बाराशे कोटींच विमान अन चर्चा चालू आहे ती छोट्या कुलुपाची..
पंतप्रधान मोदींनीच हा फोटो त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केलाय आणि सोशल मिडियावर लोकांनी अक्षरशः मिम्स आणि पोस्ट चा पाऊस पाडलाय.
त्याचं झालं असं कि, पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर गेले आहेत. काल बुधवारी ते अमेरिकेसाठी रवाना झाले होते. या तीन दिवसांच्या दौऱ्यात ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन, उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांची भेट घेणार असून तेथील महत्वाच्या बैठकांमध्ये सहभागी होणार आहेत.
त्यांच्या याच अमेरिका दौऱ्याच्या दरम्यान त्यांनी टाकलेला त्यांचा विमानात काम करतानाचा एक फोटो पोस्ट केला. रात्रीच्या पावणे अकरा च्या दरम्यान शेअर केलेला हा त्यांचा फोटो रात्रभरात व्हायरल झाला. त्यांनी केलेल्या या फेसबुक पोस्ट ला १२ तासांच्या आत तब्बल एक मिलिअन लाईक मिळालेत तर २२ हजार रीट्वीट झाले आहेत.
A long flight also means opportunities to go through papers and some file work. pic.twitter.com/nYoSjO6gIB
— Narendra Modi (@narendramodi) September 22, 2021
त्यांच्या या पोस्टवरच्या कॅप्शनचा अर्थ असाय कि, “फार दिर्घकाळ विमानप्रवास म्हणजे कागदोपत्री काम आणि काही महत्वाच्या फाइल्स तपासण्याची संधी असते,” मग काय मोदींची हि पोस्ट सगळीकडे व्हायरल झाली आणि लोकांनी आप-आपल्या सुपीक डोक्यातून आलेले मिम्स शेअर करायला सुरु केली.
लोकांनी हा फोटो शेअर करत विनोदी पद्धतीने मोदींना ट्रोल केले.
पण मोदींच्या या फोटोमधील एक-एक बारीक गोष्ट नेटकऱ्यांच्या तीक्ष्ण नजरेतून सुटली नाही. ते म्हणजे मोदींच्या बाजूला ठेवलेली बॅग आणि त्याला लावलेले छोटसं कुलूप. लोकांना याचं आश्चर्य वाटलं. आपण सामान्य लोकं म्हणजे ट्रेन- बस मधून प्रवास करतांना बॅगेला लावणारे मात्र मोदींनी देखील त्यांच्याच साठी असणाऱ्या भल्या मोठ्या विमानात त्यांना त्यांच्या बॅगला कुलूप का लावलं असेल.
यावर सोशल मिडियावरून अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया आल्यात.
आपल्या देशात मोदींना एवढी सेक्युरिटी मिळते त्यात मोदींना कुलूप लावायची गरज काय असंही काहींनी म्हणलंय.
कुणी लिहिलंय…
‘बॅगेला टाळं लावलंय बघा…’
मोदींच्या या फोटोवर टीकाकारांनी त्यांना टार्गेट केल्याचंही दिसून आलं आहे. काहींनी म्हणलंय कि, हा फोटो दिखाऊपणा असल्याचं म्हटलं आहे.
तर काहींनी मोदींना त्यांना इंग्लिश वाचता येते का? हा पण मोठा प्रश्न आहे अशा भाषेत ट्रोल केलं आहे.
तसंच काहींना मोदी अभ्यास करतांना पाहून स्वतःच्या परीक्षेचा काळ आठवला, पेपरच्या आदल्या दिवशी रात्रभर जागरण करून एम-थ्री काढण्याच्या तयारीत असलेला बॅकबेंचर !
पण मोदी ज्या विमानाबद्दल तुम्हाला माहितीये का?
पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेसाठी अमेरिकेत तयार झालेल्या या विमानाचा पहिला फोटो सगळीकडेच व्हायरल झाला आहे.
खास सुरक्षेचा विचार करून VVIP Boeing ७७७-३०० ER या विशेष विमानाची निर्मिती करण्यात आली आहे. सध्या असे दोन विमान तयार झाली आहेत. मोदींसाठी तयार करण्यात आलेल्या या विमानाची डिलिव्हरी या वर्षअखेरपर्यंत होणार आहे. खास मोदींच्या सुरक्षेसाठी हे विमानं तयार केले गेले आहे. यावर एखाद्या क्षेपणास्त्राने जरी हल्ला केला तरी हे विमानाला काहीच होणार नाही. या विमानाच्या निर्मितीसाठी भारत आणि अमेरिकेत करार झाला आहे.
या विमानासाठी भारत सरकारने तब्बल १ हजार २०० कोटी रुपये खर्च केले आहेत. या विमानात जी सुरक्षा पुरवण्यात आलेली आहे जी अमेरिकेच्या अध्यक्षांना देण्यात येते.