परदेशातल्या पार्ट्यांमध्ये दिसणारी वाईन हि मराठी ‘ वाईन लेडीने ‘ बनवलेली आहे.
उद्योजक हा उद्योजक असतो, तो स्त्री आहे कि पुरुष याचा कामाशी संबंध नाही. प्रामाणिकपणा तेवढा महत्वाचा.
हा कानमंत्र स्त्री उद्योजिकांना दिलाय अचला जोशी यांनी. अचला जोशी या दीर्घकाळापासून यशस्वी स्त्री उद्योजिका म्हणून केवळ भारतातच नव्हे तर परदेशातही प्रसिद्ध आहेत.
त्यांनी भारतीय ४० वर्षांपूर्वी सुरु केलेली वाईन इंडस्ट्री हि कुतूहलाचा विषय आहे.
अचला जोशी यांनी त्यांच्या तळोजाच्या फॅक्ट्रीत परफेक्ट ब्लेंडींग केलेली प्रिन्सेस वाईन बनवली. १९८३ साली अचला जोशी यांना वाईन उद्योगात केलेल्या गौरवास्पद कामगिरीबद्दल राष्ट्रपतींच्या हातून उत्कृष्ट उद्योजिकेचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आणि फर्स्ट वाईन लेडी म्हणून त्यांना जगभर प्रसिद्धी मिळवली.
पण त्यांचा हा वाईन लेडी बनण्याचा प्रवास मुळात सोपा नव्हता. बीए आणि पुढे एम पर्यंतच शिक्षण त्यांनी पूर्ण केलं होतं. पुढे लग्न, मुलंबाळं झाल्यावर त्यांना नवीन काहीतरी करण्याची इच्छा झाली.
एका वर्तमानपत्रातील जाहिरातीवरून त्यांनी इंडियन काऊंसिलच्या प्रदर्शनात भारताच्या शिष्टमंडळात समन्वयकाची जबाबदारी मिळवली. याच जबाबदारीतील पहिला सोहळा पार पडताना स्वत:च्या कार्यपद्धतीवर अमेरिकन अधिकाऱ्यांचे मन कामातून जिंकणाऱ्या या शिष्टमंडळाला थेट एका पंचतारांकित हॉटेलमधील पार्टीचे निमंत्रण मिळाले.
अमेरिकेच्या त्या जेवणाच्या पार्टीत त्यांनी रेडवाईनचा पहिलाच घोट घेतला आणि त्याची चव ओळखीची वाटल्याने त्यांनी रेडवाईनवर संशोधन करून हाच उद्योग महाराष्ट्रात सुरु करायचं ठरवलं. अमेरिकेहून भारतात परतल्यावर त्यांनी पुरेपूर अभ्यास करून या उद्योगाला सुरवात करण्याचा निर्णय घेतला.
एकदा त्या त्यांच्या माहेरी गेल्या असता त्यांच्या भावाला द्राक्षांच्या पेटीची भेट आलेली त्यांना दिसली. त्यातील द्राक्षांची चव हि त्यांना सेम टू सेम वाईनसारखी लागली आणि मग त्यांनी ती पेटी उचलून त्यांच्या घरी आणली. त्यांच्या पतीने या उद्योगाला आनंदाने होकार दिला. बाजारातून त्यांनी कॉर्गो, एअर लॉक अशी लागणारी सामुग्री आणली.
पाच किलो द्राक्षांपासून त्यांनी हि वाईन बनवण्याचं ठरवलं होतं. द्राक्ष धुवून त्यामध्ये यीस्ट पावडर टाकून आणि इतर काही प्रक्रिया करून तो प्रयोग केला. पुढे दोन महिन्यांनी त्यांच्या भावाच्या उपस्थितीत ५ किलो द्राक्षांपासून बनवलेली साडेचार लिटर वाईन त्यांनी यशस्वीपणे कॉर्गोमधून बाहेर काढली. त्यांचा हा पहिलाच प्रयत्न जमून आला आणि मोठ्या प्रमाणावर हा उद्योग सुरु करण्यासाठी त्यांनी पहिलं पाऊल टाकलं.
आता मोठ्या प्रमाणावर उद्योग सुरु करायचा म्हणल्यावर परवाना हवा असतो, आणि त्यातही वाईन म्हणजे दारू असा समज असल्याने परवाना मिळेल कि नाही असा पेच होता. बाई तुम्ही दारू बनवता , जास्तीचा कर तुम्हाला भरावा लागेल अशा अनेक अडचणी त्यांच्यासमोर होत्या पण त्यांनी आपला व्यवसाय चांगल्या प्रकारे पुढे न्यायचा हे ठरवलं होतं.
त्यांनी कागदपत्रांची पूर्तता करून थेट महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री असलेल्या वसंतदादा पाटलांना गाठलं. अचला जोशींनी त्यांना विनंती केली कि,
मी अगदी छोट्या प्रमाणावर हा उद्योग सुरु करणार आहे , त्याचा परवाना मला हवा आहे.
पण वसंतदादांनी त्याला स्पष्ट नकार दिला कारण त्यावेळी राज्यात वाईन निर्मितीला बंदी होती आणि सरकारचा हा धोरणात्मक निर्णय होता.
वसंतदादा त्यांना म्हणायचे कि हा छोटा उद्योग पुढे मोठा होणार नाहीए का ? पण अचला जोशी यांनी जिद्द न हरता परवाना मिळवला. पाच हजार लिटर वाइननिर्मिती ती पाच वर्षे असा त्यांना परवाना वितरित केला गेला. पुढे त्यांचा हा उद्योग यशाच्या शिखरावर गेला.
पाच हजार लिटर क्षमतेपेक्षा मोठे कारखाने मुंबईबाहेर ठेवण्याच्या नियमाने अचला जोशींनी १९७९ साली तळोजा औद्योगिक क्षेत्राकडे पाऊलं टाकली. आज घडीला अचला जोशींची कंपनी इन व्हॉगेस क्रिएशन या कंपनीच्या माध्यमातून प्रिन्सेस ही रेड, व्हाइट, पोर्ट व हनी वाइन बनवितात. अगदी परदेशातसुद्धा त्यांनी तयार केलेली वाईन प्रसिद्ध आहे.
आता त्यांच्याकडे काम करणाऱ्या स्त्रियांना इतर काळात काम नसते, कारण वाईन हि विशिष्ट काळातच बनवली जाते. म्हणून त्यांनी क्विल्ट बनवण्याचा उद्योग सुरु केला. क्विल्ट म्हणजे गोधडी जी अमेरिकेत ब्लॅंकेटसारखी वापरली जाते. या गोधड्यांचं प्रदर्शन त्या अमेरिका, लंडन अशा ठिकाणी मांडतात. यातून महिला सक्षमीकरणाचं धोरणही त्यांनी राबवल.
लेखिका म्हणूनही त्या परिचित आहेत. चंद्रमे जे अलांछन, आश्रम नावाचं घर हे त्यांच्या पुस्तकांची नावे आहेत. जगभरात एक यशस्वी स्त्री उद्योजिका म्हणून त्यांचं नाव आहे.
हे हि वाच भिडू :
- ३० एकर जमिनीतून सुरवात करत ५०० कोटींचा व्यवसाय करणारा ब्रॅण्ड म्हणजे ‘सुला वाईन’
- ५०० रुपये घेऊन मुंबईत आलेल्या शेतकऱ्याच्या पोराने जगातली सगळ्यात मोठी लॅबोरेटरी उभारली.
- मोरारजींच्या शेंगा न्यूझीलंडच्या पंतप्रधानांच्या बायकोने चखणा समजून संपवल्या आणि..
- ‘वेटर होण्याची लायकी नाही’ ऐकलेल्या पोरानं ३० देशात हॉटेल्सचं साम्राज्य उभं केलं….