तुम्हाला निपाह रोग झाला आहे का ? येथे आहे तपासणी करण्याचा सोप्पा उपाय ? 

मनश्कार !!! 

केरलमध्ये एक रोग सध्या धुमाकुळ घालतोय. नाव आहे निपाह !!! पहिल्यांदा पाकिस्तानची एखादी नविन हिरोईन असावी म्हणून अनेकांनी या नावाकडं दुर्लक्ष केलं. नंतर लक्षात आलं सुंदर सुंदर नाव अनेकदा घात करतात. निपाहचं देखील तसच झालं नाव बडे औंर दर्शन खोटे टाईपमध्ये निपाहनं आपली लक्षण केरलच्या भूमीला दाखवण्यास सुरवात केली. खरतर निपाह या रोगाचं नाव मलेशियातल्या एका गावावरुन पडलं. त्या गावात पहिल्यांदा या रोगाचे रुग्ण आढळून आले. त्यानंतरच्या काळात मलेशिया, ब्रम्हदेश, पश्चिम बंगाल, आसाम, ओरिसा यांसारख्या राज्यात रुग्ण आढळून आले. मला माहिताय हे सगळं वाचून तुम्ही बोअर झालाय तुम्हाला फक्त चेकअप करुन जायचं आहे म्हणून आत्ता आपण थेट मुद्दाला हात घालू. 

निपाह झाला आहे का, ते तपासण्याचे पाच प्रकार खालीलप्रमाणे – 

१)  डोकेदुखी अर्थाने डोकं तापणं. 

निपाह रोगाचा पहिला परिणाम थेट मेंदूवर होतो. आणि तो समजणं सर्वात अवघडं आहे. कारण आपण नेहमीच डोक्यात ताप गेल्यासारखं वागत असतो. त्यामुळे डोकं तापलय का, गरगरतय का ? अशी लक्षणं दिसत असली की आपण गोळ्या खावू लागतो. मुळात डोक शांत ठेवून डोकं गरम झालय का? याचा विचार करणं तस अवघडच काम आहे. अशा वेळी जवळच्या व्यक्तींचा सल्ला घ्या. 

३) आळस

आळसा हा माणसाचा शत्रु आहे हे आपण शिकण्यात खूप आळस केला. परिणामी आळस केला तर काय होवू शकतं हे आपणास कधीच समजल नाही. तर असो मुद्दा असा आहे की या रोगात आळस येतो. तसाही तो रोजच येतो विशेष काय आहे. यासाठी सर्वात प्रभावी उपाय म्हणजे कालच्यापेक्षा जास्त आळस आज वाटतोय हे पॅरामिटर लावा. शंभर टक्के अंदाज लावायला सोप्प जाईल.

२) झोप. 

दूपारी दोन ते पाच. रात्री ११ ते ९ आणि मध्ये अध्ये आवडीनुसार. मुळात आपण जागं किती असतो आणि त्यातून विचार किती करतो ? हा संशोधनाचा विषय आहे. हा रोग झाला की झोप लागते अस सांगतात. आत्ता जितकं झोपता त्या वेळेहून अधिक झोपत असाल तर विचार करण्यासारखी गोष्ट आहे. चेक करा किती झोप येतेय. 

४) अंगदुखी 

बोट लावलं की अंग दुखतय ? की बोट दुखतय ? ते पहिलां चेक करा. अंगदुखतय हे लक्षात आलं की थांबा. विचार करा, आपण कधी पारव्यानं खाल्लेल असतय म्हणून उष्ठ खजूर खाल्ल आहे का ? पाडाचा आंबा आहे म्हणून आधाश्यासारखा तो खाल्ला आहे का ? तस काही आठवत नसेल तर तुम्हाला शंभर टक्के निपाह झाला असण्याची शक्यता आहे. कारण गोष्टी विसरणं देखील या रोगाचं एक लक्षण आहे. 

Screen Shot 2018 05 23 at 3.57.22 PM
http://thepillar.co/wp-content/uploads/2018/05/Nipah-Virus.jpg
५) कन्फ्यूजन 

कन्फ्यूजन, ही गोष्ट सुद्धा आपणाला लहानपणापासून होतय. त्यात काय विशेष. मॉल मध्ये गेल्यानंतर कपड्यात होणारं कन्फ्यूजन. टिव्ही बघताना “लागीरं झालं जी” आणि “तुझ्यात जीव रंगला” मध्ये होणारं कन्फ्यूजन हे सामान्य कन्फ्यूजन झालं. विचार करा कधी छोट्याछोट्या गोष्टीत कन्फ्यूजन झालं आहे का  ? म्हणजे जांभळ आणि करवंद यातला फरक लक्षात येत नाही. हे जे मुद्दे लिहले आहेत ती क्रमांन लिहले आहेत की नाही यातला फरक तुमच्या लक्षात आला असेल तर तुम्ही सेफ आहात म्हणायला हरकत नाही. 

५) कोमा 

कोमा म्हणजे कोमा. शांत चित्ताने जिवंत आहे म्हणून जिवंत आहे. सगळ संपलय. विचार करा अस तुम्हाला वाटतय का की तुम्ही कोम्यात आहात ? वाटत असलं तरी काही उपयोग होणार नाही कारण तुम्ही कोम्यात असाल तेव्हा पेपरात बातमी छापून येण्याच्या तयारीत असेल. हितं तुमचा निपाहनं गेम केला असणार आहे. या स्टेजला विचार करुन पण काही फरक पडणार नाही. आपण कोम्यात आहे हे मान्य करायचं आणि शांत पडून रहायचं येवढचं करु शकतो आपण. 

सुरवातीलाच नमश्कार ऐवजी मनश्कार झालय. आकडे आणि मुद्दे यांचा मेळ नाही याचा अर्थ आमचे कंटेंट रायटर यांच्यावर देखील चाचणी घेण्याची वेळ आली आहे. ती चांगल्या हॉस्पीटलमध्येच जावून करावी. असा अंदाज लावत बसू नये. चेष्टेचेष्टेत काहीही होवू शकतं. म्हणून काळजी घ्या. वटवाघळानं किती खां खां म्हणून काहीही दिली तर खावू नका. 

Leave A Reply

Your email address will not be published.