विराटचे इतर रेकॉर्ड एखादेवेळेस मोडले जातील पण हा रेकॉर्ड कोण मोडू शकणार नाही.

एकेकाळी आम्हाला वाटायचं गावसकरचे रेकोर्ड कोणी मोडू शकणार नाही. मग तेंडूलकर आला. तेव्हा वाटायला लागलं की सचिनचे रेकोर्ड कोण मोडने या जन्मात शक्य नाही. पण आमच्या डोळ्यादेखत विराट भाऊ त्या रेकोर्डच गंगार्पन करेल हे सरळच दिसतंय. आत्ताच लोक त्याला छोटा देव म्हणत आहेत. काही दिवसांनी तो महादेव होईल असच वाटतय.

काल पुण्याच्या कसोटीत त्याने विक्रमांचा पाऊस पाडला.

जुने विक्रमतर तो मोडतोयचं पण नवीन पण भरपूर विक्रम बनवले आहेत. यातच एक विचित्र विक्रम आहे. तेही बॉलिंगमध्ये. शून्य बॉलमध्ये एक विकेट घेण्याचा.  चकित झालात ना?

तर गोष्ट आहे २०११ सालची. भारताने नुकताच वर्ल्डकप जिंकलेला. जग गाजवलेली टीम इंग्लंड दौऱ्यावर गेली होती. पण धोनीच्या वीरांच संपूर्ण गर्वहरण या दौऱ्यात झालं होतं. आपण कसोटी ४-०ने हरलो. वनडे ३-०ने हरलो होतो.

या दौऱ्यात एक ट्वेंटी ट्वेंटी मॅच सुद्धा होती. राहुल द्रविडने खेळलेली ही एकुलती एक इंटरनॅशनल ट्वेंटी ट्वेंटी.

धोनीने टोस जिंकून पहिली बॅटिंग निवडली. पार्थिव पटेल सुरवातीलाच गचकला. त्याच्यानंतर राहाणे आणि द्रविडने भारतीय स्कोअरकार्ड हलता ठेवला. कोणी तरी कॉमेटेटर म्हणतच होता की द्रविड काय  ट्वेंटी ट्वेंटी साठी सुटेबल नाही. पण हे वाक्य पूर्ण व्हायच्या आधीच द वॉल राहुल द्रविडने समित पटेलला सिक्सर मारला.

एक सिक्स मारून ते गप बसल नाही तर एका पाठोपाठ एक असे सलग तीन सिक्स द्रविडने हाणले. आयुष्यात कधीही त्याने टेक्स्टबुक सोडून बाकीचे शॉट मारले नाहीत पण शेवटची संधी म्हणून सेहवागप्रमाणे आडवा पट्टा घुमवला त्यात बिचारा समित पटेल सापडला.

भारताची इनिंग संपली तेव्हा स्कोर झालेला १६५.

इंग्लंडची सुरवात काय चांगली झाली नाही. पहिल्या ओव्हरच्या दुसऱ्याच बॉलला प्रवीण कुमारने इंग्लंडची पहिली विकेट घेतली. मग आलेल्या केविन पीटरसनने मात्र चांगलाच  जम बसवला. मुनाफ, प्रवीण कुमार, विनय कुमार या तिघांना पण व्यवस्थित खेळून काढलं. वेळोवेळी बाउन्ड्री हाणल्या. त्याला आउट काढण गरजेच झालेलं.

काय तर वेगळी शक्कल लढवण्यासाठी फेमस असलेल्या धोनीने अचानक कोहलीकडे बॉल दिला. बिचाऱ्या कोहलीने आपल्या ट्वेंटीट्वेंटी कारकिर्दीतला पहिलाच बॉल एकदम लेग साईडला वाईड टाकला. पीटरसन मारायसाठी म्हणून बाहेर आला आणि वाईट गंडला. कारण मागे धोनी उभा होता. शून्य सेकंदात त्याने पीटरसनला आउट काढले.

पीटरसन आउट झाला पण कोहलीच्या नावे एक विक्रम करून. विराटने शून्य बॉलमध्ये एक रन देऊन एक विकेट घेतली होती. असा अनोखा विक्रम होईल हे त्यान स्वप्नात सुद्धा विचार केलं नसेल.

पुढे भारताने ही मॅच सुद्धा हरली. अगदी लाजीरवाणा पराभव घेऊन आपण घरी परतलो. कोहलीचा या सिरीजमध्ये फॉर्म नेहमी सारखा नव्हता. पण या अख्ख्या दौऱ्यात त्याच्यासाठी एकच विशेष गोष्ट म्हणजे हा अनोखा विक्रम. जगात अजून कोण असला रेकॉर्ड केला असेल माहित नाही.

जसे सचिनचे रेकोर्ड मोडत आहेत तसे कोहलीचे ही मोडतील पण हा बॉलिंग वाला रेकोर्ड कोणी मोडू शकणार नाही.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.