विलासरावांनी नायडूंना झापलं, आधी उद्योगपतींची कर्जवसुली करा मग गरीब शेतकऱ्याच्या मागे लागा

महाराष्ट्राला जसा पुरोगामित्वाचा वारसा लाभलाय, अगदी तसाच शेतीमाती संस्कृतीचा वारसा सुद्धा आपल्या महाराष्ट्राला लाभलाय. कारण आपल्या महाराष्ट्राचं राजकारण सुरु होत, काळ्या मातीतून आणि तिचा आणि तिच्या भूमीपुत्रांचा म्हणजेच शेतकऱ्यांचा इथं आधी विचार केला जातो. आणि वेळप्रसंगी केंद्रीय नेतृत्वाला खडसावयला सुद्धा आपले महाराष्ट्राचे नेते मागेपुढे पाहत नाहीत.

अशातलेच एक नेते म्हणजे विलासराव देशमुख. देशमुखांनी एका परिषदेत वेंकैय्या नायडूंना असं काही खडसावलं होत की, सगळी परिषद चिडीचूप बसली होती. अगदी वेंकैय्या नायडू सुद्धा.

तर तेव्हा केंद्रात अटलबिहारी वाजपेयींचे सरकार होतं. त्यांच्या मंत्रिमंडळात व्यंकय्या नायडू हे ग्रामविकास मंत्री होते. त्यांनी हैदराबादला दक्षिणेतल्या मुख्यमंत्र्यांची एक परिषद बोलावली होती. त्या परिषदेचा विषय होता सहकारातून शेतकऱ्यांकडून थकलेल्या कर्जाचा आणि ते वसूल करण्याचा.

या परिषदेला बडे बडे नेते, सहकारातल्या प्रतिष्ठित मंडळी होत्या. यात तामिळनाडूचे मुख्यमंत्री  करुणानिधी होते, आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू होते, कर्नाटकचे मुख्यमंत्री एस एम कृष्णा होते. आणि विलासराव देशमुख महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून उपस्थित होते.

या परिषदेत आळीपाळीने सगळ्या मंत्र्यांची भाषण झाली. सगळ्याच मुख्यमंत्र्यांनी बऱ्यापैकी भाषण इंग्रजीतून केली. शेवटचा नंबर विलासरावांचा होता. त्यांचं भाषण तुमचं झालं. त्या परिषदेत इतक्या दर्जेदार इंग्रजीत कोणीच भाषण केलं नव्हतं, इतक्या दर्जेदार भाषण विलासरावांच झालं होत. किंबहुना विलासराव एवढं दर्जेदार इंग्रजीतलं भाषण ठोकू शकतील असं तिथल्या उपस्थितांना वाटतच नव्हतं.

पण भाषणात त्यांनी भाजप सरकारची एवढी तासली की, सगळेच नेते चिडीचूप बसले. त्यांनी परिषदेवर अक्षरशः बॉम्बच टाकला. ते म्हंटले,

पाचशे, हजार कोटी रुपये थकवलेल्या शेतकऱ्यांची कर्ज वसूल करण्याची चर्चा तुम्ही येथे करता. देशातले पाच बडे उद्योगपती कोट्यावधी रुपयांची कर्ज थकून बसलेले आहेत. त्यांचा बाल बाका करू शकत नाही. त्यांचे काय करणार ते आधी सांगा आणि मग गरीब शेतकऱ्यांच्या कर्जाच्या वसुलीच बोला.

त्यांच्या या बॉम्बने ग्रामविकास मंत्री असलेल्या व्यंकय्या नायडूंची तर बोबडीच वळली. अक्षरशः पुढच्या भाषणात त्यांनी काही मोजकेच शब्द बोलून परिषद गुंडाळली. ती परिषद संपल्यावर तीन मुख्यमंत्री आणि व्यंकय्या नायडू एका कोपर्‍यात बसले होते. आणि सगळ्या कॅमेरावाल्यांचा गरडा विलासराव देशमुखांना पडला होता. अक्षरशः कोणत्याही मीडियावाल्याने तिथं जाऊन त्या तीन मुख्यमंत्र्यांची आणि नायडूंची मुलाखतच घेतली नाही. 

हा होता महाराष्ट्राच्या मातीचा परिणाम. विलासराव ना कोणाला घाबरले ना त्यांनी कोणाची हुजरेगिरी केली. त्यांनी सरळ सरळ उट्टे काढले.

हे ही वाच भिडू  

 

Leave A Reply

Your email address will not be published.