गोएंकांनी पैसे सिएट टायरच्या जोरावर कमवले….

टीव्हीवर म्हणा किंवा मोबाईलवर म्हणा गाड्यांच्या जाहिरातींचा सुळसुळाट झालेला दिसून येतो त्यातही मग गाडीचे वेगवेगळ्या पार्टची खासियत मग त्याचं प्रमोशन वैगरे असे विविध उद्देश असतात. पण यात टायर आणि त्याच्या विविध कंपन्यांची जाहिरात कायम दिसून येते. सेलिब्रिटी लोकसुद्धा यातून रग्गड पैसे कमावतात. MRF काही काळ आघाडीला होतं पण एका टायर कंपनीने त्याला ओव्हरटेक करत आपलं एक स्पेशल मार्केट तयार केलं तर त्याबद्दल आपण जाणून घेऊया.

टायरांची जाहिरात म्हणल्यावर दोन कंपन्यांची नावं चटकन आपल्या डोळ्यासमोर येतात ते म्हणजे एमआरएफ आणि सिएट बाईक टायर्स. पैकी आपण सीएट टायर कंपनीचा इतिहास जाणून घेऊया. परकीय कंपनी भारतात इतक्या मोठ्या प्रमाणावर कशी रुजली.

कंपनीची स्थापना Cavi Elettrici e Affini Torino (विद्युत केबल्स आणि ट्यूरिनचे सहयोगी उत्पादने) या नावाने व्हर्जिनियो ब्रुनी टेडेस्ची यांनी 1924 मध्ये इटलीतील ट्यूरिन येथे केली होती.

10 मार्च 1958 रोजी, कंपनीचा समावेश CEAT टायर्स ऑफ इंडिया म्हणून मुंबईत करण्यात आला. सुरुवातीला, कंपनीने टाटा समूहासोबत सहकार्य केले. 1972 मध्ये कंपनीने भांडुप येथे संशोधन आणि विकास युनिट स्थापन केले. 1981 मध्ये, डेक्कन फायबर ग्लास लिमिटेड कंपनीत विलीन करण्यात आली. 1982 मध्ये, रामप्रसाद गोएंका यांच्या आरपीजी ग्रुप ने कंपनी विकत घेतली आणि 1990 मध्ये कंपनीचे नाव बदलून CEAT करण्यात आले. 1993 मध्ये, कंपनीने योकोहामा रबर कंपनीसोबत त्यांच्या नाशिक युनिटमध्ये रेडियल टायर्स तयार करण्यासाठी सहकार्य केले.

1999 मध्ये, CEAT ने श्रीलंकेत CEAT टायर्सचे उत्पादन आणि मार्केट करण्यासाठी Asia MotorWorks (AMW) आणि Kelani Tyres सोबत CEAT Kelani नावाचा एक संयुक्त उपक्रम स्थापन केला. 2006 मध्ये, CEAT केलानी यांनी त्यांचे पहिले श्रीलंका-आधारित रेडियल-टायर उत्पादन युनिट कालुतारामध्ये सुरू केले. पणन 2009 साली ते या उपक्रमातून बाहेर पडले.

आज घडीला 165 मिलियन टायर सीएट कंपनी बनवते. 800 टन निर्मितीचे संयंत्र सीएट कंपनीकडे आहेत. CEAT अवजड व्यावसायिक वाहने, हलके व्यावसायिक वाहन, महामार्गावरील टायर, प्रवासी कार, ट्रॅक्टर, मोटरसायकल आणि स्कूटर, सायकल आणि SUV सारख्या विविध प्रकारच्या वाहनांसाठी टायर तयार करते ते आशिया निर्यात करते. करोडोंची उलाढाल यातून सीएट करते आहे.

मार्केटिंगमध्ये एमारेफला सुद्धा तगडी फाईट आज फक्त सीएट टायर्स देते आहे. बॉलिवूड सेलिब्रिटीसुद्धा मोठ्या प्रमाणात सीएटच्या जाहिरातीत आपल्याला दिसून येतात.

नुकताच सुनील गोएंकांनी आयपीएलची टीम खरेदी करण्यासाठी बोली लावली. हे सुनील गोएंका म्हणजे सिएट टायर विकत घेणाऱ्या रामप्रसाद गोएंका यांचे सुपुत्र. ते सध्या जरी सिएट टायर पासून वेगळे झाले असले तरी त्यांची जडणघडण आरपीजी गृपमध्येच झाली आहे.सध्या सिएटची जबाबदारी अनंत गोएंका सांभाळतात

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.