सफाई कामगार म्हणून ज्या ठिकाणी काम केलं ते बंगले सुनील शेट्टीच्या वडिलांनी विकत घेतले.

२०१३ चं साल होतं. वरळीत एक मोठीच्या मोठी बिल्डिंग बांधून झाली होती. या बिल्डिंगच्या उद्घाटनाला उद्घाटक म्हणून आला होता सुनील शेट्टी. उद्घाटन झाल्यावर मीडियाच्या लोकांनी सुनील शेट्टीला प्रश्न विचारायला सुरवात केली. त्यात सुनील शेट्टीने सांगितले की त्याने नवीन डेकोरेशन शोरूम सुरू केलंय. त्याचसोबत त्यानं हेही सांगितलं की,

अगोदर या बिल्डिंगमध्ये माझे वडील विरप्पा शेट्टी हे सफाई कामगार म्हणून काम करायचे. याच बिल्डिंगमध्ये वेटर बॉय म्हणून काम करायचे, प्लेट धुणं असो किंवा टेबल, रूम साफ करणं असो अशी सगळी काम विरप्पा शेट्टी करायचे.

वयाच्या ९ व्या वर्षापासून विरप्पा शेट्टी काम करत होते. संघर्षाच्या काळात मोहरींच्या पोत्यावर झोपणे आणि चटईच्या बॅगला उशी म्हणून वापरणे असा त्यांचा दिनक्रम असायचा. १९४३ साली सुनील शेट्टीच्या वडिलांनी एक सगळीच्या सगळी बिल्डिंग खरेदी केली होती जी वरळीच्या फोर सिझन हॉटेलच्या शेजारी आहे.

अगोदर विरप्पा शेट्टी जिथं काम करत होते तिथल्या मालकाने दुसरीकडे काम शोधण्यास सांगितलं. मोठमोठ्या लोकांचे मार्केटिंगचे गणितं विरप्पा शेट्टी न्याहाळत होते आणि सोबतच एका बाजूला कामही सुरू होतं.

काम करताना लाजायचं काम नव्हतं. कारण विरप्पा शेट्टी यांना सफाई कामगार म्हणून काम करायची सवय होती आणि वेटर बॉय म्हणून ते तिथल्या ग्राहकांमध्ये जास्त प्रसिद्ध झाले होते. हळूहळू ते जास्त मेहनत करत गेले आणि आर्थिकरित्या स्थैर्य लाभल्यावर त्यांनी चांगली प्रगती केली. आणि जिथं जिथं त्यांनी सफाई कामगार म्हणून काम केलं ती ती बिल्डिंग त्यांनी खरेदी केली. खरंतर या गोष्टीला मोठा काळ गेला, जास्त कष्ट उपसावे लागले पण एखादं प्रेरणादायी काम आपल्या हातून घडायच्या नकळत हेतूने त्यांनी काम केलं.

नंतर सुनील शेट्टीचं करिअर मार्गी लागलं. सिनेमातून लोकं ओळखू लागली काम मिळू लागली आणि सुनील शेट्टी बॉलिवूडचा महत्वाचा हिरो झाला. पण सुनील शेट्टीच्या मेहनातीमागे विरप्पा शेट्टींचा मोठा वाटा आहे. २०१३ साली विरप्पा शेट्टी यांना लकव्याचा अटॅक आला आणि ते अंथरुणाला खिळले पण ते यातून सावरू शकले नाही आणि २०१७ साली त्यांचं निधन झालं.

विरप्पा शेट्टी यांचा इतका संघर्षमय प्रवास सुनील शेट्टीला कायम बळ देत असतो. सिनेमांमध्ये आपला पोरगा सेलिब्रिटी आहे याचेही त्यांना कधी विशेष वाटत नसे असं सुनील शेट्टी म्हणतो. पण माझ्या वडिलांचा प्रवास माझ्यासाठी कायमच एक प्रेरणादायी गोष्ट असल्याचं तो सांगतो.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.