एकेकाळी मिस इंडिया किताब जिंंकणाऱ्या या मॉडेल सध्या काय करतायेत?

३ जुलै रोजी मुंबईत पार पडलेल्या मिस इंडिया २०२२ च्या अंतिम फेरीत प्रवेश करत कर्नाटकच्या सिनी शेट्टीने वयाच्या २२ व्या वर्षी फेमिना मिस इंडिया २०२२ चा क्राऊन जिंकलाय. सिनी म्हणते या एकंदरीत प्रवासात प्रियंका चोप्रा माझी आयडॉल राहिलीये. प्रियंका चोप्रा सुद्धा एके काळची मिस इंडिया होती. तिच्या सारख्याच बॉलीवूडमधल्या अजून काही तारकांनी मिस इंडियाच्या किताबवर आपलं नाव कोरलंय.

नुकताच दिया मिर्झाने तिच्या मिस इंडियाच्या दिवसांमधला एक थ्रोबॅक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे ज्यात प्रियांका चोप्रा आणि लारा दत्ता सुद्धा आहेत. त्यावेळी प्रियांका चोप्राने मिस वर्ल्डचा किताब पटकावला होता. लारा दत्ताने मिस युनिव्हर्सचा ताज तर स्वत: दिया मिर्झाने मिस एशिया पॅसिफिकचा किताब पटकावला होता. त्या फोटोने त्या तिघींच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. 

म्हणूनच एकेकाळच्या मिस इंडिया असलेल्या या अभिनेत्री सध्या काय करतात ते थोडक्यात पाहू…

रिता फारीया

भारतातच नव्हे तर संपूर्ण आशिया खंडात रिता फारीया हिने पहिला मिस वर्ल्डचा ताज जिंकला होता.

हा किताब जिंकल्यानंतर तिला अॅक्टिंग आणि मॉडेलिंग क्षेत्रातून अनेक ऑफर्स आल्या परंतु तिने तिच्या वैद्यकीय क्षेत्रातच करियर करण्याचा निर्णय घेतला. ५५ वर्षांपूर्वी एका भारतीय मुलीला मिस वर्ल्डचा टप्पा गाठणं आणि हा किताब जिंकणं किती कठीण गेलं असेल याची तुम्ही कल्पना करू शकता.

यासोबतच त्यावेळची चांगली गोष्ट ही होती की रितासाठी तिचं करियर करण्याची ही सुवर्णसंधी होती कारण तेव्हा या इंडस्ट्रीत आजच्या इतकी स्पर्धा नव्हती. पण असं असूनही तिने सौंदर्य आणि ग्लॅमरला आपलं करिअर म्हणून निवडलं नाही.

यशाचा सर्वात मोठा टप्पा गाठूनही, रिताने केवळ एक वर्ष मॉडेलिंग केलं आणि त्यानंतर ती वैद्यकीय क्षेत्रात गेली.

मुंबईच्या ग्रँट मेडिकल कॉलेज आणि सर जमशेटजी जिजाबाई ग्रुप ऑफ हॉस्पिटलमधून एमबीबीएस पूर्ण केल्यानंतर ती लंडनमधील किंग्ज कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये गेली आणि तिथूनच तिने तिचं पुढचं शिक्षण पूर्ण केलं. रिता आता तिच्या कुटुंबासह डब्लिन, आयर्लंडमध्ये राहते. रिताला दोन मुलं आहेत.

संगीता बिजलाणी

१९८० मध्ये मिस इंडिया वर्ल्डचा किताब जिंकण्यापूर्वी संगीता बिजलानीने मॉडेल म्हणून काम केलं होतं. तिच्या विजयानंतर खर्‍या अर्थाने तिच्या बॉलीवूड मधल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात झाली. अगदी कमी काळात तिने बॉलीवूडमध्ये आपलं नाव मोठं केलं होतं. संगीता तिच्या चित्रपटांपेक्षा प्रेम प्रकरणांबद्दल जास्त प्रसिद्ध आहे.

तिच्या आणि सलमानच्या प्रेमाचे किस्से सगळ्या बॉलीवूडमध्ये फेमस आहेत. 

तिने त्या काळी अनेक प्रसिद्ध जाहिरातींमध्ये काम केलं होतं. त्यातल्या पॉन्ड्स साबण आणि निरमाच्या जाहिराती खूप प्रसिद्ध आहेत. तिचे सिनेमे इतके चालले नाही पण तिच्या जाहिराती भरपूर लोकप्रिय झाल्या होत्या.

नंतर नंतर तिच्या अभिनय कारकिर्दीला उतरती कळा लागली आणि १० वर्षांच्या कालावधीत तिच्या २३ चित्रपटांपैकी फक्त दोन चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. लग्नानंतर तिने अभिनयातून पूर्णपणे निवृत्ती घेतली. त्यानंतर तिने भारताचा माजी क्रिकेट कर्णधार अझरुद्दीनशी लग्न केलं आणि आता त्याने सुरू केलेली एक मीडिया फर्म ती सांभाळते.

जुही चावला

१९८४ मध्ये मिस इंडियाचा किताब जिंकल्यानंतर जुही चावलाने बॉलीवूडमध्ये आपली एक चांगली कारकीर्द तयार केली. ती अनेक दशकांपासून आघाडीची अभिनेत्री म्हणून काम केलं. जुहीने तिच्या करिअरची सुरुवात सन १९८६ मध्ये सल्तनत या चित्रपटातून केली होती, मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला होता, त्यानंतर १९८७ मध्ये जुहीचा कन्नड चित्रपट प्रेमलोक बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला होता आणि त्यानंतर जूही चांगलीच गाजली.

यानंतर जुहीचा १९८८ मध्ये कयामत से कयामत तक हा चित्रपट आला, या चित्रपटात आमिर खान सोबत जुही मोठ्या पडद्यावर दिसली, हा चित्रपट जबरदस्त हिट ठरला आणि त्यानंतर जुहीने मागे अनेक हिट चित्रपट दिले. 

नंतर जुही चावलाने बिझनेसमन जय मेहता सोबत लग्न केलं, त्यांना अर्जुन आणि जान्हवी अशी दोन मुले देखील आहेत.

सध्या जय मेहता आणि जुही चावला हे इंडियन प्रीमियर लीग संघ कोलकाता नाइट रायडर्सचे सह-मालक आहेत, ज्यांनी त्यांच्या कंपनी रेड चिलीज एंटरटेनमेंट अंतर्गत शाहरुख खानसोबत भागीदारी केली.

सेलीना जेटली

मिस फेमिना इंडिया २००१ चा मुकुट सेलीना जेटलीच्या नावावर आहे. वडिलांच्या लष्करातील नोकरीमुळे त्यांनी भारतातील अनेक शहरात शिक्षण घेतलं आहे. फेमिना मिस इंडियाचा ताज जिंकल्यानंतर सेलिनासाठी हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेशाचे दरवाजे खुले झाले.

२०२३ मध्‍ये ‘जनाशीं’ या चित्रपटाद्वारे त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं.

या चित्रपटात तिच्या सोबत फरदीन खान होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई केली नाही. त्यानंतर ती तिच्या लव्ह हॅज नो लँग्वेज या आंतरराष्ट्रीय चित्रपटाला २००७ मध्ये न्यूझीलंडला गेली. आपल्या हिंदी चित्रपट कारकिर्दीत तिने अनेक चित्रपट केले, पण तिला फारसं यश मिळू शकलं नाही. चित्रपटांमध्ये काम करत असताना ती एकदा पीटर हग नावच्या व्यक्तिला भेटली. त्यानंतर दोघांची मैत्री झाली आणि नंतर त्यांनी लग्न केलं.

प्रियांका चोप्रा

प्रियंका चोप्राची आई मधु चोप्राने तिचा फोटो फेमिना मिस इंडियाला पाठवला होता. फेमिना मिस इंडियाला २००० मध्ये तिने दुसरा क्रमांक मिळवला होता. डिसेंबर २००० मध्ये, लंडन इथे “मिस वर्ल्ड” स्पर्धेत तिने भारताचे प्रतिनिधित्व केले आणि मिस वर्ल्डचा किताब जिंकला.

प्रियांकाने २००२ मध्ये तमिळ चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं.

तसंच, ‘द हीरो’ या थ्रिलर चित्रपटाद्वारे त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटात तिच्यासह सनी देओल, प्रीती झिंटा, अमरीश पुरी आणि  यांच्या प्रमुख भूमिका होत्या. त्याच वर्षी, अंदाज या संगीतमय ब्लॉकबस्टर चित्रपटासाठी तिला फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट महिला पदार्पण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.

त्यानंतर तिने मुझसे शादी करोगी, कमिने, दोस्ताना, मेरी कॉम, अग्निपथ, बाजीराव मस्तानी असे एका पेक्षा एक हिट चित्रपट दिले. २०१८ साली तिने तिच्यापेक्षा १० वर्ष वयाने लहान असलेल्या अमेरिकन गायक, अभिनेता निक जोनस याच्या सोबत जोधपूरच्या उम्मेद भवनमध्ये हिंदू आणि ख्रिश्चन रितीरिवाजांनुसार विवाह केला.

अशाप्रकारे या तारकांनी आपल्या सौंदर्याच्या आणि अभिनयाच्या जोरावर एक काळ गाजवाला होता..

हेही वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.