कॅप्टन्सी तर सोडा विराट कोहली रोहितचं उपकर्णधारपद काढून घेण्याच्या तयारीत होता…
भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन विराट कोहली याने नुकताच टी20 फॉर्मेट मधून आपली कॅप्टन्सी सोडली. 17 ऑक्टोबर पासून दुबईत होणाऱ्या टी -20 वर्ल्ड कपनंतर तो या फॉरमॅटमधली आपली कॅप्टन्सी सोडणार आहे. तर वन डे आणि कसोटी फॉर्मेटमध्ये विराटची कॅप्टन्सी कायम राहणार आहे.
त्याने गुरुवारी सोशल मीडिया वर पोस्ट शेअर करत आपली कॅप्टनसी सोडण्याविषयी माहिती दिली.
🇮🇳 ❤️ pic.twitter.com/Ds7okjhj9J
— Virat Kohli (@imVkohli) September 16, 2021
असे म्हटले जाते की, 2014 पासून विराट भारतीय क्रिकेट संघाचा कॅप्टन आहे. त्याच्याकडून सगळ्या फॉर्मेटची कॅप्टन्सीची आहे, ज्यामुळे विराटवर वर्कलोड वाढला होता. म्हणून त्याने ट्वेंटी फॉरमॅट मधून कॅप्टन्सी सोडण्याचा निर्णय घेतला.
विराट एक उत्कृष्ट फलंदाज आहे. आपल्या बॅटिंगच्या शानदार खेळीवरचं त्यानं भारतीय संघाची कॅप्टनसी मिळवली होती
आता विराट कोहलीच्या या निर्णयानंतर टी 20 फॉर्मेटच्या कॅप्टन्सीपदी रोहित शर्माचे नाव आघाडीवर आहे. कारण, रोहितच्या खेळाच्या जादू बरोबरचं त्याच्या कॅप्टन्सी बद्दलही सगळ्यांना चांगलचं ठाऊक आहे. महत्त्वाचं म्हणजे याआधीही विराट कोहलीच्या अनुपस्थितीत रोहित शर्माचं टीमची सूत्रे सांभाळत होता.
असे म्हटले जाते की, विराटने खूप विचार करून कॅप्टन्सी सोडण्याचा निर्णय घेतलायं. जेणेकरून तो आपल्या बॅटिंगवर लक्ष केंद्रित करू शकेल.
दरम्यान, विराट कोहली टी20 कॅप्टन्सी सोडणारं, अशी चर्चा गेल्या कित्येक दिवसांपासून होती. एका वृत्त संस्थेच्या अहवालानुसार, टीम मॅनेजमेंट आणि दोन मोठ्या खेळाडूंच्या यासंदर्भात अनेक बैठका झाल्या. ज्यानंतर काल स्वतः विराटने ही घोषणा केली.
आता रोहित शर्मा पुढचा कॅप्टन आहे असं जरी म्हटलं जात असलं तरी सुत्रांचं म्हणणं खरं मानलं तर विराट कोहलीला रोहित शर्मा आपला उत्तराधिकारी व्हावं असं जराही वाटत नाही. उलट त्याने बीसीसीआयकडे रोहित शर्मामी उपकर्णधारपद सोडावं अशी मागणी केली होती.
रोहित आता ३४ वर्षांचा आहे. त्याच्या ऐवजी एखाद्या तरुण खेळाडूला उपकर्णधार करावं अशी विराटची इच्छा होती. म्हणूनच त्याने केएल राहुलच नाव वनडेच्या उपकर्णधार पदासाठी आणि रिषभ पंतच नाव टी २० च्या उपकर्णधापदासाठी
आता तसं पाहिलं तर, रोहित कॅप्टन्सीसाठी पूर्णपणे तयार आहे. आयपीएल टी20 लीगमध्ये मुंबई इंडियन्सचा कॅप्टन म्हणून त्याने वर्षानुवर्षे यशस्वीपणे नेतृत्व केलयं. त्याचे नेतृत्वाखाली मुंबई टीमने पाच वेळा विजेतेपदाची ट्रॉफी आपल्या नावे केलीये.
रोहितची कॅप्टन्सी भारतीय संघासाठी काही नवीन नाही आयपीएलचं नाही तर रोहितने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही भारताचे नेतृत्व केलयं. त्याने 2018 मध्ये भारताला आशिया ट्रॉफी जिंकून दिलीये, त्याच वर्षी श्रीलंकेत निदाहास ट्रॉफीत एक अविस्मरणीय विजय आपल्या नावे केलाय.
त्यात रोहित शर्माच्या तूफानी बॅटिंगचा तर प्रत्येकजण जबरा फॅन आहे. त्याच्या बॅटिंगच्या जोरावर अनेकदा भारतीय संघानं मॅच आपल्या खिशात घातलीये.
एक व्हाईट-बॉल कॅप्टन म्हणून रोहितचा चांगला रेकॉर्ड आहे. रोहितने वन-डे क्रिकेटमध्ये 10 वेळा भारताचं कॅप्टनपद भूषवलयं, ज्यातल्या आठ मॅचमध्ये त्याने दणदणीत असा विजय मिळवून दिलाय तर 2 मॅच त्याला गमवाव्या लागल्या.
टी -20 मध्ये तो 19 वेळा कॅप्टन बनलाय, त्यापैकी 15 जिंकल्या तर चार मॅच भारतीय संघाला गमवाव्या लागल्या.
आता दूसरीकडे व्हाईट-बॉल कॅप्टन म्हणून कोहलीचा रेकॉर्ड देखील चांगला आहे. कोहलीने आतापर्यंत 95 वन डे क्रिकेटमध्ये भारताचे नेतृत्व केलेयं आणि ज्यातल्या 65 आपल्या खिशात घातल्यातं तर बाकी 27 वेळा मात्र हार मानावी लागली. 70.43 हे त्याच विनिंग परसेंटेज आहे.
तर 45 टी -20 मॅचच्या वेळी जेव्हा तो कॅप्टन होता, भारताने 27 वेळा विजय मिळवला तर 14 वेळा पराभूत व्हावं लागलं .
आता विराटने तर आपली कॅप्टनची सोडली परंतु रोहितच्या नावाची घोषणा कधी होतेयं, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
हे ही वाच भिडू :
- विराट कोहलीला जे जमलं नव्हतं ते या UPSC टॉपरने करून दाखवलय.
- विराट कोहलीचे फॅन आहात का? मग जाणून घ्या त्याच्या भन्नाट गोष्टी.
- रोहित शर्माच्या हॅट्रिकने सचिनच्या मुंबई इंडियन्सला रडवल होतं….