पुतीन यांच्या मुली नेमकं काय करतात..?

व्लादिमिर पुतीन यांची परत एकदा रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड झालीये. जगातल्या सर्वशक्तिमान नेत्यांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुतीन यांच्या व्यक्तिमत्वाभोवती कायमच एक गूढतेचं वलय राहिलंय. ‘केजीबी’ या  गुप्तहेर  संघटनेचे एजंट म्हणून आपलं काम पाहिलेल्या पुतीन यांनी आपल्या कौटुंबिक आयुष्याबद्दल कमालीची गुप्तता राखलीये. त्यांच्या कौटुंबिक आयुष्याबद्दल कुणालाच काहीच कल्पना नाही. त्यांना २ मुली आहेत, परंतु त्या नेमक्या काय करतात आणि कुठे असतात याबद्दलची काहीही माहिती अधिकृतरित्या कधीच  समोर आलेली नाहीये. पुतीन यांनी आपलं कुटुंब एखाद्या रहस्यासारखं गुप्त ठेवलंय.

KATERINA TIKHNOVA 2

असं असलं तरी त्यांच्या २ मुलींपैकी एकीची ओळख हळूहळू समोर येतेय. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल पण पुतीन यांची एक मुलगी कॅटरीना तिखनोवा ही प्रोफेशनल ‘रॉक अँड रोल डान्सर’ आहे. तिखनोवा हे तिचं आजोळचं नांव. अनेक जण कॅटरीना ही पुतीन यांची मुलगी असल्याचं सांगत असले तरी या गोष्टीला देखील अधिकृत पुष्टी नाही. अनेक जणांनी अनेकवेळा तसे दावे केले, पण कुणीही एकदा केलेल्या दाव्यावर ठाम राहू शकलेलं नाही. पुतीन यांची दहशतच इतकी की तसा दावा करणाऱ्या बहुतांश जणांनी नंतर पलटी मारली, त्यांनी एक तर आपला दावा मागे घेतला किंवा पुतीन यांनी संबंधितांच तोंड बंद केलं. मारिया पुतिना ही पुतीन यांची दुसरी मुलगी असल्याची माहितीही समोर येतेय. मारिया आपल्या नवऱ्यासोबत नेदरलँड्समध्ये राहते. अर्थात ही माहितीही अशीच सूत्रांच्या आधारेच.

पुतीन यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्याविषयी देखील प्रचंड गुप्तता बाळगलीये. २००९ साली एका वृत्तपत्राने बातमी छापली की, पुतीन हे त्यांच्या बायकोला घटस्फोट देऊन एका आंतरराष्ट्रीय जिम्नॅस्टशी लग्न करणार आहेत. त्यावेळी त्या बातमीचं खंडन करण्यात आलं  परंतु त्यानंतर काही दिवसातच बातमी देणारं वृत्तपत्र बंद पडलं. पुढे २०१३ मध्ये पुतीन यांनी त्यांच्या पत्नीला घटस्फोट दिला. कौटुंबिक आयुष्यातील गुप्ततेबाबत ज्यावेळी पुतीन यांना छेडलं जातं, त्यावेळी ते सांगतात की, “आपल्या कुटुंबीयांना सामान्य माणसांप्रमाणे आयुष्य जगता यावं, सेलिब्रिटी असण्याचं प्रेशर त्यांच्यावर असू नये म्हणून ही काळजी घेतली जाते.”

1 Comment
  1. abhiram s dabir says

    realistic site

Leave A Reply

Your email address will not be published.