“IPL कॉन्ट्रॅक्टसाठी नाही तर देशाच्या प्रतिमेसाठी खेळतो” असं ठणकावून पॅट कमिन्सने सांगितलं होतं.

पॅट कमिन्सने कोरोनाकाळात भारताला जी आर्थिक मदत केली त्यावरून सर्वच स्तरावरून त्याच कौतुक केलं जात आहे. समाज माध्यमांवर त्याचीच चलती आहे. आता सध्या जी मीडिया पॅट कमिन्सला डोक्यावर घेऊन नाचत आहे त्याच मीडिया आणि सोशल मीडियांवरून एकेकाळी त्याला प्रचंड ट्रोल केलं गेलं होतं. नक्की काय किस्सा झालेला तो आपण जाणून घेऊ.

भारत ऑस्ट्रेलिया या दोन देशात चालणाऱ्या रंगतदार लढती तमाम क्रिकेटप्रेमी लोकांना माहिती आहे. चौकार षटकारांपेक्षाही जास्त चर्चेत राहते ती म्हणजे या दोन संघात चालणारी स्लेजिंग. अँड्र्यू सायमंड आणि हरभजन सिंग यांचं मंकी गेट प्रकरण जगभर गाजलं होतं. सचिन तेंडुलकर आणि ब्रेटलीची मैदानावर चाललेली जुगलबंदी सुद्धा प्रेक्षकांसाठी चर्चेचा विषय असायचा.

पॅट कमिन्स या ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाजावर सुद्धा त्यांच्याच देशाचा माजी कर्णधार मायकेल क्लार्क आणि भारतीय मीडियातून आरोप केले गेले होते नक्की काय प्रकरण झालं होतं ते बघूया.

२०१८ साली ऑस्ट्रेलियामध्ये बॉल टॅम्परिंग प्रकरण जेव्हा उघडकीस आलं तेव्हा क्रिकेटविश्वात खळबळ माजली. डेव्हिड वॉर्नर आणि स्टीव्ह स्मिथला जगभरातून शिव्यांच्या लाखोल्या वाहिल्या गेल्या. या प्रकरणानंतर ऑस्ट्रेलियन संघ इतर देशांशी खेळताना शांततेत क्रिकेट खेळू लागला, ज्या प्रकारे ते आधी प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंची स्लेजिंग करायचे त्यामुळे विरोधी संघातले खेळाडू त्यांना घाबरून असायचे.

पॅट कमिन्स आणि विराट कोहली यांच्यात त्यावेळी जोरात शीतयुद्ध सुरु होतं. कमिन्सच्या बाउंसरवर कोहली अडखळत खेळायचा त्यावरून पॅट कमिन्स त्याला डिवचायचा. विराट कोहलीला डिवचण्याचा त्याचा उद्देश इतकाच असायचा कि गोलंदाज आणि फलंदाज यांच्यात चालणारी जुगलबंदी प्रेक्षकांना बघायला मिळो आणि खेळात रंगत येत जावो. पॅट कमिन्सच्या वेगवान गोलंदाजीच्या वेळी भल्या भल्या बॅट्समनची भंबेरी उडायची.

२०१८-१९ च्या भारत दौऱ्यावर बॉल टॅम्परिंग प्रकरणानंतर ऑस्ट्रेलियन संघ स्लेजिंग न करता खेळू लागला. या सामन्यांच्या वेळीही विराट कोहलीला तो काहीही न बोलता निमूटपणे खेळत होता. ऑस्ट्रेलियन संघाच्या या मुकाटपणे खेळण्याच्या धोरणावरून ऑस्ट्रेलियन संघाचा माजी कर्णधार मायकेल क्लार्कने आरोप केले होते कि,

ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया संघासारखा का खेळत नाहीए,नीट खेळणं सोडा साधी स्लेजिंग करून सामन्यात आक्रमकपणासुद्धा आणत नाहीए, आक्रमक भूमिका हा आपल्या संघाचा मूळ खेळ आहे. कदाचित भारत दौऱ्यावर गेल्यामुळे आयपीएल कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल होऊ नये म्हणून इतकं निमूटपणे खेळत आहेत.

यावर भारतीय मीडिया आणि जागतिक मीडियाने याची गंभीर दाखल घेतली आणि सोशल मीडियावर ऑस्ट्रेलिया संघाची इज्जत काढली.

पॅट कमिन्सलासुद्धा समाजमाध्यमांवर ट्रोल करण्यात आलं होतं.

या आरोपांचं उत्तर पॅट कमिन्सने मीडियाला दिलं त्यात तो म्हणाला होता कि,

ऑस्ट्रेलिया संघ हा बॉल टॅम्परिंग प्रकरणानंतर धक्क्यात आहे त्यामुळे आम्ही नम्रपणे आमचा खेळ करतो आहे. स्लेजिंग वगैरे हे चालूच असतं. पण जर कुणी आयपीएलवरून बोलत असेल तर मी त्यांना ठामपणे सांगतो कि आयपीएल कॉन्ट्रॅक्ट साठी नाही तर देशाची प्रतिमा सुधरवण्यासाठी नम्रपणे खेळतोय. बॉल टॅम्परिंग प्रकरणाने जगभरात ऑस्ट्रेलियाची झालेली नाचक्की आपण बघितलीच आहे , ती सुधरवण्यासाठी हा खटाटोप आहे.

अशा प्रकारे हे प्रकरण चांगलंच तेजीत राहिलं. मात्र सध्या मीडियावर सगळीकडे पॅट कमिन्सचा बोलबाला आहे. सध्या तो आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळत आहे. जगभरातून त्याने घेतलेल्या भूमिकेचं कौतुक केलं जात आहे.

हे हि वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.