तुमच्या लघवीचा रंग तुमचं आरोग्य ठरवतो, कसं ते वाचा ?

तुमच्या लघवीचा रंग तुमच्या आरोग्याच्या स्थितीविषयी बरंच काही सांगत असतो. ‘युसी सॅन डिएगो हेल्थ’ या अमेरिकेतील कॅलिफोर्निया प्रांतातील आरोग्याविषयक सेवा देणाऱ्या संस्थेने,

याबद्दलच्या अभ्यासातून लघवीचा रंग आणि त्याचा आरोग्याशी असणारा संबंध याविषयी  काही महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे.

संस्थेनुसार,

माणसाच्या लघवीमध्ये पाण्याचे प्रमाण किमान ९५ % इतके असते, तर उर्वरित ५ % घटकांमध्ये सोडियम, क्लोराईड, यूरिया आणि क्रिएटिनिन यांचा समावेश असतो. या घटकांमुळेच लघवीला विशिष्ठ प्रकारचा वास येतो तर युरोबायलीन या रंगद्रव्यामुळे लघवीला रंग प्राप्त होतो.

याशिवाय आपल्या शरीराच्या आरोग्याच्या स्थितीनुसार लघवीचा रंग बदलत असतो. तेव्हा या बदलणाऱ्या रंगाचा आणि आरोग्यस्थितीचा नेमका काय संबंध आहे यावर एक नजर टाकाच.

Screen Shot 2018 06 25 at 6.13.43 PM

रंगहीन :

रंगहीन लघवी हे तुमचे शरीर अति-हाइड्रेटेड असल्याचं सूचित करत असते. हे चिंतेचे थेट कारण नाही, परंतु या स्थितीत रक्तात रासायनिक असमतोल निर्माण होऊ शकतो.

फिकट रंग:

जर तुमच्या लघवीचा रंग  फिकट असेल तर शरीर व्यवस्थित हायड्रेटेड स्थितीत आहे हे समजून जा. तुम्ही निरोगी आणि सामान्य आहात, असा याचा अर्थ.

पिवळा:

सामान्यतः लघवीचा रंग पिवळा असणे हे आरोग्यदायक असल्याचे लक्षण समजले जाते. आरोग्याच्या सामान्य स्थितीतील बहुतेक माणसांच्या लघवीचा रंग त्यामुळेच पिवळा असतो.

गडद पिवळा:

जर तुमच्या लघवीचा रंग गडद पिवळा किंवा तपकिरी असेल तर तुमच्या शरीरात पाण्याचं प्रमाण कमी असल्याचं ते लक्षण आहे. अशा स्थितीतही तुम्हाला काळजी करण्याचं फार काही कारण नाही. तुमची आरोग्य स्थिती सामान्य असल्याचंच ते लक्षण आहे. परंतु खबरदारी म्हणून शरीरातील पाण्याचं प्रमाण वाढविण्यासाठी तुम्ही अधिक पाणी पिऊ शकता.

लाल:

जर तुमच्या लघवीचा रंग लाल असेल तर मात्र तुमच्यासाठी धोक्याची घंटा वाजलेली आहे हे समजून घ्या. अशा परिस्थितीत तुम्ही आरोग्याची अधिकची काळजी घेणं आवश्यक आहे. तुमच्या लघवीमध्ये रक्ताचा काही अंश उतरल्याने रक्ताचा रंग लाल होऊ शकतो. लाल रंगाची लघवी हे मुत्राशयातील संसर्ग, मुतखडा यांसारख्या आजाराचे लक्षण असू शकते.

निळा :

काही वेळा एखाद्या आजारावर उपचार सुरु असताना आपण जी औषधे घेतो त्यांमुळे तुमच्या लघवीचा रंग निळा होऊ शकतो, पण असं असलं तरी अशा परिस्थितीत डॉक्टरांचा सल्ला घ्या.

पांढरा किंवा दुधाळ :

लघवीचा पांढरा किंवा दुधाळ रंग हा महिलांमध्ये आजारपणाचे लक्षण असू शकतो. रक्तामध्ये कॅल्शियम आणि प्रोटीनचे प्रमाण वाढल्यानंतर देखील पांढऱ्या रंगाची लघवी येऊ शकते. अशावेळी लघवीची तपासणी करून घ्यावी.

हे ही वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.