संतविद्यापीठाची चर्चा होते पण बुवांनी १०० वर्षांपूर्वी वारकरी महाविद्यालय स्थापन केलेलं..

महाराष्ट्रात वारकरी सांप्रदायास विशेष महत्त्व आहे. दरवर्षी आषाढी कार्तिकीला आळंदी, देहू तसेच महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून पायी वाऱ्या पंढरीतल्या विठूरायाच्या दर्शनासाठी निघतात.

तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल असं नामस्मरण करणारा हा वारकरी संप्रदाय जो पिढ्यानपिढ्या पुढे वाढत गेला. पण महाराष्ट्रातील या वारकरी संप्रदायाचे कार्य पद्धतशीरपणे पुढे नेण्याचं काम केलं, ते विष्णु नरसिंह जोग यांनी अर्थात विष्णूबुवांनी.

आळंदीतील वारकरी शिक्षणसंस्थेचे संस्थापक, कीर्तनकार, प्रवचनकार असणारे विष्णुपंत जोग हे लोकमान्य टिळकांचे जवळचे आणि चहाते होते.

विष्णुबुवांचा जन्म पुण्यातलाचं. आई सरस्वती आणि तीन मोठे भाऊ असा त्यांचा परिवार. मोठा भाऊ पांडोबा महाराज हा मल्ल असल्यानं विष्णुबुवांनाही लहानपणापासून मल्लविद्येचा नाद होता. ते पुण्यातल्या नगरकर तालमीचे वस्ताद होते.

आपला भाऊ पांडोबा महाराजांबरोबर आळंदीला जाऊन जाऊन ते पांडुरंगाचे भक्त झाले. त्यांनी स्वतःला यात इतके वाहून घेतले की, त्यांनी ज्ञानेश्वरांच्या समाधीवरील माळ स्वतःच गळ्यात घालून घेतली आणि वारकरी झाले. 

विष्णुबुवा जोगमहाराज हे वारकरी संप्रदायाचे प्रवर्तक होते. गावोगावी फिरून कीर्तने-प्रवचने करून ते वारकरी संप्रदायाचा प्रसार करायचे. संतवाड़मय अनेक ग्रंथ त्यांनी सोप्या अर्थात प्रसिद्ध केले.

तुकारामाच्या अभंगांचा अर्थ लावून साथ गाथा तयार करण्याचे काम पहिल्यांदा जोगमहाराजांनी केले. इतिहासकार वि. का. राजवाडे यांनी म्हटलं की,

संतांना आणि संतवाङ्मयाबद्दल आदर, आपुलकी, जिव्हाळा उत्पन्न करण्याचे काम ज्या काही महान व्यक्तींनी केले, त्यात जोगमहाराजांचा सिंहाचा वाटा होता.

भजने, ज्ञानेश्वरी आणि तुकारामाची गाथा, पारायणं आणि पंढरीची वारी असा जोगबुवांचा दिनक्रम ठरलेला असायचा. त्यानंतर त्यांनी कीर्तन-प्रवचनांनी अख्खा महाराष्ट्र ढवळून काढला. त्यांच्या प्रवचनाला विद्वान लोकदेखील आवर्जुन उपस्थित राहावयाची.

जोगमहाराजांच्या आधी वारकरी कीर्तन साधं सरळ होतं. संत नामदेवांनी वारकर्‍यांच्या ‘फड’ असं नाव  देऊन वारकरी संप्रदाय वाढवला. दिंडी हा वारकरी संप्रदायाचा सर्वात लहान भाग मनाला जायचा. पूर्वीच्या काळातल्या बहुतेक दिंड्या कुठल्या ना कुठल्या फडाशी संलग्न असायच्या.

या फडांमुळे संप्रदायाच्या वाढीवर मर्यादा होत्या. फडांची मालकी वंशपरंपरेने चालत राहायची. ज्यात एखाद्या फडाशी संबंधित वारकर्‍याने दुसर्‍या फडावरच्या कीर्तनकाराचे कीर्तन ऐकणेही चालत नसायचे. वारकरी संप्रदायाची हीचं कोंडी फोडण्याचे काम विष्णू नरसिंह जोग महाराज यांनी केले. जोगबुवांनी किर्तनाला पंडिती पद्धतीच्या पूर्वपक्ष -उत्तरपक्षाची जोड दिली. या बदलामुळे शिकलेली तरुण मंडळी सुद्धा वारकरी संप्रदायाकडं आकर्षित झाली.

कीर्तनाच्या अभ्यासासाठी जोगमहाराजांनी आळंदीत वारकरी महाविद्यालयाची स्थापना केली

विष्णुबुवा नियमशील वारकरी होते. त्यांना समाजात मान होता, प्रतिष्ठा होती. आपणं बरं आनं आपली विठूमाऊली बरी असं त्यांच म्हणणं होतं. मात्र, त्यांना सुद्धा न्यायालयीन खटल्याला सामोरे जावे लागले होते. १९०७ मध्ये हा खटला जळगाव कोर्टात भरण्यात आला होता.

संतांच्या निरोपाप्रमाणे ते स्वतः जन्मभर वागले. शेवटी त्यांना भयंकर आजाराने ग्रासले. ह्या तापाने त्यांना फारच  छळले, पन आजारांतही ते आत्मविश्वासाने म्हणत “आम्ही आळंदीशिवाय दुसरीकडे मरनारच नाही. ”

अखेर ५ फेब्रुवारी १९२० चा तो दिवस महाराज आळंदीला जायच्या गोष्टी बोलु लागले. दुसऱ्याचं दिवशी पुणे सोडून त्यांना घोड्यांच्या गाडीतुन आळंदीला नेण्यांत आले.  महाराज आपल्या वारकरी शिक्षणसंस्थेत उतरले. त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांना इंद्रायणीचे तीर्थ आणुन दिले गेले. नंतर बसविण्यात आल्यावर ते उत्तरेकडे तोंड करुन बसले आणि “जातो” म्हणाले. अश्याप्रकारे  विष्णूबुवांनी देह ठेवला.

हे ही वाचं भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.