स्वतःच्या नशिबाला नाव ठेवणाऱ्यांनो हा बघा जगातला आजवरचा सर्वात अनलकी माणूस…

असा एखादा क्षण असतो कि तो आपल्या आयुष्याला तो कलाटणी देऊन जातो. चांगलं नशीब हे एकदाच दार ठोठवतं नेमकं आपण त्या टायमाला जागं असलं पाहिजे. नशिबाचा खेळ, नशीब म्हणेल तिकडं, पूर्वजांची पुण्याई वैग्रे असे अनेक वाक्य आपण ऐकत, पाहत असतो. पण काहींच्या आयुष्यात सगळं काही ओके मधी डन सुरु असतं पण नंतर अशी काही लाट येति कि सगळं वाहून जातं.

आजचा किस्सासुद्धा अशाच एका माणसाचा आहे ज्याची गोष्ट पाहून आपल्याला आपल्या ब्रेकअपच दुःख काहीच वाटणार नाही. एकच घटना सतत घडायला लागली तर डोकं फिरणार नाही मग काय होईल तसाच गेम या भिडूसोबत झालेला आणि तो इतिहासातला सगळ्यात दुर्दैवी व्यक्ती म्हणून ओळखला गेला. 

वॉल्टर समरफोर्ड हा ब्रिटनमध्ये राहणारा गडी होता आणि तो मेन म्हणजे सैन्यात होता.

सगळ्यात भयानक गोष्ट म्हणजे जिवंत असताना त्याच्या आयुष्यात तीन वेळा अशा घटना घडल्या त्यामुळे त्याचं जीवन बदलून गेलं पण या दुर्दैवी घटना त्याच्या मृत्यूनंतर सुद्धा त्याचा पिच्छा सोडू शकल्या नाही. त्यामुळे बदकिस्मत हा टॅग त्याच्या नावापुढे लागला गेला.

१९१८ च्या विश्वयुद्धाच्या काळात वॉल्टरला बेल्जीयममध्ये तैनात करण्यात आलेलं होतं. याच दरम्यानची हि गोष्ट आहे कि एक दिवस घोडेसवारी करत असताना वॉल्टरच्या अंगावर अचानक वीज कोसळली. वीज कोसळल्याने वॉल्टरचा कमरेखालचा सगळा भाग पॅरालाईज्ड झाला. पण काही महिन्यातच तो या दुर्दैवी घटनेतून सावरला आणि आधीसारखा चांगला हिंडू  फिरू लागला. 

पण या आजारपणामुळे त्याला सैन्यामधून काढून टाकण्यात आलं.बरोबर ६ वर्षानंतर म्हणजे १९२४ साली वॉल्टर आपल्या कुटुंबासोबत कॅनडामध्ये नव्याने आपलं आयुष्य जगत होता. त्यावेळी सेम पहिली जी घटना वॉल्टरसोबत घडली होती तशीच घटना पुन्हा घडली. 

एका दिवशी मासेमारीसाठी तो एका तलावाशेजारच्या झाडाखाली बसलेला असताना परत एकदा त्याच्या अंगावर वीज पडली. यावेळी शरीराच्या डाव्या बाजूचा भाग पूर्णपणे पॅरालाईज झाला. पण आधीप्रमाणे दोन वर्षाच्या आतच वॉल्टर पूर्णपणे बरा झाला.

आता दोन घटना झाल्या म्हणल्यावर आपल्याला वाटलं असेल कि बाबा ठीकाय पण तिसरीसुद्धा घटना घडली आणि तीही सेम.

एकच भाजी रोजरोज खायला आपलं तोंड वाकडं होतं दर काही वर्षांनी हा बाबा वीज पडून पॅरालाईज व्हायचा म्हणजे काय जोक वाटला का काय. तर पुन्हा एकदा सेम घटना तिसऱ्यांदा घडली. ६ वर्षानंतर १९३० साली आपल्या बगीचामध्ये फिरत असताना अचानक वातावरण बदललं आणि अचानक परत एकदा वॉल्टरच्या अंगावर वीज कोसळली.

यावेळी बराच काळ तो आजारी राहिला, पुन्हा एकदा तो बरा होईल अपेक्षा सगळ्यांनाच होती पण तसं काही घडलं नाही आणि शेवटी १९३२ साली वॉल्टर समरफोर्ड मरण पावला. वॉल्टरच्या निधनानंतर त्याच्या घरच्यांनी कॅनडाच्या व्यंकूवरमध्ये माउंटेन व्ह्यूमध्ये त्याला दफन केलं.

पण इथंही नशिबाने वॉल्टरचा पिच्छा सोडला नाही. ६ वर्षानंतर १९३६ साली पुन्हा एकदा वीज कोसळली पण यावेळी ती वॉल्टरच्या कबरीवर कोसळली. कबरीचे दोन तुकडे झाले. खरतर हे एक आश्चर्य बनून राहिलं कि दर ६ वर्षांनी वॉल्टरवर वीज कशी कोसळायची ? याच कारणामुळे वॉल्टर समरफोर्ड हा इतिहासातला सगळ्यात दुर्दैवी माणूस ठरला. 

हे हि वाच भिडू :

1 Comment
  1. PRAFUL NETKE says

    खर तर वैज्ञानिक आणि तज्ञांनी वॉल्टर यांच्या बाबतीत घडलेल्या या संपूर्ण प्रकाराचा गांभीर्याने अभ्यास केला असता तर, एक वेगळ रहस्य वॉल्टर यांच्या बाबतीत वाचायला मिळाले असते.

    माहिती छान आहे
    बोल भिडू टीम चे आभार.

Leave A Reply

Your email address will not be published.