विवाहबाह्य संबंध टिकवण्यासाठी विक्रम साराभाईंनी अहमदाबादमध्ये IIM ची स्थापना केली
विक्रम साराभाई हे कोण होते, त्यांच योगदान काय होतं, ते किती मोठ्ठे होते व ते अजून काही वर्ष असते तर त्यांनी भारताला तंत्रज्ञानात कुठे नेलं असतं हे वेगळं सांगायला नको.
पण बऱ्याच मोठ्या व्यक्तींच्या अनेक छोट्या छोट्या गोष्टी चर्चेत येत असतात.
अशीच अधून मधून चर्चेत येणारी गोष्ट म्हणजे त्यांच्या विवाहबाह्य संबंधाची. कमला चौधरींसोबत असणारे त्यांचे संबंध अधूनमधून चर्चेत येत असतात आणि तितक्याच वेगाने ते खाली बसत असतात.
असच एक पुस्तक आहे सुधीर कक्कड यांच यामध्ये अहमदाबादमध्ये स्थापन करण्यात आलेल्या IIM साठी विक्रम साराभाई यांचे हेच विवाहबाह्य संबंध कसे कारणीभूत ठरले यांची गोष्ट सांगण्यात आली आहे.
आत्ता हे सुधीर कक्कड म्हणजे कोण तर ते कमला चौधरी यांचे पुतणे आहेत. स्वत: मनोविश्लेषक आहेत. त्यांच्या पुस्तकाचं नाव आहे “अ बुक ऑफ मेमरी” याच पुस्तकात त्यांनी हा किस्सा लिहला आहे.
त्यांनी लिहलय की,
कमला आणि विक्रम साराभाई यांच्या पत्नी मृनालिनी यांचे खूप चांगले संबंध होते. कमला विधवा होत्या. त्या स्वत: उच्चशिक्षित होत्या आणि त्यावेळी अहमदाबाद टेक्सटाईल इंडस्ट्रीज रिसर्च असोशिएशन अर्थात ATIRA मध्ये काम करत होत्या. पत्नी मृनालिनीमुळे कमलासोबत त्यांची ओळख झाली. त्या विधवा असल्याने विक्रम साराभाई यांच्या मनात त्यांच्याबद्दल एक सॉफ्ट कॉर्नर तयार झाला आणि याचच रुपांतर पुढे विवाहबाह्य संबधात झालं. त्यांचे हे संबंध तब्बल २० वर्ष टिकून होते.
लव ट्रॅन्गल सुरूच होता पण कमला चौधरींना यातून बाहेर पडायचं होतं. विक्रम साराभाई यांच्यापासून दूर जाण्यासाठी त्या कारण शोधू लागल्या. त्यासाठी अहमदाबाद सोडूनच बाहेर जाण्याचा एकमेव पर्याय त्यांना दिसत होता.
याच काळात त्यांना दिल्लीतून नोकरीची ऑफर आली. त्याच ठिकाणी जावून स्थायिक होण्याचा निर्णय त्यांनी घेतला. ही गोष्ट विक्रम साराभाईंना समजली. विक्रम साराभाईंनी ही ऑफर नाकारून कमला चौधरींनी अहमदाबादमध्ये राहण्याचाच विचार करावा यासाठी शक्य ते प्रयत्न करण्यास सुरवात केली. दूसरीकडे नोकरीची ऑफर चांगली असल्याने कमला चौधरींना तशीच दुसरी ऑफर अहमदाबादमध्ये देण्यात यावी असे प्रयत्न चालू ठेवले.
सुधीर कक्कड आपल्या पुस्तकात पुढे लिहतात की,
साराभाईंनी त्यांना पहिल्यांदा फिजिकल रिसर्च लॅबोरेटीचे डायरेक्टरपद देवू केले त्यांनंतर त्यांनी लंडनमध्ये असणाऱ्या टेविस्टॉक इंस्टिट्यूटकडे अहमदाबादमध्ये दूसरं सेंटर सुरू करण्याची मागणी केली. पण या गोष्टी सक्सेस झाल्या नाहीत. त्याचवेळी मुंबईमध्ये IIM काढण्याचा प्रस्ताव सरकारकडे आला होता.
विक्रम साराभाईंनी आपली सर्व ताकद पणाला लावून IIM अर्थात इंडियन इस्टिट्यूट ऑफ मनेंजमेंट अहमदाबादला स्थापन करण्याचा प्रस्ताव समोर केला. हा प्रस्ताव स्वीकारला गेला आणि कमला चौधरी यांची नियुक्ती IIM च्या पहिल्या रिसर्च डायरेक्टर म्हणून करण्यात आली.
या गोष्टीतल्या तथ्यांवर बरीच चर्चा झाली. लेखक खुद्द कमला चौधरींचे पुतणे असल्याने आणि त्यांनी कमला चौधरींच्या पर्सनल डायरीतून रेफरन्स घेतल्याने गोष्टीला वजन प्राप्त झालं. पण विक्रम साराभाईंच्या मुलीने मल्लिका साराभाईंने मात्र हे सर्व आरोप खोटे असल्याचे हसून उडवून लावलं.
हे ही वाच भिडू
- भारतासारख्या विकसनशील देशात इस्रो उभी राहिली याचे श्रेय जाते विक्रम साराभाई यांना
- शेतकऱ्यांनो एक मिनिट वेळ द्या आणि या माणसाला एकदा धन्यवाद म्हणा
- दिल्ली, मुंबई सोडून बंगलोर आयटी हब कस झालं माहितय का..?
ह्या काळात जुन्याच काहीतरी काढायचं हेच चालू आहे IIM उभी राहिली ते महत्त्वाचे फालतू काहीतरी कृपया काढू नये