घोडदौड काँग्रेसची, पण चर्चा विलासरावांची !

राजस्थान, छत्तीसगडमध्ये कॉंग्रेसची मोठ्ठी आघाडी, मध्यप्रदेशात कॉंग्रेस सत्तेपासून अगदी जवळ. सकाळपासून पहिल्या फेरीचे निकाल डिक्लेर व्हायला लागले. कॉंग्रेस आणि विजय ही गोष्ट गेल्या चार पाच वर्षा लोकांच्या विस्मृतीत गेली होती. ग्रामपंचायत पासून विधानसभेपर्यन्त प्रत्येक ठिकाणी भाजपचा विजय फिक्स मानला जात होता. मोदी लाट ओसरली म्हणणाऱ्यांना भाजपचा विजय तोंडावर पाडत होता. 

पण राजस्थान, छत्तीसगड,मध्यप्रदेशातील पहिल्या टप्यातील निकाल पाहीले आणि महाराष्ट्रातीलकॉंग्रेस कार्यकर्त्यांच्यात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं. या विजय घौडदौडीत एकव्हिडीओ मात्र चांगलाच भाव खावून जावू लागला. कॉंग्रेस कार्यकर्त्याने आपल्याफेसबुक, वॉटसएप वर हा व्हिडीओ पोस्ट करण्यास सुरवात केली. 

https://www.youtube.com/watch?v=bPRumUS44zk

विलासराव कोण होते हे वेगळं सांगण्याची इथे गरज नाही. समोरचा व्यक्ती कोणत्याही पक्षाचा असो मात्र विलासराव देशमुखांच्या भाषणांवर कोणाचही दुमत असण्याच कारण नाही. ओघवती भाषा, थेट भिडणारा आवाज आणि मानेला हळूवार झडके देवून विलासराव समोर बसलेल्या श्रोत्यांची मने जिंकून घेत. 

लोकांची चळवळ म्हणजे कॉंग्रेस,इतकं विस्तारीत रुप कॉंग्रेसला प्राप्त झालं आहे. अनेकांनी प्रयत्न केले कॉंग्रेस संपवायचे ते संपले कॉंग्रेस नाही संपली हा एवढां प्रचंड इतिहास या कॉंग्रेसचाय, त्यागाचा बलिदानाचा देशाच्या स्वातंत्र्याच्या लढ्याचा इतिहास आहे, हि कॉंग्रेस अशी कुणाला संपवता, संपवू शकत नाहीऐ.आणि कॉंग्रेसने नेहमीच गरिबांचा विचार केला. 

विलासराव यांच भाषण २००९ च्या इलेक्शनमधलं. लातूर येथील प्रचारात ते बोलत होते. याच वेळी ते लातूरच्या जनतेला म्हणतात, 

थोड ही गाफिल राहता कामा नये. एक लाख मताने येणारा काय होतय आपण नाही गेलं तर? 

आपलं काम आपण त्याचं जिद्दीने करायला हवं… 

आज कॉंग्रेस कार्यकर्त्यांना विलासरावांच्या भाषणाची त्यांच्या वक्तव्याची आठवण होणे साहजिक आहे. कार्यकर्ता मग तो कोणत्याही पक्षाचा असो त्याला आपल्या नेत्यांची भाषणातूनच बळ मिळत असत. फक्त आज विलासराव सोडून इतर कोणत्याही नेत्याचं भाषण कॉंग्रेसकडे नाही हिच महत्वाची जाणीव आज कॉंग्रेस कार्यकर्त्यांकडे असायला हवी. पुढे विजयाने हुरळून जावू नये हे देखील विलासराव सांगत. 

हे ही वाचा. 

Leave A Reply

Your email address will not be published.