त्या व्हायरल झालेल्या पॅम्प्लेटवर 1994 च्या एनएसडी बॅचचे सगळ्यात जबरदस्त अभिनेते आहेत….

बॉलिवुडमध्ये दोन भाग पडतात एक म्हणजे हिरो आणि दुसरे म्हणजे अभिनेते. मास आणि क्लास यांचं कॉम्बिनेशन असावं लागतं. तर नाटक करणाऱ्या पोरांचं एकच लक्ष असतं की कॉलेज सुटल्यावर किंवा डिग्री हातात पडल्यावर सरळसोट एनएसडी गाठायचं आणि नाटकाचं पूर्णपणे शिक्षण घेऊन बाहेर येऊन कामं करायची. पण यातल्या बहुतेक म्हणजे एनएसडीतुन आलेल्या लोकांच्या वाट्याला स्ट्रगल जास्त असतो म्हणजे ओळख मिळवायला आणि काम मिळवायला यांचे बरेच वर्ष खर्च होतात. पण आता एनएसडी पासआउट म्हणल्यावर काहीतरी जबऱ्या ऍक्टर असणार हे बऱ्याच दिग्दर्शक लोकांना माहिती असतं.

तर आता तुम्ही म्हणाल भिडू हे काय एनएसडी पुराण लावलंय म्हणजे नक्की केहना क्या चाहते हो ? तर भिडू विषय काय आहे माहितीय का मागच्या काही दिवसात एक पॅम्प्लेट फिरत होतं ज्यावर आशुतोष राणाचा फोटो होता.
बॉलिवूड अभिनेता आशुतोष राणाचा एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत होता आणि अजूनही फिरतोय. आशुतोष राणाचा हा 28 वर्ष जुना फोटो त्याच्या NSD दिवसातील आहे. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (NSD) च्या या बॅचच्या फोटोमध्ये आशुतोष राणासोबत इतरही अनेक विद्यार्थी दिसत आहेत, पण तुम्हाला माहीत आहे का की फोटोमध्ये दिसणारे हे विद्यार्थी आज टीव्ही आणि बॉलिवूडचे खूप प्रसिद्ध आणि प्रसिद्ध चेहरे बनले आहेत.

1994 च्या NSD बॅचच्या या फोटोत दिसणारे ते दुसरे कोणी नसून खुद्द आशुतोष राणा आहेत.

NSD मध्ये 1994 च्या बॅचमध्ये आशुतोष राणासोबत दिसलेल्या या विद्यार्थ्यांना तुम्ही ओळखता का? तर हे देखील बॉलिवूडचे दिग्गज कलाकार आहेत. एक एकाबद्दल जाणून घेऊया.
या फोटोत दिसणारा विद्यार्थी अभिनेता यशपाल शर्मा आहे. ‘सुंदर यादव’ आणि ‘लगान’ या चित्रपटातून ‘गंगाजल’ या चित्रपटाने यशपालची खास ओळख निर्माण केली आहे. यशपाल शर्मा म्हणजे गँग ऑफ वासेपूरमधला गायक याद तेडी आयेगी मुझको बडा सतायेगी…

एनएसडीच्या या फोटोमध्ये ‘गोलमाल’ चित्रपटाचा वसुली भाई उर्फ ​​मुकेश तिवारीही दिसत आहे. मुकेश तिवारी हे आशुतोष राणाचे बॅचमेट आहेत. मुकेश तिवारीचा फेमस डायलॉग म्हणजे अबे जलदी बोल कल सुबह पनवेलभी निकलना है….आणि सोबतच चायना गेटमधला मुकेश तिवारीने साकारलेला जगिरा व्हिलन अजूनही काळजात धडकी भरवतो.

कुमुद मिश्रा यांना कोणी कसे विसरेल. कुमुद बॉलिवूडच्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये दिसले आहे. सुलतान मध्ये सलमानचा सासरा तर एम एस धोनी सिनेमात अधिकारी म्हणून कुमुद मिश्रा चांगलेच गाजलेले आहेत. अभय कुलकर्णीला तुम्ही अनेक टीव्ही मालिका आणि चित्रपटांमध्ये पाहिले आहे. अभय हा देखील इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध चेहरा आहे. Scam 1992 मध्ये बँक अधिकाऱ्याचा रोल त्यांनी केला होता.

तर अशी ही 1994 ची एनएसडी बॅच ज्याने बॉलिवूडला अभिनेत्यांची तगडी फळी उभारून दिली. आणि अजूनही हे अभिनेते आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकत आहेत.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.