अपहरण झालेल्या दोन फोटोग्राफर्सनी वीरप्पनची दुसरी बाजू जगासमोर आणली..

१९९७ ची हि गोष्ट. हस्तिदंत आणि चंदन तस्कर वीरप्पन याने बंगाली प्राध्यापक डॉ. मैथीसह वन्यजीव छायाचित्रकार आणि चित्रपट निर्माते कृपाकर आणि सेनानी यांचे अपहरण केले होते. वीरप्पनने त्यावेळी विचार केला होता कि हि लोकं सरकारी अधिकारी आहेत. त्यामुळे आपल्याला काहीतरी धोका निर्माण होऊ शकतो म्हणून दोन आठवडे त्यांना वीरप्पनने डांबून ठेवलेलं होतं.

 कृपाकर यांनी १९९८ मध्ये सुद्धा या कन्नड साप्ताहिकात त्यांच्या या अपहरणाबद्दलचा लेख प्रकाशित केला होता.

कृपाकर आणि सेनानी यांना वीरप्पनच्या कॅम्पमधलं जेवण भात आणि सारू मिळालं तर संध्याकाळी साळू भात होता. नंतर ते सगळे गप्पा मारत बसले. अचानक कृपाकर यांनी बघितलं कि वीरप्पन नॅशनल जिओग्राफीची एक प्रत वाचत होता. 

जेव्हा कृपाकर आणि सेनानी यांचं अपहरण केलं होतं त्या रात्रीच्या लुटीत वीरप्पन पुस्तकसुद्धा घेऊन आलेला होता. त्या प्रतीवर २ आफ्रिकन बिबट्यांची छायाचित्रे होती. वीरप्पन ते शांतपणे न्याहाळत होता. तो अचानक उठून सेनानी यांच्याकडे आला आणि म्हणाला या चित्रांच्या खाली काय लिहिलंय जरा मला वाचून सांग बरं.

वीरप्पनच हे वेगळं रूप बघून ते सगळेच अवाक झाले. सेनानींनी प्रत्येक चित्राखालचा लेख वीरप्पनला समजावून सांगितला तेव्हा वीरप्पनने निसर्गाविषयी चिंता व्यक्त केली. पुन्हा तो त्याच्या जागेवर जाऊन बसला. आणि सेथुकुली या त्याच्या साथीदारासह गप्पा मारत बसला. ते हस्तिदंतावर चर्चा करत होते. 

सेनानी यांनी ती चर्चा ऐकली आणि ते म्हणाले जेव्हा आम्ही हत्ती बघतो तेव्हा त्याच वजन आणि इतर फीचर्स बघतो पण तुम्ही लोकं हस्तिदंत बघतात हि किती वाईट गोष्ट आहे. हस्तिदंतांमुळे मोठ्या प्रमाणात हत्तींची संख्या कमी होऊ लागली आहे. त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे कि तुम्ही हत्तीची शिकार करणं बंद करावं.

सेनानींच्या या बोलण्यावर वीरप्पन शांतपणे म्हणाला

मी हत्तींना मारून बरीच वर्ष झाली. पण मी असं म्हणल्यावर माझ्यावर कोणीही विश्वास ठेवत नाही. माझ्याकडे हत्तीच्या फक्त दोनच जोड्या शिल्लक आहेत पण त्याही म्हाताऱ्या झाल्या आहेत. मला संधी मिळेल तेव्हा मंदिरांसाठी मी ते हस्तिदंत दान करणार आहे.

वीरप्पन पुढे म्हणत राहिला जंगलांची संख्यासुध्दा कमी होत चालली आहे. जंगलात भटकणाऱ्या अनेक शिकाऱ्याना मी बजावून ठेवलेलं आहे कि हत्तीची शिकार करायची नाही. पण मी बाहेर मोहिमेवर गेल्यावर इतर शिकारी लोकं हत्तींना गोळ्या घालतात आणि दात काढून निघून जातात.

‘जंगलात काहीही झाले तरी ते मला जबाबदार धरतात. ज्या क्षणी त्यांना माहित आहे की मी काही ठिकाणी आहे, तेथील शिकारी फायदा घेतात आणि हत्तींना मारून हस्तिदंत बाहेर तस्करी करण्यास सुरुवात करतात. जर त्यांना माहित असेल की मी आजूबाजूला आहे, तर वन अधिकारी इतरांना प्रश्न विचारण्याची तसदी घेत नाहीत. शिकारी टस्क ठेवतात, मला दोष मिळतो. हा कोणता न्याय आहे ?

माझ्या माहितीप्रमाणे पंचवीस टोळ्या हस्तिदंत व्यवसायात गुंतलेल्या आहेत, हत्तींना मारत आहेत. याबद्दल कोणालाही माहिती नाही. प्रत्येकजण म्हणतो की वीरप्पनने ही हत्या केली. माझ्या बंदीपूरला आल्यानंतर तीन दिवसांच्या आत, मी चार मल्याळींना ओरडत, जखमी टस्करचा पाठलाग करताना पाहिले. त्यानंतर काय झाले मला माहित नाही. पण ते खरे आहे. ’तो पुन्हा गप्प बसला.

सेनानी हळूवारपणे त्याला विचारले, ‘कागदपत्रे सांगतात की तुम्ही सुमारे २००० हत्तींना मारले आहे?’

‘नाही, नाही, हे सर्व खोटे आहे. मला नेहमी कुणाच्या गुन्ह्यांचा दोष मिळतो.

सेनी, बघा, मानव खूप क्रूर आहेत. पृथ्वीवर असा क्रूर प्राणी नाही. फक्त मानव फसवणूक करतात, बदला घेतात, अन्यायकारक गोष्टी करतात, संशय घेतात … ते हत्तींना पकडतात आणि त्यांना सर्कसमध्ये विकतात. ते त्यांच्यावर अत्याचार करतात आणि पैसे कमवतात. ते हस्तिदंतीचे हार बनवून त्यांचा व्यापार करतात. ते हत्तींच्या शेपटीतील केस फाडून विकतात. ते त्यांचे पाय कापतात आणि त्यांचा मल म्हणून वापर करतात. 

अशी दोन आठवडे चर्चा कृपाकर आणि सेनानी वीरप्पनबरोबर करत होते. वीरप्पनसारखा क्रूर माणूस इतक्या इमोशनल गोष्टी करू शकतो यावर कुणाचा विश्वास बसणार नाही. पुढे त्यांनी वीरप्पन सोबतच्या २ आठवड्यांचा अनुवाद साप्ताहिकांमध्ये प्रसिद्ध केला ज्याला भरपूर नावाजलं गेलं होतं.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.