ४ आरोपींना वाहनातूनच अटक केली. त्याचवेळी दोन्ही आरोपी पळून गेले. पण फार लांब पळू शकले नाही. थोडे पुढे गेल्यानंतर पोलिसांच्या टीमने दोघांनाही पकडले.  मुख्य आरोपी प्रांशु याला अटक झाल्यानंतर, आशिषच्या हत्येमागील कारण स्पष्ट झाले. त्याने सांगितले की, आशिषने प्रांशुच्या आई आणि बहिणीला शिवीगाळ केली. यावरून त्याच्या आणि आशिषमध्ये बाचाबाची झाली. यादरम्यान आशिषला गोळी लागली. पण त्याने हेतुपुरस्सर हत्या केली नाही असंही जबाबात स्पष्ट केलं आहे.

हे हि वाच भिडू :

 

 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.