आम्ही त्या ‘गुप्तरोगवाल्या डॉक्टरांना’ फोन केला आणि आमच्या फ्युजा उडाल्या ! 

 

शिघ्रपतन, हस्तमैथुन, स्वप्नदोष.. नया विश्वास एक हिं कॅप्सुल सैं !!! 

कॉल करें तुरंत समस्या का समाधान. 

गुप्तरोगी मिले… 

भारतातली एकमेव जाहिरात. जाहिरपणे गुप्त प्रचार आणि प्रसार करणारी. लहानपणापासून ट्रेन, बसस्टॅण्ड, पेपरातल्या कोपऱ्यातील जाहिराती आणि हक्काच्या सार्वजनिक मुताऱ्यावर या जाहिराती पाहत आलोय. ते गरिबी हटाओ जाहिरात आली, शायनिंग इंडिया आली, अच्छे दिन आलं, राज्य लेव्हलला कुठे नेऊन ठेवलाय पासून राष्ट्रवादी पुन्हा देखील आलं…. 

कित्येक जाहिराती, कित्येक स्लोगन रोजच्या जगण्यात धुमाकूळ घालत असताना. इथ ना क्रिएटिव्हीटी आणि ना नविन फोटोयत. 

फक्त एकच स्वप्नदोष, शिघ्रपतन आणि समाधान 

आत्ता आपण काय वाचून नेहमीच या गोष्टी सोडून देत आलोय. पण नेहमी प्रश्न एकच. कोण फोन लावत असल काय? बर लावला तर नेमकं काय होतय. तसही गावाच्या बाहेर वर्षातील दोन महिने तंबू टाकून बसणारा डॉक्टरपण आपल्याला गुढंच वाटायचा. मग आम्ही ठरवलं या डॉक्टरांना फोन लावायचा.

पण भेंडी बोलणार कोण ? 

दिवसभर चर्चा सुरू झाली. बोलभिडूचा असा कार्यकर्ता पाहीजे जो बोलायला पण पाहीजे पण आवाजात दर्द पाहीजे, त्याचं कसाय दर्द हाय तर समस्या आहे. नायतर डॉक्टर आवाजावर ओळखायचा हि CBI ची माणसं दिसत्यात. 

मग अशाच एका रात्री स्टोरी मिळत नाही म्हणल्यानंतर आम्ही एक नंबर निवडला. माझ्या मना कर धाडस टाईप एक बोलणार आणि बाकीचे ऐकणार हे धोरण ठरलं फोन लावला… 

हॅल्लो डॉक्टर साहेब 

हॉं बोल्लो

साबं मेरे को हिंदी ठिकसें नहीं आतीं मराठी मैं बोलू क्या ? 

नहीं हमें मराठी नहीं आत्ती. 

तो फिर महाराष्ट्रामें जाहिरात क्यू देतो हों. 

हमारीं अॅड रेल में लगती हैं. पुरे भारत सैं हमें कॉल आते हैं. आप बोलो क्या समस्या हैं. 

सर वो समस्या मतलब कुछ होता नहीं. 

मतलब करनें के बाद कुछ होता नहीं या पहेलेसेंही होता नही. 

सर वो करनेके बात कुछ होता नही. 

तो हमारा प्रायमरी कोर्स हम बता देते हैं. आपको वो लेना होंगा. 

ठिक हैं सर, लेकिंन कहां आणा होगां. 

आने की जरूरत नहीं. बस्स आपका पतां बता दिजीऐ गां. और हमारे खाते मैं ३०००  डाल दिजेया गां. 

उसके बाद 

उसके बाद आपके पतें पे हम दवाई भिजवा दैंगे. 

कैसी दवाई. 

उसमे जेल होगा वो लगाना पडेंगा, औंर कुछ जडीबुटींया, तेल ओंर पाऊंडर. 

पाऊंडर लगानी होती हैं क्या 

नही वो सुबह खाली पेट खाने की. 

अच्छा औंर उसका रिझल्ट नहीं आया तों. 

येसे कैसे दस साल सैं हम हकिम हैं. १०० पर्संन्ट रिझल्ट हैं. नहीं आया तो पुरा पैसा वापिस. आजतक सबको राहत मिलीं हैं. 

झालं आत्ता पुढचं आमच्या कार्यकर्त्याला सुचलं नाही. फोन ठेवून दिला. फंटर म्हणत होता. पैसे टाका पोस्टानं औषधं पाठवतो. आत्ता खरखोटं करायला ३००० घालवायला आम्ही काय २५० रुपयात मोबाईलची अजून वाट बघणारे येडे नाहीत. बर तुमच्यासाठी ३००० रुपये घालवून तुम्हाला खरखोटं सांगायचं तर आम्हाला आला तोच डब्बा तुम्हाला आला नाय तर तुम्ही आम्हाला कुत्र्यासारखं माराल हे निर्विवाद सत्य आहे. 

सो आमच्या माणसांनी पुढं प्रकरण वाढवायचं नाही इतकाच निर्णय घेतला आणि शांत बसले. आत्ता कसय हा आहे फ्रॉड. त्याचं सरळ सरळ कारणं म्हणजे अवघड जागेचं दुखणं, धडं सांगता पण येत नाय आणि दाखवता पण येत नाय अस म्हणतात ना.. तेच. 

समजा अवघड जागी त्रास होतोयच तर चांगल्या डॉक्टरकडे जायचं. चांगला म्हणजे M.D. कॅटेगरीतला. को काय करतो तर हाय काय, नाय काय पद्धतशीर सांगतो. हे असे फोन केले की पैसे जातील ते वेगळं आणि उलटं काहीतरी खावून मरायचे धंदे होतील ते वेगळच. 

सो, जागो ग्राहक जागो !!!

नोट : फोन खोटा वाटत असेल तर ऑफिसवर येवून कॉल रेकॉर्डिंग ऐकणं. कॉल रेकॉर्डिंग सेन्ड केलं जाणार नाही कारण बोलभिडू कार्यकत्यांच्या लज्जेचा मुद्दा आहे. 

हे ही वाच भिडू.

3 Comments
  1. निखिल says

    मस्तचं.. लिवत ऱ्हा भावांनो????

Leave A Reply

Your email address will not be published.