नवाब मलिकांच्या आरोपांमुळे गाजत असलेल्या रिझवी यांच्या नावे ११ लाखांचा फतवा निघालेला
गेल्या अनेक दिवसांपासून देशात हिंदू- मुस्लिम वाद पेटत चाललंय. बांग्लादेशातील हिंसेचे पडसाद त्रिपुरात उमटले, त्यानंतर काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात वाद निर्माण झाला. त्यात सलमान खुर्शीद यांच्या पुस्तकाने नवीन वाद पेटवला आणि वसीम रिझवी यांच्या व्हिडिओने आणखी एक ठिणगी पडलीये.
तर उत्तर प्रदेश शिया सेंट्रल वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्ष वसीम रिझवी वादात सापडले आहेत. त्यांनी आता एक व्हिडिओ रेकॉर्ड करून संदेश जारी केला आहे. ज्यामध्ये त्यांनी म्हटले की,
मृत्यूनंतर त्याच्यावर हिंदू रितीरिवाजांनुसार अंत्यसंस्कार केले जावे आणि दफन करू नये.
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये रिझवी यांनी त्यांचा मृतदेह त्यांचे हिंदू मित्र, डासना मंदिराचे महंत नरसिंह नंदा सरस्वती यांच्याकडे सोपवावा आणि त्यांची चिता जाळू द्यावी, असा उल्लेख केला आहे.
आता रिझवी यांनी हा व्हिडिओ रेकॉर्ड केलाय, कारण त्यांच्यावर फतवा जारी केलाय गेलाय. कारण म्हणजे वक्फ बोर्डाच्या माजी अध्यक्षांनी कुराणच्या २६ श्लोकांना आव्हान दिलं आणि नंतर नवीन कुराण लिहिण्याचा दावा केलाय. आता असा दावा केल्यावर वाद पेटणार नाही तर काय होईल, तेच वसीम रिझवी यांच्यासोबत घडलयं.
कुराणातील श्लोक काढून टाकण्याची मागणी करणारी जनहित याचिका दाखल केल्याबद्दल वसीम रिझवी यांना मुस्लिम गटांकडून जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या आहेत. कुराण शरीफमधून दहशतवादाचं शिक्षण देणाऱ्या आणि माणसाला हिंसक बनवणाऱ्या २६ आयती काढून टाकण्यात याव्यात, अशी मागणी त्यांनी या याचिकेतून केली आहे.
त्यांच्या या याचिकेवर शिया आणि सुन्नी दोन्ही समुदायाच्या लोकांकडून रिझवी यांचा जोरदार विरोध होतोय. एवढंच नाही तर वसीम रिझवी यांचं मुंडकं छाटणाऱ्याला ११ लाख रुपयांचं बक्षीस देण्यात येईल, असं सरेआम ऐलान सुद्धा करण्यात आलंय.
मुरादाबाद बार असोसिएशनचे अध्यक्ष अमीरुल हसन जाफरी यांनी ही घोषणा केली आहे. त्यांनी म्हंटल कि,
‘रिझवी यांनी कोर्टात दाखल केलेल्या रिट याचिकेचा आम्ही सगळेच जण विरोध करतो. कुराणबद्दल त्यांचं वक्तव्य अपानस्पद आहे, त्यामुळे रिझवींसारख्यांना मृत्यूदंड देणं हा काही अपराध नाही. म्ह्णून आम्ही जाहीर करतो कि,रिझवींचं मुंडकं छाटणाऱ्याला ११ लाखांचं बक्षीस देण्यात येईल. आणि हा निधी आपण लोकांकडून गोळा करून देऊ. यासाठी गरज लागली तर आपण आपल्या अपत्यांनाही विकू’.
वसीम रिझवी यांच्या या वक्तव्या विरोधात भाजपच्या काश्मीर गटानं श्रीनगरमध्ये पोलिसांत एफआरआय दाखल केली आहे. “रिझवी यांनी मुस्मिल समुदायाच्या भावना दुखावल्या आहेत, कुणालाही कोणत्याही समुदायाबद्दल किंवा त्यांच्या पवित्र ग्रंथाविरुद्ध बोलण्याची परवानगी दिली जाणार नाही, त्यामुळे रिझवी यांना अटक केली जावी, अशी मागणी या गटानं लावून धरली.
नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते नवाब मलिक यांनीही वसीम रिझवी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. त्यांनी म्हणतात कि,
वसीम रिझवी काही वर्षापासून देशातील सलोखा बिघडवणारी विधानं करत आहेत, याबाबत काही पुस्तक देखील लिहित आहेत. लोकांच्या भावना भडकवत आहेत. मात्र त्यांच्यावर कुठलीचं कारवाई होत नाही. देशातील वातावरण बिघडवण्यासाठी नियोजन करून या गोष्टी केल्या जात आहेत.
आता हि काय पहिली वेळ नाही याआधी वसीम रिझवी यांनी अनेक वादग्रस्त वक्तव्य केली आहे. त्यातल्या काहींवर नजर टाकूयची झाली तर बाबरी मशीद म्हणजे हिंदुस्थानच्या धरतीवर कलंकासारखी आहे, जनावरासारखी पोर जन्माला घालणं देशासाठी घातक लोकसंख्या नियंत्रण आवश्यक आहे.
एवढंच नाही तर चांद-ताऱ्याचा हिरवा झेंडा इस्लामचा धार्मिक झेंडा नाही, असंही त्यांनी म्हंटल होत. सोबतच त्यांनी बऱ्याचदा आपल्या लिखाणातून वादग्रस्त परिस्थिती निर्माण केली आहे. ज्यामुळे त्यांना अनेकदा कडक विरोधाला समोर जावं लागलं आहे. काही मौलवींनी तर त्यांना मुस्लिम विरोधी असल्याचं म्हणत मुस्लिम धर्मातून बेदखल करत असल्याचं जाहीर केलंय.
पण या सगळ्या विरोध आणि टीकांवर वसीम रिझवी सारखं म्हणतात कि,आपण खरे मुस्लिम आहोत.
आता रिझवी यांच्याबद्दल बोलायचं झालं तर, वसीम रिझवी हे उत्तर प्रदेशातील शिया वक्फ बोर्डाचे माजी चेअरमन आहेत. २००० साली समाजवादी पक्षाच्या तिकिटावर ते नगरसेवक म्हणून निवडून आले होते. यांनतर २०८ मध्ये त्यांची शिया वक्फ बोर्डाचे सदस्य म्ह्णून निवड झाली. मात्र या काळात पैशांचा घोळ घातल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. ज्याचाही उल्लेख नवाब मालिकांनी केला. या आरोपानंतर सपाने २०१२ मध्ये त्यांना पक्षातून बाहेर काढले होते.
हे ही वाच भिडू :