वीर दासच्या पाठीशी असणारी मंडळी मायावती प्रकरणात मात्र त्याच्या विरुद्ध गेलेत

वीर दास. एक स्टॅन्ड अप कॉमेडियन आणि एक्टर पण. आता ज्यांना तो आठवत नाही त्यांनी त्याला कसा आठवावा तर गो गोवा गॉन, बदमाश कंपनी, देल्ली बेल्ली पिक्चर थ्रू. या वीरदासचे स्टँडअप कॉमेडी शोज़ जगभरात खास फेमस आहेत.नुकताच त्याने अमेरिकेच्या वॉशिंगटन डीसी मध्ये परफॉर्म केलं. शो कंप्लीट करण्यापूर्वी या वीरदासने ‘टू इंडियाज़’ नावाची एक कविता सादर केली. त्या कवितेचा व्हिडिओ तर व्हायरल झालाच पण सोबतच वीरदास ही ट्रोल व्हायला लागला.

राष्ट्रवादी विचारांच्या लोकांचं म्हणणं होतं की वीर दासच्या कॉमेडी शो मधून भारतमातेचा अपमान झाला. त्याच्यावर केसेस पडल्या. देशद्रोहाचे आरोप देखील सोशल मीडियावरून केले जात आहेत.

अशावेळी वीर दासची बाजू मांडण्यासाठी अनेक पुरोगामी विचारांचे कार्यकर्ते धावून आलेत. कंगनाचा विषय मागे पडून इंटरनेटवर नवी भांडणे सुरु आहेत. 

वीर दास वादात सापडण्याचा हा पहिला प्रसंग नाही. यापूर्वी देखील तो वादात सापडला होता तेव्हा मात्र पुरोगामी विचारांची मंडळी वीर दासच्या नाही तर त्याच्या विरोधात उभ्या होत्या.

झालंय असं की वीर दासचा मायावती यांच्यावरील टिप्पणी चा एक जुना व्हिडिओ नेटकऱ्यांनी उकरून काढला आहे. या मुळे अजून एका नव्या वादाला पेव फुटले आहे.

या व्हिडिओत वीर दास ने काय आक्षेपार्ह टिप्पणी केली आहे ते आपण पाहू.

त्यात तो म्हणतो कि –

 “मी मायावतींचा तिरस्कार यामुळे नाही करत कि त्या एका पुरुषा सारख्या दिसतात. मी मायावतींचा तिरस्कार यामुळे नाही करत कि त्या उत्तर प्रदेशची भाषा बोलताना पेंग्विन प्रमाणे भासतात. तर मी त्यांचा  तिरस्कार यामुळे करतो कि मी त्यांना नोटांचा हार परिधान केलेले पाहिले आहे आणि यामुळेच मला त्यांची चिड येते. क्लिवेज् आणि नोटा मिळून पुरुषांच्या फॅन्टसी चा सर्वात कुरूप नमुना मी बघितला असे मला त्यावेळी वाटले”

वीर दास च्या या जुन्या व्हिडिओवर प्रकाश पडल्याने तो आणखीनच अडचणीत सापडला आहे. आधीच तो त्याच्या ‘टू इंडियाज्’ कवितेमुळे अडचणीत सापडला आहे या साऱ्यामुळे त्याच्यावर सरकारी कारवाई ला  देखील सुरुवात झाली आहे. ट्विटरवर त्याच्या विरोधात लोक मतं प्रदर्शित करू लागले आहेत. मध्य प्रदेश चे मुख्यमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी वीर दास च्या कार्यक्रमांवर बंदी घातली आहे.

त्याचे असे बिनधास्त व्हिडीओ हे मुख्यत्वे जातीयवादी, लैंगिक,राजकीय मुद्द्यांना हात घालणारे असतात.

कोण आहे वीर दास –

वीर दास हा एक कॉमेडियन आहे त्यासोबतच तो एक अभिनेता सुद्धा आहे. त्याने ‘गो गोवा गॉन’,’ बदमाश कंपनी’, कंगना राणावत सोबत ‘रिवाल्वर राणी’ ‘डेली बेली’ यासारख्या सिनेमात काम केले आहे. 42 वर्षीय वीर दास हा नेटफ्लिक्स च्या कॉमेडी स्पेशल ‘अब्रोड अंडस्टॅंडिंग’ ला साईन करणारा पहिला भारतीय आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर तो बराच लोकप्रिय आहे.

नुकतेच त्याने वॉशिंग्टन डीसी मध्ये एका शो च्या दरम्यान ‘टू इंडियाज’ नावाची कविता सादर केली. हा व्हिडीओ त्याने आपल्या यूट्यूब चैनल वर अपलोड केला व विडिओ ला शीर्षक दिले ‘आय कम फ्रॉम टू इंडिया’. त्याच्या या विडिओ मुळे त्याला देशविरोधी म्हटले जाऊ लागले आहे. वीर दास ने आपल्या या कवितेत म्हटले आहे की,

 ‘मी अशा भारतातून येतो जिथे दिवसा स्त्री ची पूजा केली जाते व रात्री तिच्यावर बलात्कार केला जातो. मी अशा भारतातून येतो जिथे शाकाहारी असल्याचा गर्व बाळगला जातो. परंतु येथील शेतकऱ्याला त्रास दिला जातो.’

त्याच्या या विडिओमुळे त्याला ट्विटर वर ट्रोल केले जात आहे. ‘टू इंडियाज’ ला काही लोकांनी सहमती दर्शवली आहे तर बऱ्याच जणांनी टीका देखील केली आहे. काँग्रेसच्या शशी थरूर, कपिल सिब्बल यांनी त्याला समर्थन केले आहे,तर काँग्रेच्याच अभिषेक मनू सिंघवी यांनी टीका केली आहे. चित्रपट निर्माते अशोक पंडित यांनी तर मला या मुलात एक ‘दहशतवादी’ दिसतो असे म्हटले आहे. विशेषतः भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते त्याच्या विरुद्ध जास्त चिडले आहेत हे दिसतंय.

असो आता त्याचा जुना व्हिडीओ व्हायरल झाल्यावर मायावतींच्या बद्दल त्याने केलेले डायलॉग ऐकून बहुजन समाज पक्षाचे कार्यकर्ते तर तापलेतच पण इतर स्त्रीवादी पुरोगामी कार्यकर्ते देखील चिडले आहेत. कोणताही राजकीय पाठिंबा नसताना एक दलित कुटूंबातून आलेली मायावती सारखी स्त्री स्वतःच्या जीवावर राजकीय स्थान निर्माण करते,युपीसारख्या राज्याची मुख्यमंत्री बनते हि साधी गोष्ट नाही पण अमेरिकेत भारतात स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचाराची कविता गाणारा वीर दास भारतातल्या कॉमेडी शो मध्ये मायावतींवर अश्लील टीका करून तोही काही वेगळा नसल्याचं सिद्ध करतोय हे मात्र खरं .

हे ही वाचा – 

 

Leave A Reply

Your email address will not be published.