तिला प्रत्यक्षात बघायला औरंगाबादमध्ये एका वेळी पाच हजार पोरं गोळा झालेली.

खुदा की इनायत है हमे जो मिलाया है…
दिया प्यार वाला ये दिल में जलाया है…

टिकटॉकवरच सगळ्यात हिट सॉंग आहे हे. बरं या गाण्याचे लिरिक्स बोलभिडूच्या कृपेने आज पहिल्यांदा तुम्हाला कळले असतील. नाहीतर खुदा की इनायत.. यापुढे तसही काही कळत नाही. टिकटॉकवर या गाण्याचा ट्रेन्ड आलेला. दिसलं तो सोम्यागोम्या खुदा की इनायत करत गाणं म्हणतं होता. हजार बाराशे लाईक तर कुठच जात नव्हते.

याच काळात एका पोरगीनं हा व्हिडीओ केला. व्हिडीओ कसा तर शांत, सभ्यपणे एका कोपऱ्यात बसून आपल्या भूवयावर लोकांच्या काळजात हात घातला. प्रिया वॉरियर नंतर महाराष्ट्रात जन्मलेली हि केस पाहून महाराष्ट्रातली निम्मी पोरं घायाळ झाली. राहिलेली निम्मी पण घायाळ झाली असती पण ती MPSC करत होती, त्यामुळं वाचली. tiktok न वापरणाऱ्यांपर्यन्त देखील हिचे व्हिडीओ पोहचले.

नागराज मंजुळेंना परत एकदा सामान्य चेहऱ्यात हिरोईन दिसली असेल म्हणून सामान्य पब्लिकने पण लय लोड घेतला नाही. पण पिक्चरच काय नाव निघेना. तेव्हा कुतुहूल वाटलं तर माणसांनी सांगितल हि पोरगी टिकटॉक स्टार आहे. एका दिवसात लाखांत पब्लिक वढलय हिने.

साहजिक प्रिया वॉरियरच्या डब्बल वेगानं भुवया उंचावल्या. पोरांच्याच नाहीत तर पोरी सुद्धा थक्क थक्क व्हायला लागल्या. 

असो फाफट पसारा लय झाला, कामाचं बोलू. हिचं नाव विष्णू प्रिया नायर. विष्णू प्रिया नायर हि औरंगाबादची. तीच कुटूंब मुळच केरळचं. आणि तिचे वडिल औरंगाबादच्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये काम करतात. अस सांगितलं जातं. (माहिती ठिक वाटते पण औरंगाबादमध्ये पंचतारांकित हॉटेल आहे का? याबद्दल प्रश्नचिन्ह आहे) असो तर विष्णुप्रिया नायर B.Com शिकतेय अस सांगितल जातं.

तिच्याबद्दल माहिती अशी की, 

तिला टिकटॉक सारख्या गोष्टीबद्दल काही माहिती नव्हतं. कॉलेजचा ट्रेन्ड बघून तिने टिकटॉक डाऊनलोड केलं. गरिबासारखे काही व्हिडीओ केले. पाच पन्नास लाईक आल्या. विशेष काही नव्हतं पण टिकटॉकचा नाद लागण्यासाठी पाच पन्नास लाईक देखील महत्वाच्या असतात. तिला नाद लागला.

पुढे काय झालं तर तिचे मित्र साईनाथ पाटील आणि ऐश्वर्या त्रिभूवन हे कॉलेजमध्ये नेहमीप्रमाणे चकाट्या पिटत बसले होते. त्या दिवशी कुणीतरी चांगल्या कॅमेऱ्याचा फोन आणला होता. तिने नेहमीसारखं कायतरी करायचं म्हणून व्हिडीओ केला.

तोच हा व्हिडीओ. खुदा की इनायत… 

व्हिडीओ केला आणि टिकटॉकवर टाकलां. आत्ता चार पाच व्हू येतील, एखादा लव्ह येईल या विचारात पोरगी होती. तोच एका मागून एक लव्ह यायला लागले. हळुहळु करत व्हिडीओ हजारात पोहचला. पोरगीला जग जिंकल्याचा फिल आलेला. पण इतक्यावर भागणाऱ्यातलं नव्हतं. तिच्या नशिबात यापेक्षा पोत्यानं लिहून ठेवलं होतं.

पुढच्या दहा दिवसात तिला २३ लाख लोकांनी फॉलो केलं. 

किती २३ लाख. म्हणजे किमान दोन लोकसभा मतदारसंघात असणाऱ्या सगळ्या लोकांनी. इतकी लोकांमागे निवांतपैकी आठ दहा आमदार असतात. पण इथं गणित वेगळं झालं. इतक्या लोकांनी तिला फॉलो केलं. ते पण कशाच्या जिवावर तर फक्त एका व्हिडीओच्या जिवावर. तो पण फक्त १५ सेकंदाच्या व्हिडीओवर.

इतक्यात केस थांबली नाही.

रातोरात स्टार होण्याचा करिष्मा तिने करुन दाखवलां. हे तर पप्या गायकवाडला देखील जमलं नव्हतं. तिचा पत्ता शोधून तिच्या घराबाहेर पोरपोरी लाईन लावू लागले. विष्णुप्रियानं आपल्यासोबत फक्त एक व्हिडीओ करावा म्हणून पोरं मर मर मरायला लागली. आत्ता सुपाऱ्यांपासून व्हिडीओ करण्यापर्यन्तच्या ऑफर तिच्या पायाशी लोळण घेवू लागल्या.

एकदा भेटण्यासाठी पाच हजार पोरं गोळा झाली, तर अडीच हजाराचं तिकीट काढून हिला बघायला लोक आले. 

आत्ता टिक-टॉक वर फॅन्स मिट अप नावाचा प्रकार पण असतो, म्हणजे टिकटॉकवर एकमेकांना फॉलो करणारे प्रत्यक्षात येवून भेटतात. औरंगाबाद मध्ये असा मिटअप ठेवण्यात आला होता. तिथे तिची एक झलक बघण्यासाठी पाच हजाराहून अधिक पोरंपोरी गोळा झाली होती. टिकटॉकवरच्या व्हिडीओत कुठल्यातरी कोपऱ्यात विष्णुप्रिया दिसेल म्हणून हि पोरं दिवानी झालेली.

अस पण सांगितलं जात कि काहि महिन्यापुर्वी तिच्या उपस्थितीत पुण्यातल्या बालगंधर्वमध्ये एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तिथं तिला पाहता यावं म्हणून तिकीट ठेवण्यात आलं होतं आणि तिकीटची किंमत अडीच हजार होती.

बरं आत्ता तुम्ही म्हणतं असाल टिक टॉक रिकाम्या लोकांचा धंदा आहे तर सांगायची गोष्ट म्हणजे टिकटॉकवर स्टार होवून विष्णु प्रिया आत्ता लाखात कमवत असणार आहे.

टिकटॉकवर व्हिडीओ बनवून पैसे मिळत नसले तरी ती त्यातले व्हिडीओ पैसे देणाऱ्या यु ट्यूब चॅनेलवर टाकते. नुकताच मे महिन्यात तिला महाराष्ट्र गौरव कलेचा हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्या व्हिडीओला ४.५ मिलीयन लाईक मिळाले. राहता राहिलं टिकटॉकवर आज फॉलो करणारे लोकं तर त्यांची संख्या ४.५ मिनियन आहे. ४.५ मिलीयन म्हणजे ४५ लाख. अहो फेसबुकवर ABP माझाच्या पेजला पण तेव्हडे लाईक नाहीत तेव्हडं मार्केट या पोरीनं एकटीनं खाल्ल आहे. सोबत insta, युट्यूब आहेतच.

तर यातून तुम्ही काय शिकला..

काहिच नाही कधी कुणाचं नशिब उजळून निघलं सांगता येत नाही इतकचं शिकलात. 

हे हि वाच भिडू.

3 Comments
 1. Vaibhav says

  Bhidu!!! Aurangabad madhe 3-3 Five star hotels ahet br:
  Nahi tumachya research team ne thodi chukichi mahiti dili mhanun

 2. Vipul says

  Bhidu jara pune satara sangli kolhapur chya pudhe nigha aani dusrya cities che pan gungaan krayla shika….janiwpurvak tomna hota aurangabad laa five star hotel aahe kaa…..lemon tree,ajanta ambasaddorr,Rama international,Taj vivanta evdhe aahet….amchya ithe active airport suddha aahe….Dhoni chi bayko aurangabad laa kaam kraychi tevha tyanchyat prem julle…..dhoni khaas tila bhetayla yaycha kiti weles….

 3. srj-abdkar says

  Aurangabad Marathwada chi Rajdhani aahe

  1 sodun 3-3 Hotels Aahet 5 star

  MS Dhoni movie bghitla ki nahi

Leave A Reply

Your email address will not be published.