पेट्रोल डिझेल सोडा आता टीव्ही पाहणं सुद्धा प्रचंड महाग होणार

देशात महागाईनं डोकं वर काढलंय. पेट्रोल- डिझेलच्या किमतीने तर शंभरी पार केलीचं आहे. त्यात ऐन सणासुदीच्या वेळी गॅस, खाद्य तेलाच्या किमती मोजताना पार खिशा मोकळा करायला लागतोय. आता एवढ्यानं भगत नाही तर त्यात भर म्हणून आपल्या मोकळ्या वेळेवरही आता गदा आलीये.

कारण येत्या १ डिसेंबरपासून टीव्ही पाहणं सुद्धा महाग होणार आहे. टीव्ही चॅनेल आपल्या बिलात वाढ करणार आहेत आणि ही वाढ थोडीथोडकी नाही बर का तर डायरेक्ट ५० टक्के वाढ होणार असल्याचं म्हंटल जातंय.

देशातील टॉपचे ब्रॉडकास्ट नेटवर्क झी, स्टार, सोनी आणि व्हायकॉम १८ ने काही चॅनेलला त्यांच्या बुकेतून म्हणजे आपल्या चॅनेलच्या पॅकमधून बाहेर टाकले आहे. यामुळे, टीव्ही पाहणाऱ्यांना ५०% अधिक खर्च करावा लागू शकतो. टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया (TRAI) च्या नवीन टॅरिफ ऑर्डरमुळे त्यांनी हे केल्याचं कंपन्यांनी म्हंटलं आहे.

देशातील प्रसारण आणि मोबाईल सेवा नियंत्रित करणाऱ्या TRAI ने मार्च २०१७ मध्ये एक निर्णय घेतला. त्यांनी टीव्ही चॅनल्सच्या किंमतींबाबत नवीन टॅरिफ ऑर्डर (NTO) जारी केली. यानंतर, १ जानेवारी २०२० रोजी पुन्हा एकदा टॅरिफ ऑर्डर जारी करण्यात आले. त्याला NTO २.० असे म्हणतात.

आता याचं NTO २.० च्या नवीन टॅरिफ ऑर्डरमुळे नेटवर्क त्यांच्या चॅनेलच्या किंमती बदलत आहेत. ट्रायचा विश्वास होता की,  एनटीओ २.० मुळे दर्शकांना फक्त ते पाहत असतील तेच चॅनेल निवडण्याचा आणि त्यासाठी पैसे देण्याचा पर्याय आणि स्वातंत्र्य मिळेल.

जेव्हा TRAI ने NTO २.० ची घोषणा केली तेव्हा नेटवर्क कंपन्यांनी त्याविरोधात सर्वोच्च न्यायालय गाठले. त्यांनी यावर स्थगिती देण्याची विनंती केली. या प्रकरणाची पुढील सुनावणी २० नोव्हेंबरला आहे. पण माहितीनुसार TRAI नवीन दर लागू करण्यावर ठाम आहे आणि न्यायालयानेही स्थगिती आदेश दिला नाही. अशा स्थितीत कंपन्यांना नवीन किंमती लागू करण्यास भाग पाडले जाणार आहे.

आता TRAI च्या या नवीन आदेशातली आणखी एक अट म्हणजे बुके पाहण्याची किमान किंमत १२ रुपये असेल.

यापूर्वी, ब्रॉडकास्ट नेटवर्कच्या बुकेत ऑफर केलेल्या चॅनेलची किंमत दरमहा १५-२५ रुपयांपर्यंत असायची. दरम्यान ट्रायच्या आदेशानंतर अधिकाधिक लोकांना आकर्षित करण्यासाठी वाहिन्यांनी सर्वात कमी दरात आपले बुके दिले होते. पण किमती १५ रुपयांवरून १२ रुपयांवर आल्यामुळे कंपन्यांना मोठा तोटा  सहन करावा लागला.

आता हाच तोटा कमी करण्यासाठी कंपन्यांनी प्रयत्न सुरु केलेत. त्यांनी आपल्या बुकेमधून काही लोकप्रिय चॅनेल काढले आणि त्यांचे चार्जेस स्वतंत्रपणे आकारण्याचा मार्ग काढला. म्हणजे आता जर तुम्हाला कोणता लोकप्रिय चॅनेल पाहायचा असेल तर तुम्हाला ते त्या चॅनेलच्या बुकेमध्ये सापडणार नाही. त्यासाठी वेगळे पैसे मोजावे लागतील. 

म्हणजे स्टार प्लस, कलर्स, झी टीव्ही, सोनी आणि काही लोकप्रिय ब्रॉडकास्ट चॅनेल पाहण्यासाठी दर्शकांना ३५ ते ५० टक्के अधिक पैसे द्यावे लागतील.  स्टार आणि डिस्ने इंडिया चॅनेल पाहण्यासाठी दरमहा ४९ रुपयांऐवजी ६९ रुपये खर्च करावे लागतील. सोनीसाठी, ३९ ऐवजी महिन्याला ७१ रुपये खर्च करावे लागतील. झी साठी ३९ रुपयांऐवजी ४९ रुपये आणि वायाकॉम -१८ चॅनेलसाठी २५ रुपयांऐवजी दरमहा ३९ रुपये द्यावे लागणार आहे.

म्हणजे हे झालं कसं कि, पायावर कुऱ्हाड मारा नाही तर कुऱ्हाडीवर पाय ठेवा पाय कापलाचं जाणार आहे. आता येत्या १ डिसेंबरपासून ही ननवीन सिस्टीम लागू झाल्यांनतर ग्राहकांच्या खिश्याला झळ बसणार आहे. 

हे ही वाचं भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.