कोहलीच्या मुलीवर रेपची धमकी दिली, आता या IIT पदवीधरचं अमेरिकेत शिक्षण घेणं अवघड झालंय

सध्या टी-२० वर्ल्ड कप मॅच सुरु आहे. गेल्या महिन्याच्या १७ तारखेपासून या सीरिजला सुरुवात झाली. पण यंदा विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय क्रिकेट संघानं अत्यंत खराब कामगिरी केली. त्यात २७ ऑक्टोबरला पाकिस्तान- भारत सामन्याच्या वेळी तर भारतीय संघाचं आव्हान सुपर-१२ मध्येच संपुष्टात आलं.

यानंतर न्यूझीलंडविरुद्धही भारतीय संघाला पराभवाला सामोरे जावे लागले, त्यामुळे संघाचा सेमीफायनल पर्यंतचा प्रवास जवळपास संपला होता. यानंतर संघाने तिन्ही सामने जिंकले पण तरीही उपांत्य फेरी गाठता आली नाही. हा वर्ल्ड कप विराट कोहलीचा टी-२० कॅप्टन्सी म्हणून शेवटची स्पर्धा होती. ज्यामुळे देशभरातले क्रिकेटप्रेमी संघावर नाराजी करत आहेत.

 विराट कोहली आणि बाकीच्या खेळाडूंवर अपमानास्पद टीका केल्या जात आहे. एवढंच नाही तर एकाची तर मजाल पार विराट कोहलीच्या मुलीवर बलात्कार करण्या इतपत गेली. @criccrazygirl या अकाऊंटवरून विराटच्या ९ महिन्यांच्या मुलीवर बलात्कार करण्याची धमकी दिली. ज्यानंतर वातावरण पेटले. या युजर्सच्या वक्तव्यावर जगभरात निंदा झाली. 

दिल्लीच्या महिला आयोगानं याप्रकरणी पोलिसांना नोटीस पाठवून संबंधित युजरचा शोध घेऊन त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी ट्विट केले होते की, ९ महिन्यांच्या मुलीला ट्विटरवर ज्या प्रकारे धमक्या येत आहेत, ते खरोखरच लाजिरवाणे आहे.

सोबतच कॅप्टन विराट कोहलीच्या मॅनेजरनही याप्रकरणी एफआयआर दाखल केली होती. तक्रार दाखल झाल्यांनतर मुंबईच्या पोलिसांच्या सायबर सेलनं देखील कसून आरोपीचा शोध घेऊ लागले. अखेर काही दिवसांमध्ये पोलिसांनी संबंधित युजरचा शोध घेतला आणि हैदराबादमधून एका तरुणाला बेड्या ठोकल्या. 

पोलिसांनी याप्रकरणी जेव्हा चौकशी केली त्यावेळी समजले कि, संबंधित आरोप हा आयआयटी ग्रॅज्युएट आहे आणि पुढच्या शिक्षणासाठी तो अमेरिकेला सुद्धा जाणार होता. 

माहितीनुसार, विराट कोहलीच्या मुलीला बलात्काराची धमकी देणाऱ्या या आरोपीचं नाव रामनागेश श्रीनिवास अगुबथिनी आहे आणि तो २३ वर्षांचा आहे. दोन वर्षांपूर्वीच त्याने आयआयटी हैदराबादमधून ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. यानंतर तो एका फेमस फूट अॅप कंपनीत कामाला होता.

 महत्वाचं म्हणजे त्याला थोडथोडकं नाही तर तब्बल २४ लाखांचं वार्षिक पॅकेज होत, म्हणजे महिन्याला हा पठ्ठ्या तब्ब्ल २ लाख रुपये पगार घ्यायचा. रामनागेशला मास्टर डिग्रीसुद्धा करायची होती, ज्यासाठी तो अमेरिकेत जाणार होता. 

पोलिसांनी केलेल्या चौकशी दरम्यान रामनागेशने सांगितले कि, आपली ओळख लपवण्यासाठी तो फेक नावाने अकाउंट वापरायचा. सोबतच त्याने मान्य केले कि, त्याच्या फ्रस्टेशनमध्ये चुकून हे ट्विट केलं गेलं. आणि त्याचवेळी त्याच्या हातातून फोन स्लिप झाला. तो ही चूक दुरुस्त करणार तोपर्यंत त्याच हे ट्विट व्हायरल झालं. 

दरम्यान, सध्या आरोपी रामनागेश मुंबई पोलिसांच्या ताब्यात आहे. त्याच्यावर कडक कारवाई केली जाणार असल्याचे मुंबई पोलिसांनी सांगितले. 

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.