पडीक असलेला बगीचा पुढे जाऊन क्रिकेटची पंढरी बनेल असं कोणालाही वाटलं नव्हतं.

क्रिकेटची पंढरी समजलं जाणारं मैदान म्हणजे ईडन गार्डन.

हे मैदान भारतीयांच्या अगदी जवळचं आहे.

१९९६ सालचा विश्व् चषक सामना. भारतातल्या त्यावेळच्या सगळ्यात मोठ्या ईडन गार्डन मैदानावर भारत विरुद्ध श्रीलंका सेमीफायनल चालू होता. प्रेक्षकांनी स्टेडियम अगदी तुडुंब भरलेलं होत. श्रीलंकेने दिलेले २५१ धावांचे आव्हान भारत सहज पार करेल यावर भारतीय संघाचे प्रेक्षक ठाम होते. २३ षटकात एक विकेट गमावून ९८ धावा अशा सुस्थितीत भारत होता.

सचिन तेंडुलकर बाद झाला आणि पत्त्यांचा बंगला कोसळावा तसा भारतीय संघ १२० धावांवर ८ बाद अशा मुश्किलीत सापडला. प्रेक्षक भडकले होते. त्यातील काही प्रेक्षकांचा संयम सुटून त्यांनी मैदानात बाटल्या फेकायला सुरवात केली, काही प्रेक्षकांनी तर स्टेडियममध्येच खुर्च्यांची तोडफोड करून आगही लावली. भारताविरुद्धच्या घोषणा सुरूं केल्या.

सामना बंद करून पंचांनी श्रीलंकेला विजयी घोषित केलं. या निर्णयाने विनोद कांबळीच्या डोळ्यात अश्रू आले. आजही ईडन गार्डन वरचा कांबळीचा रडतानाचा व्हिडिओ पाहून अनेक भारतीय क्रिकेट रसिक उदास होतात. ईडन गार्डन हे तेव्हापासून प्रेक्षकांसाठी एक भावना बनलं गेलं. ईडन गार्डनचा हा इतिहास भारतासाठी अगदीच वाईट होता.

ईडन गार्डन स्टेडियम या मैदानाचा इतिहासही इथल्या प्रेक्षकांप्रमाणे तडकफडक आहे.

हे स्टेडियम कस अस्तित्वात आलं आणि त्यामागचा इतिहास आणि पुढे या मैदानावर घडलेले अनेक विश्व् विक्रम आपण बघूया.

१८४१ साली हे मैदान आधी एक मार बगान बगीचा म्हणून प्रसिद्ध होते. याचे मालक होते बाबू राजचंद्र दास. ते कोलकात्यातील एक धनाढ्य जमीनदार होते. पैसा अडका जमीन जुमला मोठ्या प्रमाणात होता. त्यांना तीन मुली होत्या.

त्याकाळी कोलकाता ही ब्रिटिशांची राजधानी होती. त्यांचा गव्हर्नर जनरल होता जॉर्ज ईडन. याला अर्ल ऑफ ऑकलंड असं देखील ओळखलं जायचं. त्याची बहीण एमिली ईडन ही मोठी लेखिका होती. ती देखील आपल्या भावासोबत भारत पाहायला म्हणून कलकत्याला आली होती. तिने इथे घालवलेला काळ आपल्या पुस्तकांमधून शब्द बद्ध केला. त्याकाळच्या भारताचे प्रतिबिंब आपल्याला या पुस्तकांमधून पाहावयास मिळते.

एकदा बाबू राजचंद्र दास यांच्या तीनही मुली कसल्याशा रोगाने आजारी पडल्या. वैद्य हकीम यांनी अनेक प्रयत्न केले पण त्याच्यावर उपाय सापडला नाही. अखेर गव्हर्नर जनरल यांच्या बहिणीने एमिली ईडन हिने त्या मुलींवर उपचार केले आणि त्यांना वाचवलं.

भारावून गेलेल्या राजचंद्र दास यांनी  हुबळी नदीच्या बाजूला असलेली पडीक जागा त्यावेळचा व्हॉईसरॉय लॉर्ड ऑकलँड ईडन आणि त्याच्या बहिणीला  एमिली ईडन याना भेट म्हणून दिली.

आधी मार बागान हे नाव असलेला हा बगीचा पुढे ईडन गार्डन म्हणून प्रसिद्ध झाला.

बाबूघाट आणि फोर्ट विलियमच्या मधोमध ईडन गार्डन स्थित आहे. कोलकाता हाय कोर्टच्या विरुद्ध बाजूस हे मैदान आहे. पुढे इंग्रज अधिकाऱ्यांनी या ग्राउंड वर क्रिकेट व फुटबॉल खेळण्यास सुरवात केली. कालांतराने हे ग्राउंड फक्त क्रिकेटसाठीच फेमस झाले.

१९३४ साली या मैदानावर भारत विरुद्ध इंग्लंड असा पहिला कसोटी सामना झाला. १९८७ साली भारत विरुद्ध पाकिस्तान असा  एकदिवसीय सामना या मैदानावर रंगला. हिरो कपची सेमीफायनल भारत विरुद्ध साऊथ आफ्रिका यांच्यात पहिली दिवसरात्र लढतीचा सामना झाला.

भारतीयांचं वाढतं क्रिकेट वेड याची दखल घेऊन ४०००० प्रेक्षक क्षमता असलेलं हे स्टेडियम पुढे जाऊन ९४००० प्रेक्षक बसतील इतकं भव्य दिव्य करण्यात आलं. जगातल्या सर्वात मोठ्या स्टेडियममध्ये या मैदानाचा समावेश होतो.

आयपीएल मधील कोलकाता नाईट रायडर्स संघाचं हे होम ग्राउंड आहे. कोलकाता नाईट रायडर्सचा पहिला कर्णधार म्हणजे सौरव गांगुली. माजी क्रिकेटपटू सौरव गांगुली याच्या नावे स्टेडियम मध्ये पॅव्हेलियन आहे. अगदी बॉल बॉय म्हणून सुरवात करण्यापासून ते भारताचा कप्तान, बीसीसीआयचा अध्यक्ष बनण्या पर्यंतची गांगुलीची कारकीर्द याच ईडन गार्डनवर घडली.

बंगाल टायगर दादाने मैदानाबाहेर जाणारे गगनभेदी षटकार हे ईडन गार्डनचं वैशिष्ट्य होतं. आज रिटायरमेंट नंतर देखील गांगुली ईडन गार्डन वर दिसला तर प्रेक्षकांच्या घोषणेमुळे पव्हेलियनच छप्पर उडून जाते.

या मैदानाचा इतिहास जसा भव्य दिव्य आहे तसाच पराक्रम या मैदानावर खेळाडूंनी गाजवले आहेत. त्यातील जागतिक कीर्तीचे काही विक्रम भारतीय खेळाडूंनी रचले आहेत.

२००१ साली VVS लक्ष्मणने झळकावलेली अद्वितीय खेळी म्हणजे ऑस्ट्रेलिया विरुद्ध २८१ धावा. आणि भारताने हि ऐतेहासिक मॅच १७१ धावांनी जिंकली. हरभजन सिंगने त्याच्या कारकिर्दीतील घेतलेली पहिली हॅट्ट्रिक सुद्धा याच मैदानावर आहे.

जागतिक स्तरावर बनवलेला विश्व्विक्रम म्हणजे रोहित शर्माने दुसऱ्यांदा झळकावलेलं द्विशतक २६४ धावा.

या मैदानाविषयी भारताचे माजी क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर यांनी महत्वाचं विधान केलं आहे,

ईडन गार्डन हे लॉर्ड्स नंतरच सगळ्यात उत्तम मैदान आहे.

हे हि वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.