७ वर्ष लागली पण निरुपमांनी शेवटी CAG च्या विनोद राय यांना माफी मागायला लावली.

माजी कॅग विनोद रॉय यांच्याकडून अखेर काँग्रेस नेते संजय निरुपम यांच्यासाठी माफीनामा देण्यात आला आहे. अब्रुनुकसानीच्या दाव्याप्रकरणी कायदेशीर नोटीस बजावल्याच्या ४ वर्षांनंतर निरूपम यांना माफी मिळाली आहे.

आता बऱ्याच जणांना हे प्रकरण नेमकं काय होत हे माहित नसेल. तर जाणून घेऊ.

२०१४ हे प्रकरण माजी कॅग विनोद राय यांनी एका मुलाखतीदरम्यान सांगितले होते की, त्यांनी संजय निरुपम आणि खासदारांसह पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे नाव २G स्पेक्ट्रम अहवालातून काढून टाकण्यासाठी दबाव आणला होता.

ज्यानंतर काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी माजी कॅग विनोद राय यांच्यावर मानहानीचा आरोप केला होता आणि तशी कायदेशीर नोटीस देखील बजावली. आणि त्यांनी त्यांच्या वक्तव्याबद्दल माफी न मागितल्यास फौजदारी कारवाई सुरू करू, असा इशाराही दिला होता.

निरुपम यांच्या वकिलाने नोटीसद्वारे राय यांना १५ दिवसांत लेखी “बिनशर्त माफी” मागायला सांगितले होते. काँग्रेस नेत्यावरील आरोप निराधार, खोटे आणि बनावट असल्याचे नोटिसीत म्हटले होते. तसे न केल्यास तुमच्याविरुद्ध फौजदारी कारवाईसह योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे नोटीसमध्ये नमूद करण्यात आले.

माजी काँग्रेस खासदारांनी राय यांच्या टीकेवरही तीव्र आक्षेप घेतला की, काँग्रेस खासदारांनी कॅगच्या विरोधात पीएसीमध्ये असंसदीय भाषा वापरली होती, ज्यावेळी ते तिथे उपस्थितच नव्हते. ज्यामुळे अध्यक्ष मुरली मनोहर जोशी यांना निरुपम यांच्याबद्दल स्पीकरकडे लेखी तक्रार पाठवावी लागली होती.

निरुपम यांच्या वकिलाने राय यांच्यावर काँग्रेस नेत्याचा “अपमान” करण्याचा आणि त्यांची प्रतिष्ठा दुखावण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला होता. त्यांनी असेही म्हंटले कि, बदनामीकारक आरोपांमुळे माझ्या क्लायंटच्या प्रतिष्ठेला मोठा फटका बसला आहे.

या दरम्यानच्या काळात कॅग विनोद राय यांनी केलेल्या आरोपांमुळे देशाच्या राजकारणात चांगलीच खळबळ उडाली होती. प्रमुख विरोधी पक्ष भारतीय जनता पक्षाने कॅगच्या विधानाच्या आधारे केंद्रातील काँग्रेस सरकारवर जोरदार हल्ला चढवला होता. विनोद राय यांनी एकापाठोपाठ एक अनेक आरोप केले होते.

या सगळ्या प्रकरणावर विनोद राय यांनी संजय निरुपम यांची माफी मागीतली आहे. संजय निरुपम यांनी ट्विट करत म्हंटले कि,

शेवटी, माजी CAG विनोद राय यांनी आज मी एमएम कोर्ट, पटियाला हाऊस, नवी दिल्ली येथे दाखल केलेल्या मानहानीच्या प्रकरणात माझी बिनशर्त माफी मागितली.  आता युपीए सरकारच्या  २G कोअल ब्लॉक अलोकेशसन्सच्या खोट्या रिपोर्टबाबतही त्यांनी (विनोद रॉय) देशाची  माफी मागावी. 

 

 

 

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.