नवीन संसद उभारणारा आर्किटेक्ट मुळा-मुठाला पुन्हा वैभव प्राप्त करून देण्यासाठी येतोय

हजारो वर्षांपासूनच्या संस्कृती साक्षीदार आहेत, गावे वसली ती नद्यांच्या काठावर. नद्या आपल्या जगण्याचा भाग आहेत. नदी जर मेली तर तिथली संस्कृती तिथल्या मानवी जीवनाचं अस्तित्व मरायला लागतं.

असंच काहीसं घडत होतं पुण्याच्या मुळा मुठा नद्यांच्या बाबतीत.

छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते बाजीराव पेशव्यांच्यापर्यंत अनेक वीरांच्या घोड्यांच्या टापा अनुभवलेल्या या नद्या गेल्या शतकात झालेल्या सिमेंटच्या जंगलात मृतप्रायय होत चालल्या होत्या. पुनवडी पासून ते महानगर पुणे बनण्याच्या काळात आपण चुकवलेली किंमत म्हणजे मुळामुठा या नद्यांची सध्याची अवस्था.

ही चूक भरून काढण्यासाठी पुणे महापालिकेच्या वतीनं मुळा मुठा नदी सुधार प्रकल्प राबविण्यात येणार आहे. गुजरातमधील साबरमती नदीच्या धर्तीवर हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. ही चूक भरून काढण्याची जबाबदारी प्रशासनाने एका खास व्यक्ती कडे दिली आहे. ती व्यक्ती म्हणजे बिमल पटेल.

या नदी सुधार प्रकल्पाचे डिझाईन करणाऱ्या बिमल पटेल बद्दल माहिती करून घेऊया.

सध्या सर्वाधिक चर्चा आहे हि नवीन बांधण्यात येणाऱ्या संसद भवन. देशाची शान असणारे संसद भवन हे तेवढंच भारी असावं अशी इच्छा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची होती. सगळ्या देशाचं प्रतिनिधित्व करणारे संसद हि त्याच तोडीची असायला हवं असंही त्यांचं मत होत. या प्रकल्पाला ‘सेन्ट्रल व्हिस्टा’ असे नाव देण्यात आले आहे. या संसदेचे नवीन इमारतीच्या डिजाईनचे काम गुजरातचे आर्किटेक्ट बिमल पटेल यांनी केले आहे.

एवढ्या मोठ्या प्रकल्पाचे काम करणारे बिमल पटेल यांनी गुजरात हायकोर्ट, आयआयएम अहमदाबाद, आयआयटी जोधपूर यासारख्या महत्वाच्या इमारतीचे डिजाइन केले आहे.

मुख्य म्हणजे नरेंद्र मोदी यांच ड्रीम प्रोजेक्ट असणार साबरमती रिवरफ्रंट, राजकोट रेसकोर्स री डेव्हलपमेंट, आरबीआय अहमदाबाद बरोबरच गुजरात सरकार आणि केंद्र सरकारचे अनेक महत्वाच्या प्रकल्प मार्गी लावले आहे. बिमल पटेल यांच्या कंपनीचे एचसीपी डिजाइन प्लानिंग एंड मैनेजमेंट प्राइवेट लिमिटेड असे नाव आहे.

३५ वर्षांचा अनुभव

बिमल पटेल यांचा जन्म ३१ ऑगस्ट १९६१ रोजी झाला. ते गेली ३५ गुजरातमध्ये वास्तुकला, शहराचे डिझाईन आणि शहरी नियोजनाचे काम करत आले आहेत. ते केवळ एक आर्किटेक्ट नसून अहमदाबाद सीइपीटी महाविद्यालयाचे अध्यक्ष सुद्धा आहेत. त्याचबरोबर ते भोपाल येथील स्कूल ऑफ प्लानिंग एंड आर्किटेक्चर बोर्ड ऑफ गवर्नर्सचे अध्यक्ष सुद्धा आहेत.

२०१९ मध्ये बिमल पटेल यांना वास्तुकला आणि योजना या क्षेत्रात भरीव योगदान दिल्याबद्दल पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.

वडिलांसोबत कामाला सुरुवात

मागच्या काही वर्षांचा विचार केला तर लहान कुटुंबासाठीची घरे, मोठ्या संस्था, औद्योगिक इमारती आणि शहरी पुनर्विकास प्रकल्पांसाठी काम केले आहे.

ज्या सीईपीटी कॉलेज मध्ये आर्किटेक्टची पदवी मिळविली याच कॉलेजचे ते सध्या अध्यक्ष आहेत. हि अभिमानाची बाब समजली जाते. अहमदाबाद येथील सीईपीटी मधून शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण जर्मनी येथील स्टटगार्ट येथील इन्स्टिट्यूट फॉर लाइटवेट स्ट्रक्चर्स मध्ये ऍडमिशन घेतले.तेवढ्यावर ते थांबले नाहीत त्यांनी पुढील शिक्षणासाठी अमेरिका गाठली आणि बर्कले येथील कॉलेज ऑफ एन्व्हायर्नमेंटल डिझाइन ऍडमिशन घेतले. शहरी नियोजन या विषयात पीएचडी केली आहे.

त्यांनी १९९० मध्ये आपल्या करीरयरची सुरुवात वडिलांसोबत केली. त्यांचं पाहिलं काम हे अहमदाबाद येथील उद्योजकता विकास संस्थेची इमारतीचे डिजाईन केले. या इमारतीचे डिजाईन उत्तम केल्याने त्यांना वास्तुकलेतील प्रतिष्ठित आगा खान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

२०१२ पासून ते ज्या महाविद्यातलं शिकले त्या सीईपीटी महाविद्यालयाचे अध्यक्ष आहे. त्या कॉलेज मध्ये मुख्यतः मानवी अधिवास समजून घेणे, डिझाइन करणे, नियोजन करणे, बांधणे आणि व्यवस्थापित करणे यावर लक्ष केंद्रित केले आहे.

हैद्राबाद येथील आगा खान एकादमी, अहमदाबाद मॅनेजमेंट असोसिएशन, भुज विकास नियोजन आणि नगर नियोजन योजना (भूकंपानंतर), सीजी रोड पुनर्विकास, उद्योजकता विकास संस्था, गुजरात उच्च न्यायालय या महत्त्वाच्या प्रकल्पांचा समावेश आहे.

कांकरिया लेक डेव्हलपमेंट, साबरमती रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट आणि गांधीनगरमधील गोल्डन कॉम्प्लेक्स ही त्यांची काही भव्य कामे आहेत.

२०१९ मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित

डॉ. पटेल यांना कामासाठी १९९२ मध्ये आगा खान पुरस्कार, १९९८ मध्ये यूएन सेंटर फॉर ह्यूमन सेटलमेंट्स अवॉर्ड ऑफ एक्सलन्स २००१ मध्ये वर्ल्ड आर्किटेक्चर अवॉर्ड आणि पंतप्रधानांचा शहरी क्षेत्रातील उत्कृष्टतेसाठी राष्ट्रीय पुरस्कार यासह अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. २०१९ मध्ये बहुमानाचा पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

पटेल यांच्या सरावाने भारतीय शहरे सुधारण्यासाठी शहरी रचना आणि नियोजन पद्धती बदलण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. जमीन वापर नियोजन, रिअल इस्टेट मार्केट, बिल्डिंग रेग्युलेशन, जमीन व्यवस्थापन आणि नागरी नियोजन इतिहास या विषयात त्यांची संशोधनाची आवड आहे.

असा एकही क्रिकेट रसिक नसेल ज्याला कोलकात्यातील ईडन गार्डन स्टेडियम माहित नसेल बिमल पटेल यांनी १९८७ च्या विश्वचषकापूर्वी ईडन गार्डन्स स्टेडियमच्या नूतनीकरणाचा प्रकल्प हाती घेतला. त्यापूर्वी या स्टेडियम मध्ये केवळ ४० हजार प्रेक्षक बस होते आता याच ठिकाणीची प्रेक्षक बसण्याची क्षमता १ लाख एवढी झाली आहे.

याच बिमल पटेल आपल्या पुण्याच्या नदी सुधार प्रकल्पाचं डिझाईन केलं आहे. ते भारीच असणार यात वाद नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.