शेतकऱ्यांच्या अगणित पिढ्यांनी समृद्ध केलेला मार्गय हा वारीचा..

प्रचंड मोठा इतिहास भूगोल असलेली वारी शब्दात चित्रात फोटोत उभा राहू शकत नाही. हा आवाका ती जगल्यावर येतो, आणि एकदा गेलेला ओढत जातो पुन्हा पुन्हा पुन्हा…

वारी आली कि वारी वरच्या फिल्म्स ची रास लागते टीव्ही ला. सीझन वाईज तसं असतंयच.

आता नवीन प्रकरण म्हंजे फेसबुक वरनं टीका टाका सुरू झालीय वारी न वारकरी या जीवनमार्गावर..

आकाश चटके.

वारकरी म्हणजे शेतकरी vice versa

तर असल्या फिल्म्स मध्ये दाखवल्या सारखं काय पांडुरंग नवसाला वगैरे पावत नसतोय, वारी चा उद्देश बी तो नसतोय आणि वारकरी पदर पसरून च जातोय असंहि काय नसतं. वारी आणि वारकरी हा विषय प्रचंड वेगळा आहे. हा सोहळा नवस वगैरे च्या या आंधळ्या विश्वापासून फार फार वेगळा आहे.

संतांनी विज्ञानवादी दृष्टीकोन ठेवूनच समाजाला प्रबोधन केलं. मग नवसाने मुलं होत नाहीत पासून आज उभा राहिलेल्या पर्यावरणाच्या असमतोलाचा उपाय तुकोबांनी त्या काळात समाजाला जगाला सांगितलेला. ग्रामीण भागाशी नाळ जोडलेला हा एकमेव सोहळा म्हणजे वारी. चौका चौकात रस्ते अडवून 10-10 दिवस मुर्त्या बसवून, देणगी च्या नावाखाली लाखो करोडो ची खंडणी गोळा करून हा उत्सव होत नाही.

आकाश चटके.

कम्युनिकेशन लोकांच्या हातात या दशकात आलं, त्या आधीपासून शेकडो वर्ष वर्षातून एकदा समंध महाराष्ट्र अगदी कर्नाटक आंध्रा ला धरून एकत्र यायचा 15-20 दिवस. संपूर्ण कोपर्याकोपर्यात व्यापारापासून सोयरीकीपर्यंत संबंध जोडायचं ठिकाण म्हणजे हि रुळलेली वाट. एकमेकांच्या भेटी गाठी पासून कृषीसाल्ल्यांपर्यंत.

हि वाट राजापासून रंकाला सोबत चालायला लावते हीच वारी ची गोम आहे. माणूस म्हणून माणसाला जगायची जाणीव करून देऊन ते मनुष्यत्व किती क्षणभंगुर आहे याचीही जाणीव हीच वाट करून देते. अफाट पैसा आहे म्हणून कोणाच्या प्रवासातला 4 पावलं कमी होत नाहीत. येणारा नाव आडनाव मागं सोडून आलेला असतो, तो एक वारकरी असतो. 80 वर्षाचा आबा मग 8 वर्षाच्या पोराच्याबी पाया पडतो मग. इथं उच्च नीच स्त्री पुरुष भेद नाही.

ग्यानबा तुकाराम चा जयघोष टाळ मृदूंगचा नाद एका लयीत असतो, त्यात गोंधळ गोंगाट कर्कश्यपणा नसतोच.

‘रींगणा’पासून ‘धावे’पर्यंत सर्व सर्व गोष्टी एका लयीत एका शिस्तीत एका कारणाने असतात.

आकाश चटके

 

वारीतनं दिंड्या अन अख्खा महाराष्ट्र ईठ्ठलाच्या पंढरपुरात घुसायला लागतो तो क्षण अमर चिरतरुण चिरंजीव आहे.

प्रचंड मोठा इतिहास भूगोल असलेली वारी शब्दात चित्रात फोटोत उभा राहू शकत नाही. हा आवाका ती जगल्यावर येतो, आणि एकदा गेलेला ओढत जातो पुन्हा पुन्हा पुन्हा…

प्रत्येक मागची पिढी वारी पुढची पिढी वारसा जपेल काय च्या काळजीत नामदेव पायरी पसनं लांब जात असते तशी पुढची पिढी मागं नामदेव पायरी वर डोकं ठेवत पांडुरंगाला बघत 18 दिवसाच्या पायपीटीला विसरून समाधानानं उभी असतेय…

दिंडी चोपदार वारकरी विणेकरी टाळकरी पताका अन जयघोष ज्ञानोबा माऊली तुकाराम…..!

हा वारसा आहे

तीनं जपलेला, स्वीकारलेला, पुढं चालवलेला..

वारसाय त्या तिच्या अंधुक दिसाय लागलेल्या म्हाताऱ्याचा..

म्हाताऱ्याच्या डोळ्यातली फुलं काढायला दिसरात्र मजुरीला जुपुन घेऊन वारी चुकवलेल्या बापाचा ..

दुष्काळाच्या छाताडावर पाय ठिवून एकरभर रानात लेकरासींच सुख उगवायची वाट बघणाऱ्या माय रक्मिचा ..

लुगड्याचं ठिगळ पदराखाली झाकून आकाडाचं वारं शांत व्हायची वाट बघणाऱ्या म्हाताऱ्या आज्जीचा..

हा वारसाय कित्येक दशकं त्या पंढरीच्या ईट्टलापशी साकडं घालणाऱ्या महाराष्ट्र मातीचा अन मातीतल्या शेतकऱ्याचा..!

आकाश चटके

 

वारी आस्तिक नास्तिकतेच्या पलीकडे आहे.. आस्तिक आहेत म्हणून वारी वारकऱ्यांचा शेतकऱ्यांचा तिरस्कार द्वेष करणाऱ्या भावांनो बहिनींनो, “द्वेष ही सुद्धा एक अंधश्रद्धा आहे.”

विचार जगणं अस्तित्व मोह माया सगळं सगळं असंच पाहिजे तसंच पाहिजे यातलं काहीही शिकवू नका, ज्याला ज्यात रस आहे ते करुद्या.

तुमच्या वाटेत न येणाऱ्यांच्या वाटेत जायची तसदी घेऊन मिळणार काही नाहीच पण पायदळी तुडवले जाल ते वेगळं.

कळतं की प्रत्येकाला ज्याचं त्याचं.

मी याला याला मानत नाही याचा अर्थ त्याला मानणारा चुत्या ठरत नाही, त्याच्या असतील काही ध्येय धारणा. तो मला उत्तर द्यायला किंवा कोणत्याच स्पष्टीकरणाला बांधील नाही.

त्याने का द्यावं?

तर परम प्रिय नास्तिक मित्रांनो द्वेष ही सुद्धा एक अंधश्रद्धा आहे.

ती कोणाबाबतीत करू नका, तेव्हाच न्यूट्रल होऊन आवरणं भेदून काढचाल.

नाहीतर काय कितीही सूक्ष्म झालात तरी, इलेक्ट्रॉन प्रोट्रॉन पासून ते Positron, lepton,

Pion, muon पर्यंत सगळं सगळं कुठेतरी एकीकडे झुकलेलं आहे.

धोतरातला इजारीतला पटक्या टोपी आता पॅंटीतला

ज्ञान्याचा नाम्याचा एकनाथ तुक्याचा सोपान काकाचा अन निवृत्तीनाथाचा

तो मीच कैक मैल पाय तोडत ईट्टलापुढं शरण येणारा

अट्टाईस युगांपासून..

शेतकऱ्यांच्या अगणित पिढ्यांनि समृद्ध केलाला मार्गय हा वारीचा..

देहू आळंदी ब्लॅकहोल्स आहेत जी वाखरी च्या एकाच वॉर्महोल ला जोडलीयत ज्यातून पंढरी चं युनिव्हर्स जन्मतं !

आणि वारी त्या निर्वातातला अथांग प्रवास ..

  • आकाश चटके

Leave A Reply

Your email address will not be published.